AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अनधिकृत बार आणि पबवर शिंदेंचा बुलडोझर, पुणे ड्रग्जचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पालिकेची कारवाई

पुण्यातील ड्रग्ज व्हिडीओ व्हायरल प्रकरणानंतर पुण्यातील बार आणि पबवर पालिकेची जोरदार कारवाई सुरु झाली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही कारवाई सुरु केली आहे.

अनधिकृत बार आणि पबवर शिंदेंचा बुलडोझर, पुणे ड्रग्जचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पालिकेची कारवाई
EKNATH SHINDEImage Credit source: TV9MARATHI
| Updated on: Jun 25, 2024 | 2:33 PM
Share

सांस्कृतिक राजधानी पुण्यात वारंवार अंमलीपदार्थांचा उघड सेवन विक्री आणि सेवन वाढत चालल्याचे उघडकीस आले आहे. नुकताच पुण्यातील एफसी रोडवरील एका रेस्टॉरंटमध्ये अल्पवयीन मुलांना उघडपणे ड्रग्ज पुरविले जात असल्याचा व्हिडीओ कॉंग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी व्हायरल केला होता. त्यानंतर कालच आणखी ड्रग्ज पार्टीचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर विद्येचे माहेरघर पुणे उडता पंजाब झाल्याची टीका विरोधकांकडून होत आहे. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रकरणात अनधिकृत बार आणि पबवर कारवाई करण्याचे आदेश कालच दिले होते. त्यानंतर पुणे महानगर पालिकेच्या तोडक पथकाने मंगळवारी फर्ग्युसन रोडवरील बारवर जोरदार तोडकाम कारवाई सुरु केली आहे. या कारवाईमुळे आता राज्य सरकारही उत्तर प्रदेशातील योगी आदित्य यांचा बुलडोझर कित्ता गिरविते की काय अशी चर्चा सुरु झाली आहे.

पुण्यात सर्वात आधी ललित पाटील ड्रग्स प्रकरणानंतर अंमलीपदार्थ्यांच्या खुलेआम व्यापार सुरु असून पोलिसच यात गुंतलेले असल्याचे उघडकीस आले. त्यानंतर या प्रकरणी राज्य सरकारने अनेक पोलिसांवर कारवाई केली होते. या प्रकरणात ललित पाटील याला व्हीआयपी ट्रीटमेंट आणि पळून जाण्यास मदत झाल्याप्रकरणात ससून रुग्णालयातील कर्मचारी आणि पोलिसांना निलंबित केले गेले. हे प्रकरण शांत होत न होत तोच आता पुण्याचे नामांकित बिल्डल अग्रवाल यांच्या अल्पवयीन मुलाने नंबरप्लेट नसलेल्या आलीशान पोर्शे कारने बाईकवरुन निघालेल्या तरुण-तरुणींना उडविल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाल्याचे उघडकीस आले होते. या प्रकरणात संबंधित अल्पवयीन तरुणाला वाचविण्यासाठी अनेक राजकारणी आणि पोलिस तसेच संबंधित रुग्णालयातील कर्मचाऱ्यांची कशी अभद्र युती झाल्याने सगळ्या जगाने पाहीले. आता पुण्यातील एफसी रोडवरील एल-3 बारमध्ये एका अल्पवयीन तरुणाला खुलेआम ड्रग्स सर्व्ह केली जात असल्याचे उघडकीस आले होते. तसेच पहाटेपर्यंत पब आणि बार सुरु असल्याचे व्हिडीओत दिसत होते.

दिखाऊ कारवाई

पुण्यातील अनधिकृत पब आणि बारवर बुडडोझर कारवाई सुरु झाली आहे. या प्रकरणात पहिला व्हिडीओ व्हायरल करुन वाचा फोडणारे कॉंग्रेसचे पुण्याचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी या कारवाईला दिखाऊ कारवाई म्हटले आहे. अधिवेशन दोन दिवसांवर आले आहे. त्यामुळे विरोधकांच्या प्रश्नांना जाण्यापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बारवार कारवाई सुरु केली आहे. ही कारवाई सर्वच बारवर करावी असे मागणी देखील धंगेकर यांनी केली आहे. एक बार तर आमदाराचा असल्याचा आरोप धंगेकर यांनी केला आहे. पुण्यातील सर्वच बार आणि रेस्टॉरंटनी अनधिकृत बांधकाम केलेले आहे. त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली आहे.

वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.