पुण्यातील तीन इंजिनिअर मित्रांची कमाल, बॅटरीवरील व्हेंटिलेटर बनवलं, मुख्यमंत्र्यांनी परवानगी दिल्याचा दावा

देशात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. कोरोनाची लागण झालेल्या सर्व रुग्णांवर सध्या रुग्णालयात उपचार (Engineer making new ventilator machine pune) सुरु आहेत.

पुण्यातील तीन इंजिनिअर मित्रांची कमाल, बॅटरीवरील व्हेंटिलेटर बनवलं, मुख्यमंत्र्यांनी परवानगी दिल्याचा दावा

पुणे : देशात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. कोरोनाची लागण झालेल्या सर्व रुग्णांवर सध्या रुग्णालयात उपचार (Engineer making new ventilator machine pune) सुरु आहेत. तर यामधील काही रुग्णांना व्हेंटीलिटरची आवश्यकता आहे. कोरोना रुग्णांमध्ये वाढ होत असल्याने अधिक व्हेंटीलेटरची गरज आहे. मात्र देशात व्हेंटिलेरची संख्या पुरेशी नाही. त्यामुळे पुण्यातील तीन इंजिनिअर मित्रांनी मिळून बॅटरीवर चालणारं व्हेंटिलेटर तयार केलं आहे. विशेष म्हणजे या व्हेंटिलेटरला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही परवानगी (Engineer making new ventilator machine pune) दिल्याचा दावा त्यांनी केला आहे.

कोरोनाची लागण झालेल्या अत्यवस्थ रुग्णाला व्हेंटिलेटरची आवश्यकता भासते. अत्यवस्थ कोरोना रुग्णाची स्थिती खालावली की त्याला श्वासोच्छ्वासाचा त्रास होऊ लागतो. त्यामुळे त्याला व्हेंटिलेटरवर ठेवलं जातं. मात्र काही रुग्णालयात व्हेंटिलेटरची कमतरता आहे. हेच ओळखून पुण्यातील वैद्यकीय उपकरण बनविणाऱ्या कंपनीतल्या मयूर गांधी, महेंद्र चव्हाण आणि आकाश चव्हाण या इंजिनिअर मित्रांनी एक व्हेंटिलेटर उपकरण तयार केलं.

हे व्हेंटिलेटर बॅटरीवर चालत असल्याने अॅम्ब्युलन्स, रेल्वेचे डबे याठिकाणी देखील वापरता येणार आहे. या व्हेंटिलेटरची बॅटरी एकदा चार्ज केल्यावर 13 ते 14 तास ते सुरु राहते. सध्या या तिन्ही मित्रांचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.

अवघ्या सात वर्षांच्या अनूभवाच्या जोरावर या तिघा मित्रांनी आंतरराष्ट्रीय उपकरणाला तोड देऊ शकेल असं व्हेंटीलेटर उपकरणं बनवलं आहे. आरोग्य आणीबाणीच्या काळात या तिघांनी बनवलेलं हे संपूर्ण भारतीय बनावटीचे व्हेंटिलेटर नक्कीच फायदेशीर ठरेल, असं म्हटलं जात आहे.

दरम्यान, राज्यात 5 हजार पेक्षा अधिकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर देशात 15 हजार पेक्षा अधिकांना कोरोना झाल्याचे समोर आलं आहे. देशात आतापर्यंत 640 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

संबंधित बातम्या :

दक्षिण सुदानमध्ये उपराष्ट्रपती 5 मात्र व्हेंटिलेटर 3, आफ्रिका खंडातील 41 देशात जेमतेम 2 हजार व्हेंटिलेटर्स

कोरोना उपचारात व्हेंटिलेटरची कमतरता, नौदलाकडून एकाचवेळी 6 रुग्णांसाठी ऑक्सिजन सिलेंडर विकसित


Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI