दक्षिण सुदानमध्ये उपराष्ट्रपती 5 मात्र व्हेंटिलेटर 3, आफ्रिका खंडातील 41 देशात जेमतेम 2 हजार व्हेंटिलेटर्स

दक्षिण सुदानमध्ये उपराष्ट्रपती 5 मात्र व्हेंटिलेटर 3, आफ्रिका खंडातील 41 देशात जेमतेम 2 हजार व्हेंटिलेटर्स

अफ्रिका खंडातल्या अनेक देशांची राजकीय व्यवस्था आणि तिथल्या सोयी-सुविधांची उपलब्धता यातली विसंगती तर (African countries Only have few ventilators)आणखीनच भयावह आहे.

Namrata Patil

|

Apr 20, 2020 | 7:23 PM

मुंबई : आफ्रिका खंडातल्या तब्बल 41 देशांमध्ये जेमतेम 2 हजार व्हेटिलेंटर्स असल्याची (African countries Only have few ventilators) माहिती समोर आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे 41 पैकी 10 देशांमध्ये एकही व्हेंटिलेटर नाही. त्यात कोरोनानं अफ्रिकेत सुद्धा पाय पसरल्यामुळे या ठिकाणी आरोग्य यंत्रणा कोरोनाला कशी तोंड देईल, असा प्रश्न आता सतावू लागला आहे.

अनेक बड्या वृत्तपत्रांनी जागतिक आरोग्य संघटनेच्या हवाल्यानं हे वृत्त दिलं (African countries Only have few ventilators) आहे. अफ्रिका खंडातल्या अनेक देशांची राजकीय व्यवस्था आणि तिथल्या सोयी-सुविधांची उपलब्धता यातली विसंगती तर आणखीनच भयावह आहे.

एका बातमीनुसार दक्षिण सुडानमध्ये उपराष्ट्रपतींची संख्या 5 आहे आणि व्हेटिलेटर्सची संख्या फक्त 4 आहे. म्हणजे देशाला जितके उपराष्ट्रपती आहेत, तितके व्हेटिलेटर्स सुद्धा नाहीत

तर सेंट्रल अफ्रिकन रिपब्लिकची लोकसंख्या 50 लाख आहे आणि व्हेंटिलेटर्सची संख्या फक्त 3 आहे. लायबेरियामध्ये फक्त 6 व्हेटिलेटर्स आहेत. त्यापैकी 1 अमेरिकेन दुतावासात आहे.

सोमालिया देशात एकही व्हेटिलेंटर नाही. या ठिकाणची लोकसंख्या 93 लाखांच्या घरात आहे. विशेष म्हणजे 135 जण कोरोनाबाधित आहेत.

नायजेरिया हा लोकसंख्येच्या तुलनेत जगातल्या आठव्या क्रमाकांचा देश आहे. त्यांची लोकसंख्या ही 15 कोटी म्हणजे अमेरिकेच्या लोकसंख्येच्या निम्मे आहे आणि या ठिकाणी सुद्धा जेमतेम 100 व्हेंटिलेटर्स आहेत. नायजेरियातल्या कोरोनाग्रस्तांचा आकडा 542 इतका आहे.

अफ्रिका खंड हा लोकसंख्या आणि श्रेत्रफळात आशिया खंडानंतरचा पृथ्वीवरचा दुसरा मोठा खंड आहे. मात्र आर्थिक प्रगातीत सर्वात मागे पडलेल्या देशांचा खंड म्हणून अफ्रिकेला ओळखलं जातं.

निरक्षरता, राजकीय अस्थिरता, लष्करी संघर्ष आणि भ्रष्टाचार या गोष्टी आफ्रिका खंडाच्या मागासलेपणाला जबाबदार आहेत. या निरक्षरतेमुळेच अनेक साथी आणि विषाणूंचा फैलावाचा फटका अफ्रिकी देशांनाच सर्वाधिक बसला आहे.

एड्स आणि इबोलासारखे आजार अफ्रिकी देशातून बाहेर गेले. त्यात जाती-जमातींमधले वाद आणि गुन्हेगारी या गोष्टींनी कधीच अफ्रिकन देशांना पुढे येऊ दिलेलं नाही.  तिथल्या मुलभूत गोष्टीकडेच अजून व्यवस्थांचं लक्ष गेलेलं नाही आणि आरोग्य यंत्रणेबाबत प्रचंड उदासिनता (African countries Only have few ventilators) आहे.

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें