मास्क, सॅनिटायझर, ग्लोव्जवरील जीएसटी कर रद्द करा, राहुल गांधीची मागणी

मास्क, सॅनिटायझर, ग्लोव्जवरील जीएसटी कर रद्द करा, राहुल गांधीची मागणी

कोरोनाच्या लढाईदरम्यान आरोग्यासाठी लागणाऱ्या वस्तूंवरील जीएसटी कर रद्द करावा, अशी मागणी काँग्रेस नेते राहुल गांधी (Corona Virus Equipment GST Free) यांनी केली आहे.

Namrata Patil

|

Apr 20, 2020 | 5:24 PM

नवी दिल्ली : देशात कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला (Corona Virus Equipment GST Free) आहे. कोरोना विषाणूंपासून स्वत:चा बचाव  करण्यासाठी मास्क, सॅनिटायझर या गरजेच्या वस्तू लोक खरेदी करत  (Rahul Gandhi) आहे. मात्र या गोष्टींवर जीएसटी कर आकारला जात आहे. कोरोनाच्या लढाईदरम्यान आरोग्यासाठी लागणाऱ्या वस्तूंवरील जीएसटी कर रद्द करावा, अशी मागणी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केली आहे.

“कोरोना महामारी दरम्यान आरोग्यासाठी लागणाऱ्या छोट्या मोठ्या (Corona Virus Equipment GST Free) गोष्टी या जीएसटीमुक्त कराव्यात. आरोग्य आणि आर्थिक नुकसान सहन करणाऱ्या जनतेला सॅनीटायझर, साबण, मास्क, हँड ग्लोव्ज यासारख्या गोष्टींवर जीएसटी लादणं चुकीचं आहे. त्यामुळे या सर्वांवरील जीएसटी कर तात्काळ रद्द करावा,” अशी मागणी राहुल गांधी यांनी ट्विटद्वारे केली आहे.

या ट्विटसोबत त्यांनी एक फोटोही ट्विट केला  (Rahul Gandhi) आहे. त्यात कोणत्या वस्तूंवर किती टक्के जीएसटी आकारला जातो याचे स्पष्टीकरण दिले आहे.

दरम्यान केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, भारतात आतापर्यंत 543 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर तब्बल 17 हजार जणांना कोरोनाची लागण झाली आहे. काल दिवसभरात 1 हजार 553 जणांना कोरोनाची लागण झाली. तर 36 लोकांना कोरोनामुळे जीव गमवावा लागला.

सुदैवाने आतापर्यंत 2 हजार 547 जण कोरोनामुक्त झाले आहे. गेल्या 24 तासात 316 जणांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.

महाराष्ट्रात 4 हजारपेक्षा जास्त रुग्ण

तर महाराष्ट्रात कोरोनाबाधितांचा आकड्याने 4 हजारचा  (Rahul Gandhi) टप्पा ओलांडला आहे. काल (20 एप्रिल) राज्यात नव्या 552 कोरोनाग्रस्त रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 4 हजार 200 झाली आहे. तर दुसरीकडे कोरोनाबळींची संख्या ही 223 वर पोहोचली आहे.

राज्यात कोरोनाचे हॉटस्पॉट ठरलेल्या मुंबईतील रुग्णांमध्येही झपाट्याने वाढ होत आहे. गेल्या 24 तासात मुंबईत 456 जणांचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे मुंबईतील कोरोनाबाधितांचा आकडा 2 हजार 724 वर पोहोचला (Corona Virus Equipment GST Free) आहे.

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें