AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नोकरदांसाठी आनंदाची बातमी! PF खात्यासाठी सुरू झाली WhatsApp सर्व्हिस

ईपीएफओने आपल्या ग्राहकांपर्यंत आणखी सहजरित्या पोहोचण्यासाठी व्हॉट्सअ‍ॅप हेल्पलाईन सर्व्हिस सुरू केली आहे. या प्रणालीला सुरू करण्यामागे ग्राहकांचं आणि सुरक्षा आहे.

नोकरदांसाठी आनंदाची बातमी! PF खात्यासाठी सुरू झाली WhatsApp सर्व्हिस
या फीचरमध्ये सर्व ग्रुप चॅट्स आणि फॉरवर्ड केलेल्या मेसेजमुळे व्हॉट्सअ‍ॅप स्टोरेज अनेकदा फूल होतो. त्यामुळे हे नवीन फीचर वापरकर्त्यांसाठी तयार करण्यात आलं आहे. यामुळे मोबाइलमधील जागा मोकळी होण्यास मदत होईल.
| Edited By: | Updated on: Oct 14, 2020 | 11:39 AM
Share

नवी दिल्ली : कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संस्थेनं (EPFO) त्यांच्या ग्राहकांच्या तक्रारीनंतर तात्काळ बदल करत व्हॉट्सअ‍ॅप हेल्पलाईन सर्व्हिस (EPFO WhatsApp Helpline Service) सुरू केली आहे. केंद्रीय कामगार मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, ईपीएफओच्या दुसऱ्या माध्यमांमध्ये वारंवार ग्राहकांकडून तक्रार येत असल्यामुळे त्यांच्या समाधानासाठी ही सुविधा तयार करण्यात आली आहे. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ईपीएफओच्या ऑनलाइन तक्रारींचं समाधान पोर्टल (EPFIGMS Portal), सीपीजीआरएएमएस (CPGRAMS), सोशल मीडिया प्‍लेटफॉर्म फेसबुक आणि ट्विटर, 24 तास काम करणारे कॉलसेंटर्स ग्राहकांसाठी उपलब्ध असतात. (epfo launches whatsapp helpline service to resolve complaints list of numbers helpine number)

मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, ईपीएफओने आपल्या ग्राहकांपर्यंत आणखी सहजरित्या पोहोचण्यासाठी व्हॉट्सअ‍ॅप हेल्पलाईन सर्व्हिस सुरू केली आहे. या प्रणालीला सुरू करण्यामागे ग्राहकांचं हित आणि सुरक्षा आहे. या सुविधेमुळे आता घरबसल्या आपण ईपीएफओसंबंधी कोणतीही माहिती आणि मदत मिळवू शकतो.

सर्व 138 कार्यालयांमध्ये व्हॉट्सअ‍ॅप हेल्पलाईन सुरू व्हॉट्सअ‍ॅप हेल्पलाईन सर्व्हिसच्या माध्यमातून ग्राहक व्यक्तिगत पातळीवर त्यांच्या जवळील कार्यालयाशी थेट संपर्क साधू शकतात. आता ईपीएफओने त्यांच्या सगळ्या 138 क्षेत्रातील कार्यालयांमध्ये ही सर्व्हिस सुरू केली आहे. यामुळे ग्राहक त्यांच्या खात्यांसंबंधी कोणतीही माहिती आणि अपडेट घर बसल्या मिळवू शकतात. तुम्हाला काही तक्रार असेल तर त्यादेखील तुम्ही या सर्व्हिसच्या माध्यमातून सोडवू शकता.

अधिकृत वेबसाईटवर जारी केले स्थानिक कार्यालयांचे व्हॉट्सअ‍ॅप नंबर ईपीएफओने त्यांच्या अधिकृत वेबसाईटवरून सर्व स्थानिक कार्यालयांचे व्हॉट्सअ‍ॅप नंबर जारी केली आहेत. ग्राहकांनी व्हॉट्सअ‍ॅपद्वारे विचारलेल्या प्रश्नांना तात्काळ योग्य उत्तर देण्यासाठी एक खास टीम तयार करण्यात आली आहे.

सगळ्यात खास बाब म्हणजे व्हॉट्सअ‍ॅप हेल्पलाईन सर्व्हिस करताच ईपीएफओने आतापर्यंत 1,64,040 पेक्षाही जास्त ग्राहकांच्या प्रश्नांना उत्तर दिलं आहे. तर व्हॉट्सअ‍ॅप सर्व्हिस सुरू झाल्यामुळे फेसबूक आणि ट्विटरसारख्या सोशल माध्यमांवर तक्रारींचं प्रमाण 30 टक्के कमी झालं आहे. दरम्यान, महाराष्ट्रातील ग्राहकांसाठी काय आहेत हेल्पलाईन नंबर पाहुयात.

इतर बातम्या – 

पुण्यासह राज्यात पुढचे 4 दिवस अतिवृष्टीचा इशारा, हवामान विभागाकडून रेड अलर्ट जारी

आजच करा जनधन खात्याशी Aadhaar लिंक, मिळतील 5000 रुपये

(epfo launches whatsapp helpline service to resolve complaints list of numbers helpine number)

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.