AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

US Presidential Election: अमेरिका राष्ट्राध्यक्ष निवडणुकीसाठी फेसबूकचा राजकीय जाहिरातींबद्दल मोठा निर्णय

मतदानानंतरच्या राजकीय जाहिरातींवर बंदी घालण्याचा निर्णय फेसबूकने घेतला आहे. यासंबधी फेसबूककडून नवीन नियम बनवण्यात येत आहेत.

US Presidential Election: अमेरिका राष्ट्राध्यक्ष निवडणुकीसाठी फेसबूकचा राजकीय जाहिरातींबद्दल मोठा निर्णय
फेसबुकचे स्मार्टवॉच येणार
| Updated on: Oct 08, 2020 | 5:23 PM
Share

न्यूयॉर्क : फेसबूक (Facebook) ने यावर्षी होणाऱ्या अमेरिकेतील राष्ट्राध्यक्ष पदाची निवडणूक (Presidential Election) प्रभावित होऊ नये म्हणून मोठा निर्णय घेतला आहे. मतदानानंतरच्या राजकीय जाहिरातींवर बंदी घालण्याचा निर्णय फेसबूकने घेतला आहे. यासंबधी फेसबूककडून नवीन नियम बनवण्यात येत आहेत. (facebook will ban political advertisements after voting in us presidential election)

मतदानानंतर निकाल जाहीर होण्यापूर्वी विजयी झाल्याचे घोषित करणाऱ्या उमेदवारांवर नियंत्रण ठेवण्यास नव्या नियमांमुळे फेसबूकला मदत होणार आहे. अमेरिकेत 3 नोव्हेंबरला मतदान होत आहे. या मतदानानंतर राजकीय जाहिरातीवंर बंदी घालण्यात येणार आहे. राजकीय जाहिरातींवरील बंदी एक आठवडाभर राहणार आहे. मात्र, गरज पडल्यास बंदी वाढवण्यात येऊ शकते.

फेसबूकने निवडणुकीच्या निकालांवर शंका उपस्थित करणाऱ्या पोस्ट रोखण्यासाठी नवीन योजना बनवली आहे. फेसबूक कडून यापूर्वीच मतदान केंद्रावर शस्त्र घेऊन जाणाऱ्या संदेशांवर प्रतिबंध आणले आहेत.

दरम्यान, अमेरिकेतील राष्ट्राध्यक्ष निवडणुकीतील प्रेसिडेंशियल डिबेटस ला सुरुवात झाली आहे. उपराष्ट्रपतीपदासाठी भारतीय वंशाच्या कमला हॅरिस डेमॉक्रॅटिक पक्षाकडून निवडणूक लढवत आहेत. त्यांच्या विरोधात सत्ताधारी रिपब्लिकनचे माईक पेन्स निवडणूक लढवत आहेत.

ट्रम्पचा चीनला इशारा

काही दिवसांपूर्वीच ट्रम्प यांना कोरोनाची लागण झाली असून ते अजून पूर्णपणे बरे झालेले नाहीत. परंतु, अमेरिकेतील आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ते व्हाईट हाऊसमध्ये पुन्हा परतले आहेत. दरम्यान त्यांनी शेअर केलेल्या एका व्हिडीओत म्हटले आहे की, मला झालेला कोरोना म्हणजे ईश्वराचा आशीर्वाद आहे, कारण त्यामुळे मला खूप काही शिकायला मिळालं आहे. या रोगावरील उपचारासाठीच्या संभाव्य औषधांबाबत मला शिकायला मिळालं.

संबंधित बातम्या:

चीनला कोरोना महामारीची मोठी किंमत मोजावी लागेल; डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी

Donald Trump | अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना कोरोना, फर्स्ट लेडीसह क्वारंटाईन

(facebook will ban political advertisements after voting in us presidential election)

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.