ना दुष्काळी पथकाकडून पाहणी, ना भेट, शेतकरी दाम्पत्य 10 तास ताटकळत

सचिन पाटील

|

Updated on: Jul 05, 2019 | 4:49 PM

सोलापूर: दुष्काळाची पाहणी करण्यासाठी आलेल्या केंद्राच्या पथकांसाठी शेतकरी दाम्पंत्याला 10 तास ताटकळत ठेवले. केंद्राचे आलेले पथक तुमच्या शेताची पाहणी करणार आहे, तुमच्याशी बोलणार आहेत, असे सांगून शेतातच बसवून ठेवलेल्या शेतकऱ्याला न भेटताच पथक दुसऱ्याच रस्त्याने निघून गेले.  अधिकारी येतील, भेटतील आणि दुष्काळी मदत मिळेल, या आशेने बसलेल्या शेतकरी दाम्पत्याचा दहा तास वाट पाहूनही हिरमोड झाला. […]

ना दुष्काळी पथकाकडून पाहणी, ना भेट, शेतकरी दाम्पत्य 10 तास ताटकळत

सोलापूर: दुष्काळाची पाहणी करण्यासाठी आलेल्या केंद्राच्या पथकांसाठी शेतकरी दाम्पंत्याला 10 तास ताटकळत ठेवले. केंद्राचे आलेले पथक तुमच्या शेताची पाहणी करणार आहे, तुमच्याशी बोलणार आहेत, असे सांगून शेतातच बसवून ठेवलेल्या शेतकऱ्याला न भेटताच पथक दुसऱ्याच रस्त्याने निघून गेले.  अधिकारी येतील, भेटतील आणि दुष्काळी मदत मिळेल, या आशेने बसलेल्या शेतकरी दाम्पत्याचा दहा तास वाट पाहूनही हिरमोड झाला. हा सर्वप्रकार 5 डिसेंबर रोजी सोलापूर जिल्ह्यात घडला.

सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळाची पाहणी करण्यासाठी केंद्राचे पथक दोन दिवसाच्या दौऱ्यावर आले होते. 5 डिसेंबर रोजी अहमदनगर येथून सोलापूर जिल्ह्यात प्रवेश केल्यानंतर, करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांशी संवाद साधण्याचे नियोजन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले होते. पथकातील अधिकाऱ्यांना त्रास होऊ नये यासाठी करमाळा तालुक्यातील सालसे येथील आजिनाथ पाटील यांच्या शेतावर जाऊन त्यांच्यासोबत चर्चा करण्याचे नियोजन करण्यात आले होते.

आजिनाथ पाटील यांचे शेत निवडण्याचे कारण म्हणजे पाटील यांचे शेत हे करमाळा – कुर्डूवाडी या राज्य महामार्गावर येते. शेत महामार्गावर असल्यामुळे अधिकाऱ्यांना त्रास होणार नाही आणि पाहणी देखील उभ्या उभ्या पूर्ण होईल, यामुळेच आजिनाथ पाटील यांच्या शेताची निवड करण्यात आली होती.

आजिनाथ पाटील यांच्या शेतात केंद्राचे पाहणी पथक येणार म्हटल्यावर त्याची माहिती सालसे गावातील सर्वांना कळाली. गावातील सरपंच, ग्रामसेवक, तलाठी यांच्यासह अनेक जण आजिनाथ पाटील यांच्या वस्तीवर येऊन बसले. गावातील मंडळी तसेच प्रशासनातील अधिकाऱी हे शेतावर आल्यामुळे त्यांना चहापान करण्यातच अलकाबाई पाटील यांचा बराचसा वेळ गेला.

केंद्रीय पथक आता येईल मग येईल म्हणत सकाळी आठपासून वाट पाहत असलेले पाटील दाम्पत्य, रात्री आठवाजेपर्यंत शेतातच होते. पथक येणार आहे कुठे जाऊ नका … आता पथक येणार आहे कुठे जाऊ नका असं म्हणत पाटील यांना कुठेही हलू दिले नाही. मात्र रात्री आठ वाजेपर्यंत पथक काही आले नाही आणि शेवटी पाटील दाम्पत्यांची आणि केंद्राच्या दुष्काळी पाहणी पथकाची काही भेट झाली नाही.

अहमदनगरवरुनच पथकाला येण्यास उशीर झाल्यामुळे, जिल्ह्याच्या दौऱ्यावर असेलेल्या या पथकाने सोलापूर जिल्ह्यातील दौऱ्याच्या पहिल्या दिवशी शेतकऱ्यांशी 10 ते 15 मिनिटं संवाद साधला आणि पथक मुक्कामासाठी पंढरपूरकडे निघून गेले.

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI