AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अंबरनाथमध्ये अस्वच्छ पाण्याच्या बाटल्यांचे अनधिकृतपणे उत्पादन, एफडीएकडून कारखान्यावर धाड

अंबरनाथमध्ये अनधिकृतपणे सीलबंद पाण्याच्या बाटल्यांचं उत्पादन करणाऱ्या कंपनीवर धाड टाकण्यात (FDA Raid on water bottel factory) आली आहे.

अंबरनाथमध्ये अस्वच्छ पाण्याच्या बाटल्यांचे अनधिकृतपणे उत्पादन, एफडीएकडून कारखान्यावर धाड
| Edited By: | Updated on: Mar 16, 2020 | 7:10 PM
Share

अंबरनाथ : अंबरनाथमध्ये अनधिकृतपणे सीलबंद पाण्याच्या बाटल्यांचं उत्पादन करणाऱ्या कंपनीवर धाड टाकण्यात (FDA Raid on water bottel factory) आली आहे. एमपीसीबी, एफडीए आणि अंबरनाथ नगरपालिकेनं संयुक्तपणे ही कारवाई केली आहे. या कारखान्यात गलिच्छ जागेत विनापरवाना उत्पादन केले जाते होते. या कारखान्यातील सर्व पाण्याच्या बाटल्या जप्त केल्या असून अधिक (FDA Raid on water bottel factory) चौकशी सुरु आहे.

अंबरनाथ पूर्वेच्या बारकू पाडा परिसरात हा कारखाना गेली अनेक वर्षे सुरू होता. याच कारखान्यात तयार झालेल्या पाण्याच्या बाटलीत फुल आढळल्यानंतर त्याची तक्रार करण्यात आली होती. त्यानंतर कारखान्यावर धाड मारण्यात आली. यावेळी अतिशय अस्वच्छ जागेत बोअरिंगच्या पाण्याने या बाटल्या भरल्या जात असल्याचं समोर आलं.

या कारखान्याकडे फक्त 200 आणि 500 मिली बाटल्यांच्या उत्पादनाचा परवाना आहे. तरी सर्रासपणे 1 आणि 20 लिटरच्या बाटल्यांचं उत्पादन सुरू होतं. याशिवाय बंदी घालण्यात आलेले प्लॅस्टिक पाण्याचे पाऊचही मोठ्या प्रमाणात आढळून आले.

या कारखान्याच्या बाजूलाच असलेल्या पेप्सी कोला कारखान्यावरही धाड मारण्यात आली. यावेळी अत्यंत घाणेरड्या जागेत हे उत्पादन सुरू असल्याचं आणि सांडपाण्याची योग्य विल्हेवाट लावली जात नसल्याचं निदर्शनास आल्यानं या कारखान्यावरही कारवाई करण्यात आली.

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.