Fire | हैदराबादमध्ये केमिकल फॅक्टरीत रिअ‍ॅक्टरचा स्फोट, भीषण आगीत अनेक जण जखमी

हैदराबादच्या (Hyderabad) सीमेवरील भागात औद्योगिक क्षेत्रात असलेल्या एका केमिकल फॅक्टरीत (Chemical factory fire) भीषण आग लागली आहे.

Fire | हैदराबादमध्ये केमिकल फॅक्टरीत रिअ‍ॅक्टरचा स्फोट, भीषण आगीत अनेक जण जखमी
Follow us
| Updated on: Dec 12, 2020 | 4:14 PM

हैदाराबाद : हैदराबादच्या (Hyderabad) सीमेवरील भागात औद्योगिक क्षेत्रात असलेल्या एका केमिकल फॅक्टरीत (Chemical factory fire) भीषण आग लागली आहे. फॅक्टरीतील रिअ‍ॅक्टरचा स्फोट झाल्याने ही आग लागली. या आगीत अनेक लोक जखमी झाले आहेत. संगारेड्डी जिल्ह्यातील आयडीए बोलाराम इंडस्ट्रियल भागात (Bolarum factory fire) ही आगीची घटना घडली. रिअ‍ॅक्टरच्या स्फोटाने परिसरात भीतीचं वातावरण तयार झालं आहे (Fire in Bolarum Chemical factory Hyderabad due to explosion in reactor ).

फॅक्टरीत स्फोट झाला तेव्हा अनेक कामगार काम करत होते. या स्फोटात अनेक जण जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. घटनास्थळावर अग्निशमन दलाच्या गाड्या पोहचल्या असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु आहेत.

या आगीत आतापर्यंत नेमके किती लोक जखमी झाले आहेत याची अधिकृत माहिती येणं बाकी आहे. असं असलं तरी हा स्फोट खूप मोठा असल्याचं प्रत्यक्षदर्शी सांगत आहेत. फॅक्टरीत हा स्फोट झाल्यानंतर आगीच्या ज्वाळा खूप वेगाने आजूबाजूच्या परिसरात पसरल्या. यानंतर आकाशात धुराचे प्रचंड मोठे लोटही दिसत आहेत.

या घटनेनंतर आजूबाजूच्या परिसरातील लोकांमध्ये एकच गोंधळ उडाला. जखमी झालेल्या कामगारांना रुग्णालयात हलवले जात आहे. या फॅक्टरीतील 2 रिअ‍ॅक्टरचा स्फोट झाल्याने ही आगीची घटना घडल्याची प्राथमिक माहिती आहे.

हेही वाचा :

Fire | गुजरातमध्ये बहुमजली इमारतीला भीषण आग, एटीएमसह अनेक दुकानं जळून राख

लालबागमध्ये गणेश गल्लीत आगीचा भडका, एका महिलेचा मृत्यू, तर 9 जणांची प्रकृती गंभीर

भीषण आगीत भाताचं पीक जळून खाक; शेतकऱ्याला अडीच लाखाचा फटका

व्हिडीओ पाहा :

Fire in Bolarum Chemical factory Hyderabad due to explosion in reactor

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.