सीबीआयच्या माजी संचालकांचा संशयास्पद मृत्यू, आत्महत्येची शक्यता

मणिपूर आणि नागालँडचे माजी राज्यपाल आणि सीबीआयचे माजी संचालक अश्वनी कुमार यांचा संशयास्पद मृत्यू झाला आहे (Former CBI director Ashwani Kumar found dead at Shimla residence).

सीबीआयच्या माजी संचालकांचा संशयास्पद मृत्यू, आत्महत्येची शक्यता

मुंबई : मणिपूर आणि नागालँडचे माजी राज्यपाल आणि सीबीआयचे माजी संचालक अश्वनी कुमार यांचा संशयास्पद मृत्यू झाला आहे (Former CBI director Ashwani Kumar found dead at Shimla residence). शिमला येथील त्यांच्या घरी ते मृतावस्थेत आढळून आले. शिमलाचे पोलीस अधीक्षक मोहिम शिमला यांनी याबाबत माहिती दिली.

अश्वनी कुमार हिमाचल प्रदेशचे पोलीस महासंचालक देखील होते. त्याआधी ऑगस्ट 2008 ते नोव्हेंबर 2010 या काळात ते सीबीआयचे संचालक होते.

अश्वनी कुमार यांनी आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. त्यांचा मृतदेह शिमलामधील ब्रोंकोहर्स्ट येथील आपल्या घरात फासावर लटकलेल्या आढळला आहे. शिमलाचे पोलीस अधीक्षक मोहित चावला म्हणाले, “मणिपूर आणि नागालँडचे माजी राज्यपाल आणि माजी सीबीआय संचालक अश्वनी कुमार यांचा मृतदेह शिमला येथील घरात फाशी घेतलेल्या स्थितीत आढळला आहे.”

पोलिसांना घटनास्थळावर एक सुसाईड नोटही मिळाली आहे. यात म्हटलं आहे, “मला माझ्या कुटुंबावर ओझं व्हायचं नाही. जीवनाला कंटाळून पुढील यात्रेसाठी जात आहे.” मागील काही दिवसांपासून अश्वनी कुमार नैराश्यात असल्याचंही सांगितलं जात आहे.

अश्वनी कुमार यांच्याकडून अनेक हाय प्रोफाईल प्रकरणांचा तपास

अश्वनी कुमार हे अत्यंत सुसंस्कृत आणि गंभीर व्यक्ती मानले जात होते. ते कमी बोलायचे, मात्र नेहमी हसतमुख असायचे. CBI संचालक म्हणून काम पाहताना त्यांच्या कार्यकाळात अनेक हाय प्रोफाईल प्रकरणांमध्ये गुन्हे दाखल झाले होते.

हेही वाचा :

सुशांतने आत्महत्या केल्याचं मुंबई पोलिसांचा दोन दिवसांत निष्कर्ष, तर सीबीआयला दोन महिने लागले: भुजबळ

सुशांतप्रकरणी CBI चौकशीत काय झाले?, खोदा पहाड, निकला चुहा, गुलाबराव पाटलांचा भाजपला टोला

काँग्रेस नेते डीके शिवकुमार यांच्या 14 ठिकाणांवर सीबीआयचा छापा, 50 लाख रुपये जप्त

Former CBI director Ashwani Kumar found dead at Shimla residence

Published On - 9:35 pm, Wed, 7 October 20

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI