सुशांतप्रकरणी CBI चौकशीत काय झाले?, खोदा पहाड, निकला चुहा, गुलाबराव पाटलांचा भाजपला टोला

भाजपने सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचे राजकारण केल्यावरुन शिवसेना नेते गुलाबराव पाटलांनी टीका केली आहे. एम्सच्या अहवालानंतर महाविकासआघाडीचे नेते भाजपविरोधात आक्रमक झाले आहेत. (Gulabrao Patil Criticizes bjp on sushant singh rajput case)

सुशांतप्रकरणी CBI चौकशीत काय झाले?, खोदा पहाड, निकला चुहा, गुलाबराव पाटलांचा भाजपला टोला
Follow us
| Updated on: Oct 05, 2020 | 8:33 PM

जळगाव : सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणी दीड महिन्यांपासून सुरू असलेल्या सीबीआय चौकशीत काय झाले? खोदा पहाड, निकला चुहां, अशा शब्दात शिवसेनेचे प्रवक्ते आणि पाणी पुरवठा आणि स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी भाजपला टोला लगावला. सुशांतसिंहचा मृत्यू आत्महत्येमुळे झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर शिवसेनेकडून भाजपवर जोरदार टीका करण्यात येत आहे. ( Gulabrao Patil criticise BJP for using Sushant Singh death for politics)

आम्ही सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात काहीही तथ्य नसल्याचे सुरुवातीपासूनच सांगत होतो. भाजपने या प्रकरणाचा राजकीय हेतू साध्य करण्यासाठी वापर केला. आता या प्रकरणाचे ‘दूध का दूध आणि पाणी का पाणी’ झाले आहे, असे गुलाबराव पाटील यांनी सांगतिले. भाजपकडून सुंशांतसिह आत्महत्या प्रकरणाचा वापर बिहारच्या राजकारणासाठी करण्यात आला.

मंत्रालयात आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याच्या कुटुंबाला राज्यपालांनी भेट दिली का? राज्यपालांनी कंगना रणौतला भेट दिली, हे राजकारण होते. महाराष्ट्राच्या पोलिसांना सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात बदनाम केले गेले. पोलिसांनी काहीच केले नसल्याच्या आरोप केला गेला. मात्र, सीबीआय चौकशीत गेल्या दीड महिन्यात काय झाले, असा सवाल गुलाबराव पाटील यांनी केला.

मंत्री गुलाबराव पाटील आणि शिवसेनेचे जळगाव जिल्हा संपर्कप्रमुख संजय सावंत यांनी सोमवारी दुपारी जळगावातील अजिंठा शासकीय विश्रामगृहात शिवसेनेच्या जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांसह, नगरसेवक व कार्यकर्त्यांची बैठक घेतली. या बैठकीनंतर गुलाबराव पाटील पत्रकारांशी बोलत होते. यावेळी त्यांनी सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणावरून भाजपवर टीका केली.

एम्सच्या अहवालानंतर महाविकासआघाडीचे नेते आक्रमक

एम्सच्या अहवालातून सुशांतची हत्या झाल्याची थेअरी नाकारण्यात आली. त्यानंतर महाविकासआघाडीचे नेते आक्रमक झाले. सुशांत प्रकरणाच्या तपासादरम्यान छाती बडवून घेणारे आता का गप्प? असा सवाल शिवसेना नेते आणि परिवहन मंत्री अनिल परबांनी उपस्थित केला. एम्सच्या अहवालानंतर सुशांत प्रकरणात महाराष्ट्र पोलिसांनी योग्य तपास केल्याचं सिद्ध झाल्याचं नवाब मलिकांनी सांगितले. महाराष्ट्र पोलिसांची बदनामी करणाऱ्यांनी जाहीर माफी मागावी, अशी मागणी राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवारांनी केली. सुशांत प्रकरण लांबवणं हे भाजपचं षडयंत्र आहे, असा आरोप काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंतानी केला.

संबंधित बातम्या:

Sushant Singh Rajput Case | सुशांतचा सीबीआय अहवाल लवकरात लवकर यावा; जनतेला सत्य समजलंच पाहिजे : अनिल देशमुख

सुशांतची हत्या नव्हे आत्महत्याच, एम्सचा रिपोर्ट, आघाडीच्या नेत्यांची भाजपकडे माफीची मागणी

( Gulabrao Patil criticise BJP for using Sushant Singh death for politics)

Non Stop LIVE Update
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.
ही धमकी समजा नाहीतर... , राज ठाकरेंच्या टीकेवरून मनसेचा राऊतांना इशारा
ही धमकी समजा नाहीतर... , राज ठाकरेंच्या टीकेवरून मनसेचा राऊतांना इशारा.
सांगलीत तिहेरी लढत, मविआतच बंड अन् ठाकरेंचं वाढलं टेन्शन
सांगलीत तिहेरी लढत, मविआतच बंड अन् ठाकरेंचं वाढलं टेन्शन.
अमरावतीत शरद पवारांचा माफीनामा, ... तेव्हा चूक झाली, यापुढं होणार नाही
अमरावतीत शरद पवारांचा माफीनामा, ... तेव्हा चूक झाली, यापुढं होणार नाही.