Keshubhai Patel | गुजरातचे माजी मुख्यमंत्री केशुभाई पटेल यांचे निधन

गुजरातचे माजी मुख्यमंत्री आणि राज्याचे दिग्गज नेते केशुभाई पटेल यांचे आज गुरुवार (29 ऑक्टोबर) निधन झाले. (Former Gujarat chief minister Keshubhai Patel Passed Away)

Keshubhai Patel | गुजरातचे माजी मुख्यमंत्री केशुभाई पटेल यांचे निधन
Namrata Patil

|

Oct 29, 2020 | 1:18 PM

गांधीनगर (गुजरात) : गुजरातचे माजी मुख्यमंत्री आणि राज्याचे दिग्गज नेते केशुभाई पटेल यांचे आज गुरुवार (29 ऑक्टोबर) निधन झाले. ते 92 वर्षांचे होते. गुरुवारी त्यांना श्वास घेण्यास त्रास होत असल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र रुग्णालयातच त्यांची प्राणज्योत मालवली. (Former Gujarat chief minister Keshubhai Patel Passed Away)

काही दिवसांपूर्वी केशुभाई यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर त्यांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात केली होती.  त्यांच्या निधनानंतर गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी केशुभाईंना श्रद्धांजली वाहिली. तसेच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी त्यांच्या निधनावर शोक व्यक्त केला.

केशुभाई यांच्या मुलाने दिलेल्या माहितीनुसार, कोरोनावर मात केल्यानंतर त्यांची तब्ब्येत जास्त बिघडली होती. त्यांना आज सकाळी अचानक श्वास घेण्यास त्रास जाणवू लागला. त्यानंतर आम्ही त्यांना रुग्णालयात दाखल केले. मात्र त्यांनी उपाचाराला काहीही प्रतिसाद दिला नाही आणि रुग्णालयातच त्यांची प्राणज्योत मालवली.

केशुभाई पटेल यांचा अल्पपरिचय

केशुभाई पटेल यांचा जन्म 24 जुलै 1928 रोजी जुनागढ येथे झाला. त्यांनी लहान वयातच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक म्हणून प्रवेश केला होता. त्यानंतर जनसंघ आणि भाजपासोबत ते मोठ्या काळासाठी जोडले गेले होते. केशुभाई पटेल हे दिग्गज नेत्यांपैकी एक मानले जात होते. राज्यात भाजपाकडून पहिले मुख्यमंत्रीही तेच होते. काही कारणास्तव 2012 मध्ये केशुभाई पटेल यांनी आपल्या गुजरात परिवर्तन पार्टीची स्थापना केली होती. पण दोन वर्षांतच त्यांनी आपला पक्ष भाजपामध्ये विलिन केला होता.

केशुभाई पटेल यांनी दोनवेळा गुजरातचे मुख्यमंत्रीपद भूषवलं. 1995 आणि 1998 या वर्षात ते मुख्यमंत्रिपदी विराजमान झाले. पण 2001 मध्ये त्यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला होता. विशेष म्हणजे दोन्ही वेळा त्यांना त्यांचा मुख्यमंत्रिपदाचा पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करता आला नव्हता. याव्यतिरिक्त त्यांनी गुजरातचं उपमुख्यमंत्रिपदही भूषवलं होतं. 2001 मध्ये केशुभाई पटेल यांच्या राजीनाम्यानंतर नरेंद्र मोदी यांची मुख्यमंत्रीपदी निवड करण्यात आली होती.

केशुभाई पटेल यांच्या निधनाबद्दल राज्यपालांना दुःख

गुजरातचे माजी मुख्यमंत्री केशुभाई पटेल यांच्या निधनाबद्दल महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी दुःख व्यक्त केले आहे. केशुभाई पटेल एक लोकप्रिय नेते व कुशल संघटक होते. त्यांना विकासाची दृष्टी होती तसेच जनसामान्यांच्या प्रश्नाची जाण होती. दीर्घ काळ गुजरात विधानसभेचे सदस्य असलेल्या केशुभाई पटेल यांनी अखेरपर्यंत जनतेची सेवा केली. त्यांच्या निधनामुळे गुजरातच्या राजकारणातील एक मोठे पर्व संपले आहे. त्यांच्या स्मृतींना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो, असे राज्यपाल म्हणाले. (Former Gujarat chief minister Keshubhai Patel Passed Away)

संबंधित बातम्या : 

राज्यपाल नियुक्त विधानपरिषद आमदार : काँग्रेसच्या तिघा नेत्यांवर हायकमांडचे शिक्कामोर्तब, कोणाकोणाची वर्णी?

भारत 2024 पर्यंत 5 ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेचं लक्ष्य पूर्ण करणार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दावा

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें