चीनला धूळ चारण्यासाठी जगातल्या चार सर्वात शक्तिशाली नौदलांची एकी, समुद्रात युद्धाभ्यास होणार

हिंद महासागरात चीन डाव खेळत असला तरी दक्षिण चिनी समुद्रात डाव खेळण्याआधीच चीन गारद झाला आहे (Four most powerful navies in the world).

चीनला धूळ चारण्यासाठी जगातल्या चार सर्वात शक्तिशाली नौदलांची एकी, समुद्रात युद्धाभ्यास होणार

मुंबई : हिंद महासागरात चीन डाव खेळत असला तरी दक्षिण चिनी समुद्रात डाव खेळण्याआधीच चीन गारद झाला आहे. कारण, या भागात जगातल्या चार सर्वात शक्तिशाली नौदलांनी एकत्र येणं, ही चीनसाठी धोक्याची घंटा आहे (Four most powerful navies in the world).

पश्चिम भाग आणि अरबी समुद्रादरम्यानचा हा विशाल भाग मालाबार नावानं ओळखला जातो. याच मालाबारमध्ये वर्षाच्या शेवटी युद्धाभ्यास होणार आहे. या युद्भाभ्यासामुळे आत्तापासूनच चीनच्या कपाळावर चिंतेच्या सुरकुत्या आल्या आहेत.

भारताबरोबरच अमेरिका, जपान आणि ऑस्ट्रेलियाची नेव्ही एकत्रितपणे मालाबारमध्ये युद्धसराव करणार आहेत. या चारही देशांचं वैशिष्ठ्य म्हणजे सध्या चीननं या चारही देशांसोबत पंगा घेतला आहे (Four most powerful navies in the world).

हेही वाचा : पुरावे मिटवण्यासाठी चीनने वुहानमध्ये महापूर आणला?

2017 मध्येच भारत, अमेरिका, जपान आणि ऑस्ट्रेलिया हे चारही देश संस्थात्मक पातळीवर एकत्र आले होते. हिंद-प्रशांत महासागरात चीनच्या दादागिरीवर नजर ठेवणं हा त्यामागचा मूळ हेतू होता. मात्र ऑस्ट्रेलिया आणि चीनचे संबंध दरम्यानच्या काळात सुधारले. त्यामुळे ऑस्ट्रेलिया यातून विलप्त राहायचा. पण आता चीनचे ऑस्ट्रेलियासोबतसुद्धा खटके उडाल्यामुळे 2017 मध्ये सुरु झालेलं काम पुन्हा जोमानं सुरु झालं.

TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज!

ऑक्टोबर ते डिसेंबर या दरम्यान कोणत्याही वेळी हा युद्धाभ्यास सुरु होणार आहे. आजपर्यंत मालाबारमध्ये संयुक्त सराव व्हायचा, मात्र त्याचं स्वरुप अतिशय मर्यादीत होतं. चीनसोबतच्या व्यापारी संबंधांमुळे अनेक धोरणं मवाळ करावी लागली होती. मात्र भारत, ऑस्ट्रेलिया आणि अमेरिका या तिन्ही देशांमधलं व्यापार युद्धसुद्धा खुलेआमपणे सुरु झालं. आता चारही देशांकडे चीनविरोधात ठोस कारणंसुद्धा आहेत.

ऑस्ट्रेलियाला चीनकडून होणाऱ्या सायबर हल्ल्याचा बदला घ्यायचा आहे. जपानला बेटांवर सुरु असणाऱ्या चीनी घुसखोरीला उत्तर द्यायचं आहे. अमेरिकेला कोरोनावरुन चीनचा हिशेब चुकता करायचा आहे. तर भारताला चीनकडून लडाखच्या घुसखोरीचा वचपा काढायचा आहे.

हेही वाचा : अमेरिकेतील परदेशी विद्यार्थ्यांना मोठा दिलासा, डोनाल्ड ट्रम्प यांचा ‘तो’ निर्णय अखेर मागे

Published On - 3:00 pm, Thu, 16 July 20

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI