झारखंडमध्ये नवऱ्यासमोर पत्नीचा 17 जणांकडून बलात्कार, महिला आयोगाने अहवाल मागवला

पुन्हा एकदा सामूहिक बलात्काराच्या घटनेने देशवासीयांची मान लज्जेने खाली झुकली आहे. झारखंडमध्ये मंगळवारी (8 डिसेंबर) दुमका जिल्ह्यातील घांसीपूर गावात एका महिलेवर 17 जणांनी सामूहिक बलात्कार केला.

झारखंडमध्ये नवऱ्यासमोर पत्नीचा 17 जणांकडून बलात्कार, महिला आयोगाने अहवाल मागवला

रांची : पुन्हा एकदा सामूहिक बलात्काराच्या घटनेने देशवासीयांची मान लज्जेने खाली झुकली आहे. झारखंडमध्ये मंगळवारी (8 डिसेंबर) दुमका जिल्ह्यातील घांसीपूर गावात एका महिलेवर 17 जणांनी सामूहिक बलात्कार केला. आरोपींनी महिलेच्या पतीला बांधून त्यांच्यासमोरच त्यांच्या पत्नीवर अत्याचार केले. यानंतर सर्व आरोपी फरार आहेत (Gang rape of a women in Jharkhand by 17 men NCW ask for action report).

17 आरोपींपैकी आतापर्यंत केवळ एकाच आरोपीची ओळख पटली आहे. या आरोपीचं नाव रामू मोहली (गोलपूर) असं आहे. असं असलं तरी अद्याप एकाही आरोपीला अटक झालेली नाही. या घटनेने संपूर्ण राज्यातील कायदा सुव्यवस्थेवरच प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे. दुमकाचे पोलीस उप महासंचालक सुदर्शन प्रसाद मंडल म्हणाले, “पीडित महिलेने सामूहिक बलात्कारीची तक्रार नोंदवली आहे. पोलिसांनी आरोपींविरोधात गुन्हा दाखल होताच तपास सुरु केला आहे.” मिळालेल्या माहितीनुसार, महिलेचं वय 35 वर्षे असून त्यांना 5 मुलं आहेत.

सामूहिक बलात्काराच्या या घटनेनंतर संबंधित गावातील गावकऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष आहे. दुसरीकडे या प्रकरणाची राष्ट्रीय महिला आयोगानेही दखल घेतली आहे. आयोगाने राज्याच्या पोलीस महासंचालकांकडे आतापर्यंत काय कारवाई केली याबाबतचा अहवाल मागितला आहे. तसेच पोलीस विभागाला पत्र लिहून केंद्रीय गृह मंत्रालयाच्या मार्गदर्शक सुचनांप्रमाणे या प्रकरणाचा तपास पुढील 2 महिन्यात पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत.

या अत्याचाराच्या घटनेनंतर झारखंडमधील राजकीय वातावरणही तापलं आहे. राज्यातील विरोधी पक्ष भाजपने या घटनेवरुन झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन सरकारवर जोरदार टीका केली आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष दीपक प्रकाश यांनी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या मौनावर प्रश्न उपस्थित केले आहेत. दीपक प्रकाश यांनी ट्वीट करत म्हटलं, “किती दिवस महिलांची इज्जत अशीच लुटली जाणार आहे? मुख्यमंत्री किती दिवस मौनी बाबा बनून शांत राहणार आहेत? जेव्हापासून हे सरकार आलंय, झारखंडमध्ये प्रत्येक प्रकारच्या गुन्ह्यांचं प्रमाण वाढलं आहे. मात्र, सरकार केवळ बेकायदेशीर खाणकाम आणि लाच घेण्याचं काम करत आहे.”

संबंधित बातम्या :

मेळघाटात महिलेवर सामूहिक बलात्कार, तात्काळ कारवाई करा, भाजपचा तीव्र आंदोलनाचा इशारा

Anushka Sharma| पालकांनो, मुलांना स्त्रियांचा सन्मान करायला शिकवा, अनुष्का शर्माची संतप्त प्रतिक्रिया!

पोलिसांनी धमकावलं, पीडित कुटुंबाचा गंभीर आरोप; हाथरसमधून ‘टीव्ही9 मराठी’चा एक्सक्लुझिव्ह रिपोर्ट

Gang rape of a women in Jharkhand by 17 men NCW ask for action report

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI