कोल्हापुरात ‘मटण’ तिढा वाढला, बोलण्यात गुंतवून 7 बकऱ्या चोरल्या

वृद्ध व्यक्तीला बोलण्यात गुंतवून चोरट्यांनी इंडिकामधून थेट सात बकऱ्या चोरल्याचा प्रकार कोल्हापुरातील शाहूपुरीत घडला. पोलिसांनी अवघ्या तीन तासातच या चोरीचा छडा लावला आहे.

कोल्हापुरात 'मटण' तिढा वाढला, बोलण्यात गुंतवून 7 बकऱ्या चोरल्या
Follow us
| Updated on: Dec 23, 2019 | 11:11 PM

कोल्हापूर : मटण दरवाढीचा तिढा वाढलेला असतानाच कोल्हापुरात आता बकरी चोरीच्या घटनाही घडू लागल्या आहेत. नुकताच असाच एक गुन्हा शाहूपुरी पोलीस ठाण्यात दाखल झाला (Kolhapur Goat Steal). एका वृद्ध व्यक्तीला बोलण्यात गुंतवून चोरट्यांनी इंडिकामधून थेट सात बकऱ्या चोरल्याचा प्रकार कोल्हापुरातील शाहूपुरीत घडला. पोलिसांनी अवघ्या तीन तासातच या चोरीचा छडा लावला आहे. या प्रकरणी पोलिसांनी शिवाजी पांडुरंग कुंभार (वय 36) या चोरट्याला ताब्यात घेतलं आहे (Kolhapur Mutton Prices).

कोल्हापुरात आधीच मटण दराचा भडका उडाला आहे. त्यातच आता थर्टी फर्स्ट जवळ आला आहे. मग आता मटणाची व्यवस्था कशी करायची असा प्रश्न काही अवलिया खवय्यांना पडणं सहाजिकच आहे. त्यासाठी थेट बकऱ्यांची चोरी करण्याचा पर्याय त्यांनी निवडला आहे.

विचारे माळ इथले बाळू शिंदे कारंडे मळा परिसरात आपल्या बकरी चण्यासाठी घेऊन गेले होते. तेव्हा तिथे त्यांना शिवाजी पांडुरंग कुंभार भेटला. प्रकृती बरी नसल्याचा बहाणा करुन शिवाजी पांडुरंग कुंभारने बाळू शिंदे कारंडे यांच्याकडे औषध आणून देण्यासाठी विणवण्या केल्या. बाळू शिंदे कारंडे यांनी त्यांची विनंती ऐकून औषध आणण्यासाठी निघाले. मात्र, काही अंतरावर जाताच जेव्हा बाळू शिंदे कारंडे यांनी वळून पाहिले तर त्यांना त्यांच्या सात बकऱ्या, शिवाजी पांडुरंग कुंभार आणि त्याची गाडी तिथे नसल्याचं दिसलं. आपल्या सात बकऱ्या चोरीला गेल्याचं पाहून बाळू शिंदे कारंडे गोंधळून गेले. त्यांनी घरी येऊन ही सारी हकीगत सांगितली.

बकरी चोरीला गेली म्हटल्यावर हवालदिल झालेल्या शिंदेंना नगरसेविका आणि महापौर अॅड. सुरुमंजिरी लाटकर यांनी आधार दिला. कार्यकर्त्यांच्या प्रयत्नातून त्यांनी शोधाशोध केली. मात्र, काहीच हाती लागले नाही. अखेर बाळू शिंदे कारंडे यांनी महापौरांसोबत शाहूपुरी पोलीस ठाणे गाठले. पोलिसांनी तक्रारीची नोंद करून तपासाला सुरुवात केली. या चोरीचं सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी तपासलं आणि अवघ्या तीन तासात या गुन्ह्याचा छडा लावला. या प्रकरणी पोलिसांनी शिवाजी पांडुरंग कुंभार याला ताब्यात घेतलं. शिवाजी पांडुरंग कुंभार याने बकरी चोरीचं जे कारण सांगितलं, ते ऐकून पोलीस देखील आवाक झाले. मटणाचे भाव वाढल्याने शिवाजी पांडुरंग कुंभार याने ही चोरी केल्याच तपासात उघड झालं.

शिंदे कुटुंबियांना जीवापाड जपलेल्या बकऱ्या परत मिळाल्याचा आनंद आहेच. पण, मटण महागलं म्हणून बकऱ्या चोरून गरिबांच्या पोटावर लात मारू नका अशी विनंती ते चोरट्यांना करत आहेत. तेव्हा इरसाल खवय्यांनो थर्टी फस्टला मटण खा. मजा करा, पण असला भलता प्रयोग मात्र करू नका.

Kolhapur Goat Steal

Non Stop LIVE Update
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास.
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?.
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?.
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप.
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले.
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?.
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?.
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ.