समोसा विकण्यासाठी पठ्ठ्याने गुगलची नोकरी सोडली, वर्षभरात कमावले…..

समोसा विकण्यासाठी पठ्ठ्याने गुगलची नोकरी सोडली, वर्षभरात कमावले.....

मुंबई : गुगलसारख्या कंपनीमध्ये काम करणे हे प्रत्येकाचे स्वप्न असते. तंत्रज्ञान अर्थात टेक क्षेत्रातील अनेक कर्मचाऱ्यांची गुगलसारख्या कंपनीत नोकरी करण्याची इच्छा असते. विशेष म्हणजे गुगल कंपनीतील मुलाखत क्रॅक करणे हे प्रत्येकालाच शक्य नसतं. गुगल कर्मचाऱ्यांच्या पगाराही गलेलठ्ठ असतो. कारण फ्रेशर्सलाही इथे कोटी रुपयांचे पॅकेज मिळते. मात्र कुणी फक्त समोसा विकण्यासाठी गुगल कंपनीमधील नोकरी सोडेल का? नाही. पण भारतातील मुनाफ कपाडिया या पठ्ठ्याने समोसा विकण्यासाठी थेट गुगलची नोकरी सोडली आहे. मुनाफ कपाडिया यांनी गुगलची नोकरी सोडून ‘द बोहरी किचन’ रेस्टॉरंटचा व्यवसाय सुरु केला आणि नोकरी सोडून एका वर्षानंतर आपल्या व्यवसायातून तब्बल वार्षिक 50 लाख रुपयांचा टर्न ओव्हर अर्थात व्यवसाय केला.

समोसा विकण्यासाठी गुगलच्या नोकरीला राम राम

हे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटत असेल ना? समोसा विकण्यासाठी कोण एवढी मोठी कंपनी सोडेल. मात्र हे खर आहे. मुनाफने समोसा विकण्यासाठी गुगलची नोकरी सोडली. मात्र नोकरी सोडून त्याने आज स्वत:चे विश्व निर्माण केलं आहे. त्याने बोहरी किचनच्या माध्यमातून समोसा विकला. पण आज त्याच्या व्यवसायातून त्याने वार्षिक 50 लाखांचा व्यवसाय केला.

एका झटक्यात नोकरीचा राजीनामा

मुनाफ कपाडियाने आपल्या फेसबुक अकाउंटवर एका पोस्टमध्ये लिहलं आहे की, मी एक असा व्यक्ती आहे ज्याने समोसा विकण्यासाठी गुगलची नोकरी सोडली. मुनाफचे समोसे हे मुंबईतील फाईव्ह स्टार हॉटेल आणि बॉलिवूडमध्ये विशेषत: लोकप्रिय आहेत. मुनाफने एमबीएचे शिक्षण घेतलं आणि त्यानंतर काही कंपनींमध्ये त्याने नोकरी करुन तो परदेशात गेला. परदेशात काही कंपनीमध्ये इंटरव्ह्यू देताना त्याला गुगलमध्ये नोकरी मिळाली. काही वर्ष गुगलमध्ये काम केल्यानंतर मुनाफला वाटले तो यापेक्षा चांगले काम करु शकतो. मग त्यानंतर मुनाफ नोकरीचा राजीनामा देत थेट भारतात परतला.

या आयडियानंतर सुरु केली कंपनी

मुनाफ भारतात द बोहरी किचन नावाचं रेस्टॉरंट चालवत आहे. मुनाफ सांगतो की, त्याच्या आईला टीव्ही पाहण्याची खूप आवड आहे आणि टीव्हीसमोर बराच वेळ ती घालवते. ती फूड शो खूप पाहते आणि त्यामुळे ती जेवणही छान बनवते. मुनाफला वाटले की, आपल्या आईकडून टिप्स घेऊन फूड रेस्टॉरंट सुरु करावं. त्याने रेस्टॉरंट सुरु करण्याची कल्पना केली आणि आईच्या हाताने बनवलेलं जेवण बऱ्याच जणांना खायला दिले. सर्वच जण त्यांच्या जेवणाचे कौतुक करु लागले. त्यामुळे त्याला बळ मिळाले आणि त्याने आपले स्वप्न साकार केले.

ट्रेडमार्क समोसा

मुनाफचे द बोहरी किचन मुंबईतच नव्हे तर देशभरात प्रसिद्ध आहे. विशेष म्हणजे मुनाफ बनवत असलेल्या समोस्याला ट्रेड मार्क आहे. मुनाफच्या रेस्टॉरंटमध्ये मटण समोसा, नरगिस कबाब, डब्बा गोश्त आणि कडी भात हे पदार्थ आहेत. तो खिमा समोसाही बनवतो, ज्याची मागणी जास्त प्रमाणात आहे. त्याचे रेस्टॉरंट सुरु होऊन आता एक वर्ष पूर्ण झाले आहे. या वर्षभरात त्याचा टर्नओव्हर 50 लाखांपेक्षाही पुढे पोहोचला आहे. मुनाफ हा व्यवसाय 3 ते 5 कोटींपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न करत आहे.

प्रत्येक महिन्याला लाखो रुपयांची कमाई

गेल्या दोन वर्षामध्ये रेस्टॉरंटचा टर्न ओव्हर 50 लाख रुपयेपर्यंत पोहचला आहे. द बोहरी किचनचं अनेक सेलेब्रिटीकडून कौतुक करण्यात आलं आहे.

Published On - 6:00 pm, Mon, 4 February 19

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI