AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारतीय सिनेसृष्टीच्या सौंदर्यवतीला गुगलकडून आदरांजली

मुंबई : आज जगभरात व्हॅलेंटाईन डे साजरा केला जात आहे. मात्र गुगलने आजचा दिवस हा सौंदर्याची खाण असलेल्या प्रसिद्ध भारतीय अभिनेत्री मधुबाला यांच्या नावे केला आहे. आज मधुबाला यांची 86 वी जयंती आहे. त्यानिमित्ताने गुगलने आपलं आजचं डूडल मधुबाला यांना समर्पित केलं आहे. गुगलच्या डूडलवर मधुबाला यांचे एक सुंदर स्केच लावण्यात आले आहे. हे स्केचही […]

भारतीय सिनेसृष्टीच्या सौंदर्यवतीला गुगलकडून आदरांजली
| Edited By: | Updated on: Jul 05, 2019 | 4:27 PM
Share

मुंबई : आज जगभरात व्हॅलेंटाईन डे साजरा केला जात आहे. मात्र गुगलने आजचा दिवस हा सौंदर्याची खाण असलेल्या प्रसिद्ध भारतीय अभिनेत्री मधुबाला यांच्या नावे केला आहे. आज मधुबाला यांची 86 वी जयंती आहे. त्यानिमित्ताने गुगलने आपलं आजचं डूडल मधुबाला यांना समर्पित केलं आहे. गुगलच्या डूडलवर मधुबाला यांचे एक सुंदर स्केच लावण्यात आले आहे. हे स्केचही मधुबाला यांच्या सौंदर्याप्रमाणे अप्रतिम आहे.

14 फेब्रुवारी 1933 ला दिल्ली येथे मधुबाला यांचा जन्म झाला. त्यांचं बालपणीचं नाव मुमताज जहां देहलवी होतं. त्यांच्या वडिलांचं नाव अताउल्लाह आणि आयशा बेगम असे त्यांच्या आईचे नाव होते. त्यांचे वडील पेशावर येथील तबांखूच्या कारखान्यात काम करायचे. त्यानंतर ते दिल्लीला आले आणि तेथून मुंबईला.

अभिनेत्री म्हणून मधुबाला आजही अनेकांच्या मनावर राज्य करतात. आजही त्यांच्या सौंदर्याची उपमा दिली जाते. त्यांचे सौंदर्य म्हणजे सुंदरतेचं दुसरं नावच. योगायोग असा की, व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी मधुबाला यांचा जन्म झाला आणि त्यांनी त्यांच्या प्रत्येक भूमिकेतून लोकांना आपल्या प्रेमात पाडले, प्रेम करायला शिकवले. त्यांच्या प्रत्येक अदांमध्ये प्यार-इश्क-मोहब्बत असायचं.

लहानपणीपासूनच त्यांना सिनेमांची ओढ होती. त्यांना नेहमी सिनेमात काम करायचे होते. आपलं स्वप्न पूर्ण करत त्या सिनेमात आल्या आणि भारतीय सिनेमाचं एक नवं पर्व सुरु झालं. मधुबाला यांनी 1942 सालच्या ‘बसंत’ या सिनेमातून सिनेसृष्टीत पदार्पण केलं. हा सिनेमा खूप गाजला आणि त्यानंतर मधुबाला यांची सुंदरता प्रेक्षकांच्या मनात भरली.

मधुबाला यांनी 70 हून अधिक चित्रपटांमध्ये अभिनय केला. त्यांनी ‘बसंत’, ‘फूलवारी’, ‘नील कमल’, ‘पारई आग’, ‘अमर प्रेम’, ‘महल’, ‘इम्तिहान’, ‘गुन्हेगार’, ‘मधुबाला’, ‘मेघ’, ‘गेटवे ऑफ इंडिया’, ‘जाली नोट’, ‘शराबी’ आणि ‘ज्वाला’ यांसारख्या चित्रपटांच्या माध्यमातून त्यांनी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले.

23 फेब्रुवारी 1969 ला लाखो मनांवर राज्य करणाऱ्या या टाईमलेस ब्युटीने जगाचा निरोप घेतला.

T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर
T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर.
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास.
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया.
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम.
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल.
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट.
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव.
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?.
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.