गोवंडीत सेफ्टीक टँकमध्ये गुदमरुन 3 सफाई कर्मचाऱ्यांचा मृत्यू

गोवंडीतील इमारतीमधील सेफ्टीक टँकमध्ये गुदमरुन तीन सफाई कर्मचाऱ्यांचा मृत्यू (Govandi Labors died in septic tank) झाला आहे.

गोवंडीत सेफ्टीक टँकमध्ये गुदमरुन 3 सफाई कर्मचाऱ्यांचा मृत्यू

मुंबई : गोवंडीतील इमारतीमधील सेफ्टीक टँकमध्ये गुदमरुन तीन सफाई कर्मचाऱ्यांचा मृत्यू (Govandi Labors died in septic tank) झाला आहे. गोवंडीतल्या गणेश वाडी परिसरातील मोरया ही धक्कादायक घटना घडली आहे. आज दुपारी 12.48 च्या सुमारास ही घटना घडली. या तिन्ही मृत सफाई कामगारांची नावे किंवा इतर माहिती अद्याप समोर आलेली (Govandi Labors died in septic tank) नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, गोवंडीमधील गणेशवाडी परिसरातील मोरया एस.आर.ए बिल्डींगमधील सेफ्टीक टँक साफ करण्यासाठी हे कामगार आले होते. मात्र हे टँक साफ करत असताना तिन्ही कर्मचाऱ्यांचा गुदमरुन मृत्यू (Govandi Labors died in septic tank) झाला. मृत्यू झालेले तिन्ही कर्मचारी हे खाजगी कामगार असल्याचे समोर येत आहे. तसेच ही इमारत एसआरएची असल्याचे समोर येत आहे.

ही घटना दुपारी 12.48 च्या सुमारास घडली (Govandi Labors died in septic tank) आहे. पोलिसांनी दुपारी 3.30 सुमारास याबाबची माहिती मिळाली. ही माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान या तिघांना शताब्दी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. मात्र त्यांना मृत घोषित करण्यात आलं.

Published On - 4:19 pm, Mon, 23 December 19

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI