राज्यपाल समजूतदार आहेत, आमदारकीसाठी पाठवलेल्या नावांवर लवकरच निर्णय घेतील: छगन भुजबळ

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 15 दिवसांपूर्वीच विधानपरिषेसाठीच्या 12 सदस्यांची नावे राज्यपालांकडे पाठवली होती. | chhagan bhujbal

राज्यपाल समजूतदार आहेत, आमदारकीसाठी पाठवलेल्या नावांवर लवकरच निर्णय घेतील: छगन भुजबळ

नाशिक: विधानपरिषदेतील 12 राज्यपालनियुक्त सदस्यांच्या नियुक्तीबाबत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat singh Koshyari ) योग्य निर्णय घेतील. ते समजूतदार आहेत, असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ (chhagan bhujbal) यांनी केले. राज्य सरकारने राज्यपालांकडे आमदारकीसाठी पाठवलेली सर्व नावे योग्य आहेत. सर्व निकषांचे पालन करूनच ही नावे निश्चित करण्यात आली होती. त्यामुळे आता राज्यपाल यावर निर्णय घेतील, अशी आशा छगन भुजबळ यांनी व्यक्त केली. (Governor elected vidhan parishad mlc)

ते शनिवारी नाशिकमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी नाशिकमधील शाळा सुरु करण्यासंदर्भात लवकरच निर्णय घेऊ, असे सांगितले. आम्ही नाशिकमधील शाळांच्या बाबतीत उद्या बैठक घेऊन चर्चा करु. त्यानंतर निर्णय घेणार आहोत. मुलांना शाळेत पाठवायला पालकांची संमती मिळते की नाही, तेही बघितलं पाहिजे. याबाबत मंत्रिमंडळात वेगवेगळी मतमतांतरे नक्कीच आहेत. आपल्या डोक्यावरची टांगती तलवार आपल्या मानेवर पडता कामा नये, अशी भीती भुजबळांनी व्यक्त केली.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 15 दिवसांपूर्वीच विधानपरिषेसाठीच्या 12 सदस्यांची नावे राज्यपालांकडे पाठवली होती. मात्र, राज्यपालांकडून अद्याप यावर कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. त्यामुळे राज्यपाल या 12 सदस्यांच्या नियुक्तीवर आक्षेप घेणार का, अशी शंका उपस्थित झाली आहे. तसे झाल्यास महाविकासआघाडी सरकार न्यायालयात जाण्याच्या तयारीत आहे.

तत्पूर्वी सरकारने निश्चित केलेल्या राज्यपालनियुक्त 12 सदस्यांच्या नियुक्तीला आव्हान देणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. कला किंवा सामाजिक क्षेत्रातील व्यक्तींच्या नियुक्तीचे निकष असताना राजकीय नेत्यांची वर्णी लावल्याने दोघा सामाजिक कार्यकर्त्यांनी हायकोर्टाचे दरवाजे ठोठावले आहेत.

एकनाथ खडसे, राजू शेट्टी यांच्यासह राजू भिंगे, रजनी पाटील, सचिन सावंत, सय्यद मुजफ्फर हुसेन, विजय करंजकर, चंद्रकांत रघुवंशी या आठ जणांना याचिकेत प्रतिवादी करण्यात आलं आहे. खडसे-शेट्टी यांच्यासह आठही जणांची राज्यपाल नियुक्त आमदारकीच्या कोट्यातून विधानपरिषदेवर नियुक्तीला करण्यालाही या याचिकेतून विरोध करण्यात आला आहे.

12 सदस्यांमध्ये कोणाची नावं?

काँग्रेस

1) सचिन सावंत – सहकार आणि समाजसेवा
2) रजनी पाटील – सहकार आणि समाजसेवा
3) मुजफ्फर हुसैन – समाजसेवा
4) अनिरुद्ध वनकर – कला

राष्ट्रवादी काँग्रेस

1) एकनाथ खडसे – सहकार आणि समाजसेवा
2) राजू शेट्टी – सहकार आणि समाजसेवा
3) यशपाल भिंगे – साहित्य
4) आनंद शिंदे – कला

शिवसेना

1) उर्मिला मातोंडकर – कला
2) नितीन बानगुडे पाटील
3) विजय करंजकर
4) चंद्रकांत रघुवंशी

संबंधित बातम्या:

राज्यपाल नियुक्त सदस्यावरुन चंद्रकांत पाटलांचं घटनेकडे बोट, जयंत पाटलांचं उत्तर

विधानपरिषद | खडसे-शेट्टींसह आठ राज्यपाल कोट्यातील सदस्यांच्या नियुक्तीला हायकोर्टात आव्हान

शिफारस केलेल्या व्यक्तींची नावं सादर करा; राज्यपाल नियुक्त संभाव्य सदस्यांविरोधात कोर्टात याचिका

(Governor elected vidhan parishad mlc)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI