AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gram Panchayat Election : बीडमध्ये क्षीरसागर काकाला पुतण्याकडून धोबीपछाड, पाहा निकाल काय?

पुतणे संदीप क्षीरसागर यांनी राजुरी जिल्हा परिषद सर्कलमधील चारही ग्रामपंचायतींत काका जयदत्त क्षीरसागर यांच्या पॅनलचा धुव्वा उडवला.

Gram Panchayat Election : बीडमध्ये क्षीरसागर काकाला पुतण्याकडून धोबीपछाड, पाहा निकाल काय?
| Edited By: | Updated on: Dec 20, 2022 | 12:26 PM
Share

बीडः राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संदीप क्षीरसागर (Sandeep Kshirsagar) आणि माजीमंत्री जयदत्त क्षीरसागर (Jaidatta Kshirsagar) या काका पुतण्यातील सत्ता संघर्ष ग्रामपंचायत निवडणुकीतदेखील (Gram Panchayat Election) पहावयास मिळाला. राजुरी जिल्हा परिषद सर्कलमधील नवगण राजुरी या होमपीचवर माजीमंत्री क्षीरसागर यांच्या गटाचा दारुण पराभव पहायला मिळाला. पुतणे संदीप क्षीरसागर यांनी या पॅनलचा धुव्वा उडवत काकाला धोबीपछाड दिली. या सर्कलमधील चार ग्रामपंचायत संदीप क्षीरसागर यांच्या ताब्यात आल्या आहेत.

गेल्या पाच सात वर्षांपासून संदिप क्षीरसागर आणि माजीमंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्यातील सत्ता संघर्ष सगळ्या महाराष्ट्राने पाहिला आणि अभुवला आहे. पाच वर्षापूर्वी झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत आमदार क्षीरसागरांनी नवगण राजुरीच्या ग्रामपंचायती वर आपला झेंडा फडकवला होता. त्याचीच पुनरावृत्ती पुन्हा एकदा यावेळी त्यांनी केली.

जयदत्त क्षीरसागर यांचे होमग्राउंड असणाऱ्या राजुरीमध्ये आमदार क्षीरसागर यांच्या पॅनलचा मोठा विजय झालाय. त्याचसोबत उमरद जहागीर, लिंबारुई, दगडी शहजाणपूर या ग्रामपंचायतीदेखील आमदार क्षीरसागर यांच्या ताब्यात आल्या आहेत.

परळीत काय निकाल?

परळी विधानसभा मतदारसंघात धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला ग्राम पंचायत निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर यश मिळताना दिसून येत आहे.

धनंजय मुंडे यांच्या कार्यालयात त्यासाठी मोठी विजयोत्सव करण्याची तयारी करण्यात आली आहे. कार्यकर्त्यांच्या स्वागतासाठी स्टेज करण्यात आले आहे. तसेच डॉल्बी आणि ढोल ताशाच्या गजरात कार्यकर्ते आपला आनंद उत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा करत आहेत.

मतदारसंघातील बहुतांश ग्रामपंचायत निवडणूकीत धनंजय मुंडे समर्थक उमेदवार विजयी झाले आहेत किंवा आघाडीवर असल्याचे प्राथमिक फेरीत दिसून येत आहे..

नाथरा ग्रामपंचायतीचा निकाल काय?

गोपीनाथ मुंडे यांचे जन्मगाव असलेल्या नाथरा ग्रामपंचायत निवडणुकीत पंकजा मुंडे यांना जोरदार धक्का दिला आहे. 648 मतांनी नाथरा ग्रामपंचायतीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अभय मुंडे विजयी झाले आहेत. नाथरा ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादीचे वर्चस्व पहायला मिळाले आहे.

वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.