वावरातून फेसबुक-व्हॉट्सअ‌ॅप, सीताफळाची थेट ऑर्डर, नांदेडच्या शेतकऱ्याचा भन्नाट प्रयोग

व्हाट्सअ‌ॅप, फेसबूकवर या फळाची माहिती ऐकून ग्राहक थेट शेतात येऊन सीताफळ खरेदीला पसंती देत आहेत. (Hanumant Rajegore use social media for marketing of Golden Sugar Apple)

वावरातून फेसबुक-व्हॉट्सअ‌ॅप, सीताफळाची थेट ऑर्डर, नांदेडच्या शेतकऱ्याचा भन्नाट प्रयोग
Follow us
| Updated on: Nov 17, 2020 | 3:12 PM

नांदेड: अर्धापूर तालुक्यातील शेलगाव येथील हनुमंत राजेगोरे या शेतकऱ्याने सीताफळाच्या विक्रीसाठी आधुनिक मार्ग स्वीकारला. हनुमंत राजेगोरे या शेतकऱ्यानं सीताफळाची प्रसिद्धी करण्यसाठी सोशल मीडियाचा आधार घेतला. राजेगोरे यांनी सोशल मीडियावरुन शेतातील सीताफळाची माहिती आणि वैशिष्ट्ये ग्राहकांपर्यत पोहोचवली. हनुमंत राजेगोरे यांनी वापरलेल्या या युक्तीचा चांगला परिणाम दिसून आला आहे. ग्राहक सीताफळ खरेदी करण्यासाठी थेट हनुमंत राजेगोरे यांच्या शेतात पोहोचत आहेत. (Hanumant Rajegore use social media for marketing of Golden Sugar Apple)

थेट ग्राहकांना विक्री

हनुमंत राजेगोरे यांच्या शेतातील सीताफळांची माहिती सोशल मीडियाद्वारे ग्राहकांपर्यंत पोहोचत आहे. व्हाट्सअ‌ॅप, फेसबूकवर या फळाची माहिती ऐकून ग्राहक थेट या शेतकऱ्याच्या शेतात येऊन सीताफळ खरेदीला पसंती देत आहेत. नांदेड शहरापासून जवळच या शेतकऱ्यांची शेती असल्याने ग्राहकांना शुद्ध आणि ताजे सीताफळ खरेदी करता येते.

सीताफळ थेट शेतकऱ्याकडून खरेदी करता येत असल्यामुळे ग्राहकांना देखील याचा फायदा होतोय. बाजारात मिळणाऱ्या फळांपेक्षा थेट शेतावरुन चांगल्या दर्जाची सीताफळ त्यांना मिळत आहेत. हनुमंत राजेगोरे यांचे शेतात दररोज ग्राहक आणि व्यापारी जाऊन खरेदी करतो. नांदेड शहरातील व्यापारी राजेगोरे यांच्याकडे जाऊन खरेदी करत आहेत. सध्याची बाजारपेठेची परिस्थिती पाहता 80 ते 90 रुपये प्रतिकिलो सीताफळाला मिळत असून हा दर समाधानकारक असल्याचे राजेगोरे यांनी सांगितले.

आधुनिक शेतीचा मार्ग स्वीकारत गोल्डन सीताफळाची लागवड

हनुमंत राजेगोरे यांनी पारंपारिक सीताफळाची लागवड करण्याऐवजी गोल्डन या वाणाची निवड लागवडीसाठी केली. हनुमंत राजेगोरे सीताफळाच्या झाडाची छाटणी मे-जूनमध्ये करतात. यामुळे नोव्हेंबरमध्ये सीताफळाचा हंगाम सुरु होतो. ऑक्टोबर महिन्यात गावरान सीताफळाचा हंगाम संपतो. नोव्हेंबरमध्ये इतर फळ बाजारात नसतात त्यामुळे चांगला दर मिळत असल्याचे हनुमंत राजेगोरे यांनी सांगितले.

Hanumant Rajegore farm sugar apple

हनुमंत राजेगोरे यांच्या शेतातील गोल्डन सीताफळाची बाग

गोल्डन सीताफळाची वैशिष्ट्ये

हनुमंत राजेगोरे यांनी गावरान सीताफळाची लागवड करण्याऐवजी गोल्डन सीताफळ या वाणाची लागवड केली. याच्या फळाचे वजन सरासरी 400 ते 500 ग्रॅम असते. गोल्डन सीताफळात बियांचे प्रमाण कमी आहे, फळामध्ये साधारणपणे 10 ते 12 बिया असतात. सीताफळाची गोड चव आणि तोडणीनंतर 5 ते 6 दिवसांपर्यंत चांगले राहत असल्यामुळे ग्राहकांची पसंती मिळत आहे.

सोशल मीडियावरील माहिती पाहून हनुमंत राजेगोरे यांच्या शेतावर येऊन पाहणी केली आणि सीताफळ खरेदी करताना आनंद होत असल्याची भावना अवधूत कदम या ग्राहकानं सांगितले.

अर्धापूर तालुक्यातील शेलगाव येथील हनुमंत राजेगोरे यांनी सोशल मीडियाचा वापर शेतमालाच्या विक्रीसाठी केला. शेतात उत्पन्न घेत विक्रीचही योग्य प्रकारे नियोजन केल्यामुळे राजेगोरे यांना आठ एकर क्षेत्रावर असलेल्या सीताफळाच्या विक्रीतून हा शेतकरी चांगले उत्पन्न मिळतेय.

संबंधित बातम्या: 

शिरुरमध्ये काश्मीर! ना वेगळे खत, ना मशागत; प्रयोगशील शेतकरी भावंडांकडून सफरचंदाची लागवड

काश्मीरमधील सफरचंदाची नाशिकमध्ये लागवड, डाळींबासाठी प्रसिद्ध असलेल्या ठिकाणी सफरचंदाची बाग

(Hanumant Rajegore use social media for marketing of Golden Sugar Apple)

Non Stop LIVE Update
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?.
महायुतीत छत्रपती संभाजीनगर जागेवरून पेच कायम, शिवसेना-भाजपात रस्सीखेच
महायुतीत छत्रपती संभाजीनगर जागेवरून पेच कायम, शिवसेना-भाजपात रस्सीखेच.
दिलीप वळसे पाटलांना गंभीर दुखापत, उपचार सुरु, काय घडलं? कशीये प्रकृती?
दिलीप वळसे पाटलांना गंभीर दुखापत, उपचार सुरु, काय घडलं? कशीये प्रकृती?.