प्रचंड दबावानंतर योगी सरकारची कारवाई, हाथरसचे SP, DSP यांच्यासह बडे अधिकारी निलंबित

हाथरस सामूहित बलात्कार प्रकरणी प्रचंड दबावानंतर योगी सरकारने मोठी कारवाई केली आहे. हाथरसचे जिल्हा पोलिस प्रमुख, पोलिस उपअधिक्षक तसंच पोलीस इन्सेक्टर यांना निलंबित केलं आहे. (Harthras Case SP, DSP, inspector Suspend By UP Goverment)

प्रचंड दबावानंतर योगी सरकारची कारवाई, हाथरसचे  SP, DSP यांच्यासह बडे अधिकारी निलंबित
Follow us
| Updated on: Oct 02, 2020 | 11:12 PM

हाथरसहाथरस सामूहिक बलात्कार प्रकरणी प्रचंड दबावानंतर योगी सरकारने मोठी कारवाई केली आहे. हाथरसचे जिल्हा पोलिस प्रमुख, पोलिस उपअधिक्षक तसंच पोलीस इन्सेक्टर यांना योगी सरकारने निलंबित केलं आहे. त्यांची नार्को पॉलिग्राफ टेस्ट केली जाणार आहे. तसंच हाथरस पोलीस स्थानकातील सगळ्या पोलिसांची नार्को पॉलिग्राफ टेस्ट केली जाणार आहे. (Harthras Case SP, DSP, inspector Suspend By UP Goverment)

एसआयटीच्या प्राथमिक अहवालानंतर योगी सरकारने ही मोठी कारवाई केली आहे. हाथरसचे एसपी, डीएसपी आणि पोलीस इन्सपेक्टर यांच्यावर योगी सरकारने कारवाई केली आहे. या बड्या अधिकाऱ्यांवर कारवाई व्हावी, अशी मागणी नागरिकांकडून होत होती. स्थानिक प्रशासनाविरोधात नागरिकांकडून रोष व्यक्त केला जात होता. अखेर योगी सरकारने ही मोठी कारवाई केलीये.

हाथरसच्या घटनेनंतर संबंध भारतभरातून संताप व्यक्त केला जातोय. देशभरात निषेध आंदोलने सुरू आहेत. तर दुसरीकडे तेथील स्थानिक प्रशासनाची मुजोरी गेल्या 4 दिवसांपासून सुरु आहे. पीडित कुटुंबाला घराबाहेर पडण्यास प्रशासनाने मनाई केलीये. पीडित कुटंब सध्या दहशतीच्या वातावरणात आहेत. पोलिसांनी पीडितेच्या संपूर्ण घराला वेढा दिला. प्रसारमाध्यमांना देखील वार्तांकन करण्यास मनाई केली गेली.

दुसरीकडे पीडित मुलीच्या भावाने आम्हा सगळ्या कुटुंबीयांना घरात डांबून ठेऊन पोलिसांना मारहाण केल्याचा गंभीर आरोप केला आहे. तसंच आमचे फोनही काढून घेतले गेले आहेत. जेणेकरून आम्ही कुणाला काही बोलू नये, कुणाला काही सांगू नये, असं पीडितेच्या भावने म्हटलंय.

गेल्या 4 दिवसांपासून हाथरसमधलं वातावरण चांगलंच गरम झालंय. पीडितेच्या कुटुंबाला कुणालाच भेटू देत नाहीत. पीडितेच्या कुटुंबीयांचा कुणालाच विचारपूस करु देत नाहीत. आज टीएमसी नेत्यांचं शिष्टमंडळ पीडितेच्या कुटुंबीयांना भेटायला निघालेले असताना पोलिसांनी त्यांना अडवलं. कलेक्टरांची ऑर्डर आहे, असं सांगत नेत्यांना पीडित कुटुंबाला भेटण्यापासून पोलिसांनी रोखलं.

हाथरस प्रकरण उत्तर प्रदेशातील हाथरस इथं एका मुलीवर बलात्कार झाल्याचा (Hathras rape case) आरोप आहे. चार नराधमांनी सामूहिक अत्याचार करुन मारहाण केली. यादरम्यान प्रचंड जखमी झालेल्या मुलीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणातील चार आरोपींना अटक करण्यात आली आहे. हाथरस प्रकरणावर संपूर्ण देशभरातून संताप व्यक्त केला जात आहे.

पोलिसांकडून गुपचूप अंत्यसंस्कार हाथरस (Hathras) सामूहिक बलात्कार (GangRape) प्रकरणाने संपूर्ण देश हादरला आहे. उत्तर प्रदेशच्या हाथरस भागात 19 वर्षीय तरुणीवर चार जणांनी सामूहिक बलात्कार करत, बोलता येऊ नये म्हणून तिची जीभदेखील कापून टाकली. उपचार दरम्यान पीडितेचा मृत्यू झाला. पीडितेचा मृतदेह तिच्या गावी आणून, उत्तर प्रदेश पोलिसांनी (UP Police) गुपचूप या मुलीचे अंत्यसंस्कार उरकल्याचा दावा कुटुंबाकडून करण्यात आला आहे. विनवणी करूनही पोलिसांनी मुलीचे अंत्यदर्शन करू न दिल्याने, कुटुंबियांनी आक्रोश केला आहे

राहुल गांधींना धक्काबुक्की दरम्यान, हाथरस सामूहिक बलात्कार प्रकरणातील पीडितेच्या कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी रवाना झालेले काँग्रेस नेते राहुल गांधी-प्रियांका गांधी यांना, काल उत्तर प्रदेश पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं होतं. यादरम्यान राहुल गांधींना पोलिसांनी धक्काबुक्कीही केली होती. राहुल गांधी आणि प्रियांका गांधी दोघेही यमुना एक्सप्रेसवरून पायी चालत निघाले असताना त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. मात्र काही वेळाने त्यांना सोडण्यात आले.

(Harthras Case SP, DSP, inspector Suspend By UP Goverment)

संबंधित बातम्या

हाथरस अत्याचारातील पीडित कुटुंबाला धमकावल्याचा व्हिडीओ व्हायरल, नवी मुंबईत मनसे आक्रमक

हाथरसच्या मुलीवर बलात्कार झालाच नाही, यूपीच्या अतिरिक्त पोलीस महासंचालकांचा दावा

Hathras rape case | मुंबई पोलिसांना तपासासाठी यूपीला पाठवा, शिवसेनेची गृहमंत्र्यांकडे मागणी

पंतप्रधान बोलत का नाहीत?; जनतेला हाथरसच्या घटनेचं सत्य सांगा; शिवसेनेची मागणी

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.