LIVE | पीडित कुटुंबाला पूर्ण साथ, न्याय मिळेपर्यंत संघर्ष : राहुल गांधी

काँग्रेस खासदार राहुल गांधी आज पुन्हा एकदा हाथरसला जाणार आहेत. जगातील कोणतीही ताकद मला हाथरसला जाण्यापासून रोखू शकत नाही, असे ट्वीट करुन त्यांनी सत्ताधाऱ्यांना इशारा दिला आहे.

LIVE | पीडित कुटुंबाला पूर्ण साथ, न्याय मिळेपर्यंत संघर्ष : राहुल गांधी
Follow us
| Updated on: Oct 03, 2020 | 7:55 PM

नवी दिल्ली : हाथरस सामूहिक बलात्कार प्रकरणावरुन काँग्रेस पक्ष आक्रमक झाला आहे. पक्षाचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी आणि सरचिटणीस प्रियांका गांधी हे हाथरसमध्ये दाखल झाले. या दोघांनी पीडित कुटुंबाची भेट घेतली. राहुल आणि प्रियांका गांधी दोन दिवसांपूर्वी हाथरस प्रकरणातील पीडितेच्या कुटुंबियांना भेटण्यासाठी निघाले होते. परंतु दोघांनाही ग्रेटर नोएडा येथील परी चौकात रोखून पुन्हा दिल्लीला पाठवले. तिथे राहुल गांधी यांच्यासोबत धक्काबुक्की देखील झाली होती. यापार्श्वभूमीवर राहुल आणि प्रियांका गांधी हे हाथरसला जायला निघाले, तेव्हा हाथरसकडे जाणाऱ्या रस्त्यावर अभूतपूर्व बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. (Hathras Gangrape case – Rahul Gandhi will meet victims family)

[svt-event title=”कुटुंबाला पूर्ण साथ, न्याय मिळेपर्यंत संघर्ष : राहुल गांधी” date=”03/10/2020,7:54PM” class=”svt-cd-green” ] राहुल गांधींचं पीडित कुटुंबाला आश्वासन, मुलीच्या कुटुंबीयांसोबत काँग्रेस ठामपणे उभा असून, न्याय मिळेपर्यंत संघर्ष सुरु राहील. [/svt-event]

[svt-event title=”राहुल गांधी हाथरसमध्ये पोहोचले” date=”03/10/2020,7:31PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”काँग्रेस नेते राहुल गांधी, प्रियांका गांधी हाथरसमध्ये दाखल” date=”03/10/2020,7:26PM” class=”svt-cd-green” ] काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियांका गांधी हाथरसमध्ये पीडितेच्या घरी दाखल; पीडितेच्या घराबाहेर पोलिसांचा बंदोबस्त वाढला [/svt-event]

[svt-event title=”काँग्रेसच्या पाच नेत्यांना पीडित कुटुंबाला भेटण्याची परवानगी” date=”03/10/2020,5:23PM” class=”svt-cd-green” ] राहुल गांधी आणि प्रियांका गांधींसोबत काँग्रेसचे बडे नेते, मुकुल वासनिक, वेणुगोपाल राव ,अधीर रंजन यांना पीडित कुटुंबाला भेटण्याची परवानगी [/svt-event]

[svt-event title=”काँग्रेस कार्यकर्त्यांना पोलिसांनी रोखलं” date=”03/10/2020,4:26PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”नोएडा ते हाथरस, राहुल गांधींचा मार्च ” date=”03/10/2020,4:25PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”राहुल आणि प्रियंका गांधींसह 35 खासदारही हाथरसला जाणार ” date=”03/10/2020,3:47PM” class=”svt-cd-green” ] राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्यासह 35 खासदारही हाथरसला जाणार आहेत. याबाबत नोएडाचे एडीसीपी रणविजय सिंह म्हणाले, ‘ते कलम 144 चे उल्लंघन करीत आहेत. लोकांच्या गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आम्ही येथे तैनात आहोत. आम्ही त्यांना शांततेचं आवाहन करीत आहोत”. [/svt-event]

[svt-event title=”पोलिसांकडून शांततेचं आवाहन” date=”03/10/2020,3:49PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

राहुल गांधी आज पुन्हा हाथरसला जाणार आहेत. त्याबाबत इशारा देताना राहुल गांधी म्हणाले की, जगातील कोणतीही ताकद मला हाथरसला जाण्यापासून, त्या पीडित कुटुंबाला भेटण्यापासून रोखू शकत नाही. राहुल गांधी यांनी ट्वीट करुन म्हटलं आहे की, पीडित मुलीच्या परिवाराशी यूपी पोलीस व यूपी सरकार ज्या प्रकारचं वर्तन करत आहे, ते मला मान्य नाही. कोणत्याही भारतीयाने ती स्वीकारु नये.

अशी माहिती मिळाली आहे की, राहुल गांधी आज दुपारी हाथरसला रवाना होणार आहेत. त्यांच्यासोबत काँग्रेसचे काही खासदारदेखील असतील. राहुल गांधींच्या नेतृत्वात काँग्रेसचे प्रतिनिधी मंडळ पीडितेच्या कुटुंबियांचे सांत्वन करेल. या सरकारने पीडितेच्या कुटुंबाला न्यायापासून वंचित ठेवलं आहे, असा आरोप काँग्रेसने केला आहे. तसेच हे सरकार पोलीस बळाचा वापर करुन मीडियालादेखील पीडितेच्या कुटुंबियांना भेटू देत नाही.

दरम्यान, हाथरस घटनेवरुन राहुल गांधी उत्तर प्रदेश सरकारविरोधात चांगलेच आक्रमक झाले आहेत. यूपी सरकारविरोधात राहुल गांधी यांनी सोशल मीडियावर ताशेरे ओढले आहेत. पोलिसांनी पीडितेच्या गावच्या सीमा सील केल्या आहेत. पोलिसांचे वर्तन अशा अनेक बांबीवरुन राहुल गांधींनी ट्वीट करुन स्वतःचं मत मांडलं आहे.

दोन दिवसांपूर्वी राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांच्यासह हाथरस सामूहिक बलात्कार प्रकरणातील पीडितेच्या कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी हाथरसला रवाना झाले होते. दोघेही काँग्रेस कार्यकर्त्यांसह पायी निघाले होते. परंतु हाथरसमध्ये पोहोचण्यापूर्वीच यूपी पोलिसांनी राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांना ताब्यात घेतले. पोलिसांनी राहुल गांधींशी धक्काबुक्की केली तसेच त्यांची कॉलर पकडून त्यांना ताब्यात घेतले. यावेळी काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक झालेले पाहायला मिळाले.

पोलिसांच्या धक्काबुक्कीदरम्यान राहुल गांधी यांचा तोल जाऊन ते जमिनीवर पडले. त्यांच्या हाताला मुकामार लागला. यानंतर प्रियांका गांधी काहीशा घाबरल्या. झाल्या प्रकरणावर बोलताना ‘अशा घटनांवेळी असे प्रकार होत असतात’ ,अशी संयमी प्रतिक्रिया राहुल गांधी यांनी दिली.

संबंधित बातम्या

Rahul Gandhi | उत्तर प्रदेश पोलिसांकडून राहुल गांधींना धक्काबुक्की, कॉलर पकडून ताब्यात घेतलं

राहुल गांधींना धक्काबुक्की झालीच नाही, त्यांचा तोल गेला असावा : रावसाहेब दानवे

(Hathras Gangrape case – Rahul Gandhi will meet victims family)

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.