Corona | मास्क आणि सॅनिटायझरचा आग्रह करु नका, स्वच्छ रुमाल आणि साबण पुरेसा : आरोग्य मंत्री

मास्क आणि सॅनिटायझरचा आग्रह करु नका, स्वच्छ रुमाल आणि साबण पुरेसा, अशी सूचना राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे (Health Minister Rajesh Tope) यांनी दिली आहे.

Corona | मास्क आणि सॅनिटायझरचा आग्रह करु नका, स्वच्छ रुमाल आणि साबण पुरेसा : आरोग्य मंत्री

मुंबई : “सर्वसामान्य नागरिकांनी डॉक्टर वापरत असलेल्या एन-95 मास्कची मागणी करु नये (Health Minister Rajesh Tope). त्याची अजिताबत गरज नाही. ट्रिपल लेअर मास्कचीही आवश्यकता नाही. फक्त डॉक्टर्स आणि इतर स्टाफ यांनीच वापरण्याच्या या गोष्टी आहेत. मास्कसुद्धा वापरु नये, स्वच्छ रुमालच वापरावा. सॅनिटायझर वापरण्यावर खूप आग्रही राहू नये, साबण वापरावा. स्वच्छतेच्या अनुषंगाने हात धुणे आणि कुणासमोरही एक मीटरचं अंतर ठेवावं”, अशा सूचना आरोग्यमंत्री राजेश टोपे (Health Minister Rajesh Tope) यांनी दिल्या आहेत.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राजेश टोपे यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व जिल्हाधिकारी आणि महापालिका आयुक्तांची बैठक घेतली. या बैठकीत जिल्हाधिकारी आणि महापालिका आयुक्तांना महत्त्वपूर्ण सूचना देण्यात आल्या असल्याची माहिती राजेश टोपे यांनी दिली. राजेश टोपे यांनी पत्रकार परिषद घेऊन याबाबत माहिती दिली.

राजेश टोपे काय म्हणाले?

“आजपर्यंच कोरोनाचे 12 रुग्ण आढळले आहेत. यामध्ये 9 रुग्ण पुण्यात, 2 मुंबईत आणि 1 रुग्ण नागपूरमध्ये आहे. सर्व रुग्णांची प्रकृती ठिक आहे. त्यांचा आजार खूप बळावलेलं नाही. क्रिटिकल कंडिशनमध्ये कुणीही नाही. सर्व स्थिर आहेत. त्यांच्यात कोरोनाचे खूप काही लक्षण दिसून येत नाहीत. मात्र ते कोरोना पॉझिटीव्ह आहेत”, असं राजेश टोपे म्हणाले.

“आरोग्य विभागाकडून प्रशिक्षण देण्याचं काम सुरु आहे. वर्तमानपत्र, वृत्तवाहिन्या, रेडिओ सर्वच माध्यमातून जाहीरातीमार्फत लोकांना कोरोनाबाबत जागरुक करण्याचं काम सुरु आहे. जिल्हाधिकाऱ्यांना ज्या सूचना देण्यात आल्या त्यामध्ये कोणतेही शासकीय कार्यक्रम घ्यायचे नाहीत. त्याचबरोबर राजकीय किंवा इतर कार्यक्रमही टाळले गेले पाहिजेत, अशी सूचना देण्यात आली”, असं राजेश टोपे म्हणाले.

हेही वाचा : खोकायचं कसं, शिंकायचं कसं? हात स्वच्छ धुणे म्हणजे नेमकं काय? पुणे विभागीय आयुक्तांच्या सोप्या टिप्स

“12 पैकी 10 रुग्ण हे एका टूर कंपनीद्वारे परदेशात गेले होते. त्यामुळे टूर कंपन्यांना पुढील टूर स्थगित करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. ज्या टूर गेल्या आहेत, त्यांच्याबाबत खबरदारी घेण्यात येईल”, असं राजेश टोपे यांनी सांगितलं.

“स्वीमिंग पूल जावं की नको? तपकीर ओढून कोरोना जातो का? किंवा गावोगावी स्थानिक उपचारांबाबत विचारलं जातं, मात्र ते अत्यंत चुकीचं आहे. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी योग्य माहिती घेऊन दररोज माहिती द्यावी”, अशी सूचना देण्यात आल्याचं आरोग्यमंत्र्यांनी सांगितलं.

“अतिबाधित सात देशांमधून विमानमार्गाने येणाऱ्या लोकांना वेगळं ठेवण्याची व्यवस्था करावी, अशा सूचना मुंबई, पुणे आणि नागपूर या मेट्रो सिटीच्या महापालिकेच्या आयुक्तांना देण्यात आली आहे. त्याबाबत कसं नियोजन केलं आहे, याबाबत आयुक्तांनी उद्या सकाळी 11 वाजेपर्यंत राज्याच्या मुख्य सचिवांना माहिती द्यायची आहे”, असं राजेश टोपे यांनी सांगितलं.

संबंधित बातम्या :

Corona cases | पुण्यात आणखी एक रुग्ण, कोरोनाबाधितांची संख्या 12 वर

Corona | नागपुरातही कोरोनाबाधित रुग्ण आढळला, राज्यातील संख्या 11 वर

कोरोनाची मुंबईत एन्ट्री, महाराष्ट्रातील कोरोनाग्रस्तांची संख्या 7 वर

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI