AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महाराष्ट्रावर आसमानी संकटाची शक्यता, 5 राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा

भारतीय हवामान विभागाने (IMD) दिलेल्या माहितीनुसार, बंगालच्या उपसागरात पुढच्या 24 तासांत कमी दाबाचा पट्टा तयार होण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्रावर आसमानी संकटाची शक्यता, 5 राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा
| Edited By: | Updated on: Oct 12, 2020 | 12:06 PM
Share

नवी दिल्ली : राज्यावर आणखी एक वादळी संकट धडकणार असल्याचा इशारा भारतीय हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. बंगालच्या उपसागरात (Bay of Bengal) कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळे 5 राज्यामध्ये मुसळधार पावसाचा (Heavy rain) अंदाज हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) दिलेल्या माहितीनुसार, बंगालच्या उपसागरात पुढच्या 24 तासांत कमी दाबाचा पट्टा तयार होण्याची शक्यता आहे. अशात याचं रुपांतर वादळात होऊ शकतं. त्यामुळे 5 राज्यांमध्ये अलर्ट जारी करण्यात आला आहे. (heavy rain alerts in 5 states including Maharashtra imd weather alert)

हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, कमी दाबाचा पट्टा तयार होत असल्यामुळे आंध्र प्रदेश, कर्नाटक, तेलंगना, मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि ओडिशामध्ये मुसळधार पाऊस होऊ शकतो. या 5 राज्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून समुद्री भागामध्ये 20 सेंटीमीटर पाऊस होऊ शकतो. तर यावेळी मोठ्या वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. त्यामुळे 5 राज्यांमध्ये अलर्ट जारी करण्यात आला असून नागरिकांना घराबाहेर न जाण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

(heavy rain alerts in 5 states including Maharashtra imd weather alert)

दरम्यान, रविवारी हवामान खात्याकडून दिलेल्या माहितीनुसार, दक्षिण-पश्चिम मान्सून पुढच्या आठवड्यात देशाच्या इतर भागांतून परत येण्याची शक्यता नाही आहे. त्यामुळे पावसाळा आणखी पुढे सरकू शकतो. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार होत असल्यामुळे पुढच्या 24 तासांत याचं रुपांतर वादळात होऊ शकतं. हे वादळ 12 ऑक्टोबरच्या रात्री नरसापूर आणि विशाखापट्टणमच्या मधे आंध्र प्रदेशच्या किनारी भागातून पार होऊ शकतं. यामुळे आंध्र प्रदेश, तेलंगनासोबतच कर्नाटक, मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि ओडिशामध्ये 13 ऑक्टोबरला मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे.

राज्यात आजही अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. सतत सुरू असलेल्या परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. अशात पुन्हा एकदा वादळाचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आधीच आपला शेतमाल कोरड्या जागी ठेवावा तर नागरिकांनाही विनाकारण घराबाहेर न जाण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. मुंबईसह कोकण किनारपट्टीवर मच्छिमारी करण्यासाठी जाऊ नये. येत्या दोन दिवसातील पावसाच्या काळात शेतक-यांनीही योग्य ती काळजी घ्यावी, असं हवामान विभाकडून सांगण्यात आलं आहे.

इतर बातम्या –

Mumbai Power Cut | मुंबईतील वीज गायब, नेमकं कारण काय?

Fact Check : केंद्र सरकार प्रत्येकाच्या खात्यात जमा करणार 90 हजार रुपये?, वाचा काय आहे सत्य

(heavy rain alerts in 5 states including Maharashtra imd weather alert)

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.