AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Hero Electric च्या दोन नव्या ई-स्कूटर लाँच, किंमत आणि फिचर

Hero Electric ने Optima ER आणि NYX ER या दोन नव्या ई-स्कूटर लाँच केल्या आहेत. त्यांच्या किमती अनुक्रमे 68 हजार 721 रुपये आणि 69 हजार 754 रुपये आहेत.

Hero Electric च्या दोन नव्या ई-स्कूटर लाँच, किंमत आणि फिचर
| Updated on: Aug 19, 2019 | 11:53 PM
Share

नवी दिल्ली : Hero Electric ने Optima ER आणि NYX ER या दोन नव्या ई-स्कूटर लाँच केल्या आहेत. त्यांच्या किमती अनुक्रमे 68 हजार 721 रुपये आणि 69 हजार 754 रुपये आहेत. या किमती ईशान्य दिल्ली वगळता देशभरात सर्व ठिकाणी लागू आहेत. ईशान्य दिल्लीत याच गाड्यांची किंमत ऑप्टिमा ईआरची किंमत 71 हजार 543 आणि एनवायएक्स ईआरची किंमत 72 हजार 566 रुपये आहे.

हिरो इलेक्ट्रिकच्या Optima आणि NYX या नावाच्या इलेक्ट्रिक स्कूटर आधीपासून बाजारात उपलब्ध आहेत. नव्या मॉडेलमध्ये ER चा अर्थ एक्सटेंडेड रेंज (Extended Range) असा आहे. म्हणजेच हे नवं मॉडेल आता आधीपेक्षा जास्त अंतर धावेल. या मॉडेलमध्ये ड्यूल लिथियम-आयन बॅटरी देण्यात आली आहे.

चार्जिंग आणि रेंज

हिरो इलेक्ट्रिकच्या नव्या दोन्ही ई-स्कूटर्सची बॅटरी 4 ते 5 तासाच पूर्ण चार्ज होते. बॅटरी पूर्ण चार्ज केल्यानंतर ऑप्टिमा ईआर 110 किलोमीटर आणि एनवायएक्स ईआर 100 किलोमीटरपर्यंत चालते, असा दावा कंपनीने केला आहे. दोन्ही स्कूटर्सचा धावण्याचा सर्वाधिक वेग (Top Speed) 42 किलोमीटर प्रतितास आहे. योग्यरित्या देखभाल-दुरुस्ती केल्यास स्कूटरची बॅटरी 5 वर्षांपर्यंत चालेल, असंही कंपनीने म्हटलं आहे.

फिचर्स

ऑप्टिमा ईआर स्कूटर खास ऑफिसला जाणारे मध्यमवर्गी आणि कॉलेजचे विद्यार्थी यांना डोळ्यासमोर ठेऊन तयार करण्यात आली आहे. NYX ER ची निर्मिती छोटे व्यावसायीक, व्यापारी, ई-कॉमर्स डिलिव्हरी कर्मचारी आणि रेंटल ई-बाइक्स यानुसार होणार आहे. दोन्ही स्कूटर्समध्ये अलॉय विल्स, एलईडी हेडलाईट्स, डिजिटल स्पीडोमीटर, टेलिस्कोपिक सस्पेंशन आणि रिजनरेटिव ब्रेकिंग अशा सुविधा देण्यात आल्या आहेत.

इलेक्ट्रिक गाड्यांना सरकारकडून देखील प्रोत्साहन दिले जात आहे. त्यामुळेच देशभरात इलेक्ट्रिक कारपासून इलेक्ट्रिक स्कूटर आणि इलेक्ट्रिक बाईकपर्यंत मागणी वाढली आहे. पुढील वर्षापर्यंत तर देशातील इलेक्ट्रिक गाड्यांची सफर एका नव्या टप्प्यावर पोहचलेली असेल. 2020 पर्यंत आर्टिफिशल इंटेलिजन्सने सज्ज इलेक्ट्रिक सुपरबाईक देखील बाजारात येतील. बजाज, टीव्हीएस आणि हिरोसारख्या प्रमुख कंपन्यांसह अनेक नव्या कंपन्या या बाईकच्या निर्मितीत आघाडीवर असतील.

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.