चिनी विमानाचा सर्वनाश, दक्षिण चीन समुद्रात अमेरिकन युद्धनौकांना हायअलर्ट

दक्षिण चीन समुद्रात अमेरिकन युद्धनौकांना हायअलर्ट देण्यात आला आहे. भारतानेही हिंदी महासागरात आणि LAC वर सैन्याला अलर्ट केलं आहे (High alert to American warships).

चिनी विमानाचा सर्वनाश, दक्षिण चीन समुद्रात अमेरिकन युद्धनौकांना हायअलर्ट
Follow us
| Updated on: Sep 05, 2020 | 9:29 PM

मुंबई : भारत आणि दक्षिण चीन समुद्रात अमेरिकेच्या वाढत्या दबावानं चीनचा पारा आधीच चढला आहे. पण, शुक्रवारी (4 सप्टेंबर) असं काही घडलं, ज्यामुळे चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्या पायाखालची जमीन सरकली आहे (High alert to American warships). तैवानने चीनचं सुखोई-35 फायटर जेट पॅट्रियॉट मिसाईल डिफेन्स सिस्टमनं जाळून खाक केलं. मात्र, सध्या यावर चीन किंवा तैवान कुणीच प्रतिक्रिया दिलेली नाही. पण, तैवाननं पहिल्यांदाच दिलेल्या या प्रत्युत्तरानं तिसऱ्या महायुद्धाची सुरुवात झाल्याचा अंदाज लावला जातोय (High alert to American warships).

विशेष म्हणजे, या घटनेनंतर अमेरिका आणि भारतानं तशी तयारीही सुरु केल्याचं दिसत आहे. दक्षिण चीन समुद्रात अमेरिकन युद्धनौकांना हायअलर्ट देण्यात आला आहे. डियागो गार्सियात अमेरिकेनं B-2 स्प्रीट स्टिल्थ बॉम्बर उडवला. भारतानेही हिंदी महासागरात आणि LAC वर सैन्याला अलर्ट केलं आहे.

तैवानला अमेरिकेचे सुरक्षाकवच

खरंतर आतापर्यंत चीनला कधीच प्रत्युत्तर न देणाऱ्या तैवानला खरी हिंमत अमेरिकेने दिली आहे. चीन सातत्याने तैवानला दाबण्याचा प्रयत्न करत होता. पण 2016 मध्ये चिनी कम्युनिस्ट पार्टीच्या कट्टर विरोधक आयर्न लेडी त्साई इंग व्हेन तैवानच्या राष्ट्रपती झाल्या. त्यानंतर बीजिंगमध्ये खळबळ माजली.

चीनसोबतचा संघर्ष वाढल्यानंतर अमेरिकेने तैवानची ताकद वाढवायला सुरुवात केली. अमेरिकेने सैन्य मदतीसोबतच चीनसोबत लढण्यासाठी तैवानला हत्यारंही दिली आहे. त्यातीलच एका पॅट्रियॉट मिसाईल डिफेन्स सिस्टमने चीनचं फायटर जेट पाडल्याचा दावा केला जात आहे.

पॅट्रियॉट सिस्टममध्ये मिसाईल आणि फाइटर जेट नष्ट करण्याची ताकद आहे. ही डिफेन्स सिस्टम मीडियम रेंज बॅलेस्टिक मिसाईल्स पाडण्यास सक्षम आहे. PAC-3 ची टेक्नॉलॉजीत हिट टू किल म्हणजे धोक्याच्या सर्वनाश करण्याची क्षमता आहे.पॅट्रियॉट सिस्टम 160 किमी दूरपर्यंत आणि 70 किमी उंचीपर्यंत हल्ला करु शकते.

हेही वाचा : चिनी लष्कराची पुन्हा आगळीक, पूर्व लडाखमधील सीमेवरील सहमतीचे उल्लंघन, भारतीय सैनिकांचे सडेतोड उत्तर

अमेरिकेकडून मिळालेल्या हत्यारांनी तैवानचा आत्मविश्वास वाढला आहे. विशेष म्हणजे अनेक दिवस अमेरिकन नौदलाने तैवान नौसैनिकांसोबत दक्षिण चीन समुद्रात संयुक्त युद्धसरावही केला. या सरावातून चीनविरोधात तैवानला साथ असल्याचं अमेरिकेने स्पष्ट केलं.

काही दिवसांपूर्वीच अमेरिकेचे आरोग्यमंत्री एलेक्स अजार यांनी तैवान दौराही केला. मागील 41 वर्षात पहिल्यांदाच अमेरिकेचे कॅबिनेट मंत्री तैवानमध्ये आल्यानं, चीनचा जळफळाट झाला होता.

अमेरिकेच्या मदतीमुळेच चीनपेक्षा कितीतरी लहान देशानं पिपल्स लिबरेशन आर्मीला तोंडघशी पाडलं आहे. याचा संताप चीननं दक्षिण चीनी समुद्रात मिसाईल डागत व्यक्त केला. एवढंच नाही तर बीजिंगच्या वॉररुमध्ये तैवानवर हल्ल्याचीही प्लानिंग लाल सैन्यानं सुरु केली आहे. पण, अमेरिकेचा बॅकअप असल्यामुळे जिनपिंग लाल सेनेला तैवानवर हल्ला करण्यापासून रोखतोय. यालाच खऱ्या अर्थानं सुपरपॉवरची भीती म्हणतात.

संबंधित बातमी : तैवानने चीनचं विमान पाडल्याची चर्चा, घुसखोरीला रोखठोक उत्तर, अधिकृत घोषणेकडे लक्ष

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.