AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हिंगणघाट जळीतकांडातील पीडितेचा मृत्यू, गेल्या आठ दिवसांत काय-काय घडलं?

वर्ध्यातील हिंगणघाट जळीतकांडातील पीडित शिक्षिकेची मृत्यूशी झुंज अखेर अपयशी (Hinganghat Burn Victim Teacher Death) ठरली.

हिंगणघाट जळीतकांडातील पीडितेचा मृत्यू, गेल्या आठ दिवसांत काय-काय घडलं?
| Updated on: Feb 10, 2020 | 8:56 AM
Share

वर्धा/नागपूर : वर्ध्यातील हिंगणघाट जळीतकांडातील पीडित शिक्षिकेची मृत्यूशी झुंज अखेर अपयशी (Hinganghat Burn Victim Teacher Death) ठरली. हृदयविकाराचा धक्का आल्याने पहाटे 24 वर्षीय पीडितेची प्रकृती खालावली होती, त्यानंतर आज सकाळी (सोमवार 10 फेब्रुवारी) सहा वाजून 55 मिनिटांनी तिने नागपुरातील ऑरेंज सिटी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. पीडितेवर उपचार करणारे डॉ. राजेश अटल यांनी मेडिकल बुलेटिन घेऊन तिच्या मृत्यूची दुःखद बातमी सांगितली.

हिंगणघाट जळीतकांड कधी काय घडलं?

3 फेब्रुवारी 2020 (सोमवार) : 24 वर्षीय प्राध्यापिका नेहमीप्रमाणे सकाळी कामावर निघाली असताना आरोपी विक्की नगराळेने तिचा पाठलाग केला. सकाळी साडेसातच्या सुमारास शहरातील एका चौकात येताच आरोपीने तिच्यावर पेट्रोल ओतून तिला जाळण्याचा प्रयत्न केला. यामध्ये ती 20 ते 30 टक्के भाजली होती.

पीडितेला उपचारासाठी हिंगणघाट शहरातील रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यानंतर सकाळी 9.30 वाजताच्या सुमारास तिला नागपुरातील ऑरेंज सिटी रुग्णालयात हलवण्यात आलं.

आरोपी विक्की नगराळे याला वर्धा जिल्ह्यातील टाकळघाट परिसरातून अटक करण्यात आली.

पीडित प्राध्यापिकेच्या सहकारी आणि विद्यार्थ्यांचा उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयावर मोर्चा, कारवाईची मागणी.

4 फेब्रुवारी 2020 (मंगळवार) :  पीडितेला न्याय द्या, अशी मागणी करत मोठ्या प्रमाणावर जनसमुदाय रस्त्यावर. हिंगणघाट शहरात मोर्चा, नराधम आरोपीचं एन्काऊण्टर करा किंवा त्याला फाशीची शिक्षा द्या, अशी जनसामान्यांची मागणी, सर्वपक्षीयांकडून ‘हिंगणघाट बंद’

आरोपी विकेश ऊर्फ विक्की नगराळेला न्यायालयात हजर करण्यात आलं. पोलिसांकडून आरोपीचा पाच दिवसांचा रिमांड मागितला. न्यायालयाने आरोपीला 8 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. पोलिसांनी गुप्तरित्या आरोपीला न्यायालयात हजर करत तातडीने रवानाही केलं.

5 फेब्रुवारी 2020 (बुधवार) : गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पीडित तरुणीची भेट घेतली. नॅशनल बर्न सेंटर मुंबईचे तज्ज्ञ डॉक्टर सुनील केसवानी हेदेखील यावेळी उपस्थित होते.

आरोपीला कठोर शिक्षा मिळावी म्हणून खटला फास्ट ट्रक कोर्टात चालवणार, हा खटला ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकम यांनी लढवावा अशी मागणी पीडितेच्या कुटुंबीयांनी केली, त्यामुळे उज्वल निकम यांची नियुक्ती करु, गृहमंत्री अनिल देशमुखांची माहिती

7 फेब्रुवारी 2020 (शुक्रवार) : आरोपीला मध्यरात्रीच्या वेळीच न्यायालयासमोर हजर केलं. न्यायालयाने घटनेनंतर नागरिकांमधील संताप लक्षात घेता रात्री 12.25 वाजता या प्रकरणावर सुनावणी घेतली.

8 फेब्रुवारी 2020 (शनिवार) : आरोपी विक्की नगराळेला 12 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली.

पीडितेला श्वास घेण्यास त्रास होत असल्याने डॉक्टरांनी तिला व्हेंटिलेटरवर ठेवलं.

9 फेब्रुवारी 2020 (रविवार) : सातव्या दिवशी पीडितेची प्रकृती स्थिर पण नाजूक असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली.  तिच्यावर चौथ्यांदा ऑपरेशन करण्यात आलं. त्यानंतर तिला आयसीयूत ठेवलं. कृत्रिम फीडिंग सुरु होतं, श्वास घेऊ शकत नसल्याने तिला व्हेंटिलेटरवर ठेवलं होतं.

10 फेब्रुवारी 2020 (सोमवार) : पहाटे हृदयविकाराचा धक्का आल्याने पीडितेची प्रकृती खालावली होती. त्यानंतर सकाळी सहा वाजून 55 मिनिटांनी तिने अखेरचा श्वास घेतला.

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.