AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हिंगणघाट जळीतकांड : पीडितेला न्याय मिळवून देण्यासाठी सरकारने ठोस पावले उचलावी : सुप्रिया सुळे

पीडितेच्या मृत्यूनंतर सर्वच स्तरातून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. एकिकडे आरोपी विक्की नगराळे याला फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी करण्यात येत आहे. तर दुसरीकडे, राजकीय नेतेहे पीडितेच्या मृत्यूवर दु:ख व्यक्त करत आहेत.

हिंगणघाट जळीतकांड : पीडितेला न्याय मिळवून देण्यासाठी सरकारने ठोस पावले उचलावी : सुप्रिया सुळे
| Updated on: Feb 10, 2020 | 9:42 AM
Share

वर्धा/नागपूर : वर्ध्यातील हिंगणघाट जळीतकांडातील पीडित शिक्षिकेचा उपचारादरम्यान मृत्यू (Hinganghat Burn Victim Teacher Death) झाला. हृदयविकाराचा धक्का आल्याने पहाटे 24 वर्षीय पीडितेची प्रकृती खालावली होती, त्यानंतर आज सकाळी (10 फेब्रुवारी) सहा वाजून 55 मिनिटांनी तिने नागपुरातील ऑरेंज सिटी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला.

पीडितेच्या मृत्यूनंतर सर्वच स्तरातून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. एकिकडे आरोपी विक्की नगराळे याला फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी करण्यात येत आहे. तर दुसरीकडे, राजकीय नेते पीडितेच्या मृत्यूवर दु:ख व्यक्त करत आहेत (Hinganghat Teacher Death). खासदार सुप्रिया सुळे यांनीही या घटनेवर दु:ख व्यक्त करत पीडितेला न्याय मिळवून देण्यासाठी सरकारने ठोस पावले उचलावी, अशी विनंती केली आहे. सुप्रिया सुळे यांनी ट्वीट करत पीडितेला श्रद्धांजली वाहली (Supriya Sule).

सुप्रिया सुळे यांची प्रतिक्रिया

“अतिशय दुःखद..! अखेर हिंगणघाट प्रकरणातील युवतीचा मृत्यु झाला.या प्रकरणाची सुनावणी फास्टट्रॅक कोर्टात होतेय. पिडितेला न्याय मिळवून देण्यासाठी सरकारने ठोस पावले उचलावी ही विनंती. या मुलीला भावपूर्ण श्रद्धांजली. तिच्या कुटुंबीयांवर कोसळलेल्या दुःखात आम्ही सर्वजण सहभागी आहोत”.

हेही वाचा : आरोपीला लोकांमध्ये सोडा, तरच मुलीच्या आत्म्याला शांती, हिंगणघाट पीडितेच्या वडिलांचा आकांत

गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांची प्रतिक्रिया

“हिंगणघाट प्रकरणातील ताईचा आज मृत्यू झाला. जीवनाच्या लढाईत जरी तू हरली असलीस तरी तुझ्या न्याय हक्कांच्या लढाईसाठी महाराष्ट्र तुझ्यासोबत आहे. या प्रकरणाचा लवकरात लवकर निकाल लागून जेव्हा तिला न्याय मिळेल तेव्हाच तिला ती योग्य श्रद्धांजली ठरेल”.

भाजप नेते किरिट सौमय्या यांची प्रतिक्रिया

“समाजाने काळजी घ्यायची गरज आहे, सरकारने बोध घेण्याची गरज आहे”, अशी प्रतिक्रिया भाजप नेते किरिट सौमय्या यांनी हिंगणघाट पीडितेच्या मृत्यूवर दिली.

हेही वाचा : हिंगणघाट जळीतकांडातील पीडितेचा मृत्यू, गेल्या आठ दिवसांत काय-काय घडलं?

हिला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष चारुलता टोकस यांची प्रतिक्रिया

“हिंगणघाट प्रकरणातील आरोपीला कायद्याने कठोर शिक्षा द्यावी, हीच तिला खरी श्रद्धांजली असेल”, असं महिला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष चारुलता टोकस यांनी सांगितलं.

खासदार रामदास तडस यांची प्रतिक्रिया

“अतिशय दुःखद घटना! हिंगणघाट घटनेतील पीडित युवतीचा आज सकाळी उपचारादम्यान नागपूर येथे मृत्यु झाला. तिच्या आत्म्याला शांती मिळो व परमेश्वर तिच्या परिवाराला दुःख सहन करण्याची ताकद देवो हीच प्रार्थना..! भावपूर्ण श्रद्धांजली..!”, असं ट्वीट करत खासदार रामदास तडस यांनी पीडितेला श्रद्धांजली वाहिली.

नवाब मलिक यांची प्रतिक्रिया

“हिंगणघाटची घटना दुर्दैवी, आरोपीवर कडक कारवाई केली जाईल, मंत्रिमंडळात या प्रकरणी चर्चा झाली”, अशी प्रतिक्रिया नवाब मलिक यांनी दिली.

राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांची प्रतिक्रिया

“अत्यंत दुर्दैवी अशी ही घटना आहे. अशा घटना घडल्यानंतर तळपायाची आग मस्तकात जाते. समाजाचं बाजारीकरण झाला असून स्त्री वस्तू म्हणून पाहिलं जातं. त्यामुळे तीच स्वातंत्र्य हिरावून घेतलं आहे, आरोपीला फाशीची शिक्षा झालीच पाहिजे. समाजातील या विकृतीचा नायनाट झाला पाहिजे, या संदर्भात समाज प्रबोधन आवश्यक आहे. पीडित कुटुंबातील व्यक्तीला नोकरी देण्याचा प्रयत्न सरकारच्या माध्यमातून केला जाणार आहे”, हिंगणघाट प्रकरणी राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी संतप्त अशी प्रतिक्रिया दिली.

वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान.
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?.
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास.
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा.
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा.