All Is Not Well : हिंजवडीचा रस्ता दररोज तीन तास जाम, नोकरदारांचं मोदींसाठी ट्वीट

पुण्याच्या चिंचवड परिसरातील सर्वात मोठं आयटी पार्क असलेल्या हिंजवडीत (Hinjawadi IT Park) दररोज सकाळी आणि सायंकाळी दोन ते तीन तास वाहतूक कोंडी होते. याबाबतचा एक फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतो आहे (Hinjawadi Traffic Jam). या फोटोमध्ये रस्त्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या दिसत आहे.

All Is Not Well : हिंजवडीचा रस्ता दररोज तीन तास जाम, नोकरदारांचं मोदींसाठी ट्वीट

पुणे : पुण्याच्या चिंचवड परिसरातील सर्वात मोठं आयटी पार्क असलेल्या हिंजवडीत (Hinjawadi IT Park) दररोज सकाळी आणि सायंकाळी दोन ते तीन तास वाहतूक कोंडी होते. याबाबतचा एक फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतो आहे (Hinjawadi Traffic Jam). या फोटोमध्ये रस्त्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या दिसत आहे. हा फोटो चिंचवड येथील हिंजवडीतील भूमकर चौकातील असल्याची माहिती आहे (Hinjawadi Traffic).

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेतील ह्यूस्टन येथे झालेल्या ‘हाउडी मोदी’ या कार्यक्रमात वेगवेगळ्या भाषांमध्ये भारतात सर्व ठीक असल्याचं वक्तव्य केलं होतं. त्यावरुन आता लोक देशातील वेगवेगळ्या समस्या मांडत मोदींना ट्रोल करत आहेत (Howdy Modi). देशात सर्वकाही ठीक नाही असं सांगत आहेत. असाच पुण्यातील हिंजवडीचा एक फोटो सध्या व्हायरल होतो आहे (Hinjawadi Traffic Jam). यासोबत मोदींना टॅग करुन ‘सर्व काही ठीक नाही’, असं दाखवण्यात येत आहे.

ट्वीटरवर सुधीर देशमुख नावाच्या युझरने हा वाहतूक कोंडीचा फोटो ट्वीट केला. त्यासोबत त्याने पंतप्रधान मोदी आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टॅग करत तुमच्या अधिकाऱ्यांनी आम्हाला निराश केल्याची खंत व्यक्त केली. “#HowdyModi हिंजवडीत सर्व काही ठीक नाही. लोक गेल्या दोन ते तीन तासांपासून तीन किलोमीटरचं अंतर पार करण्यासाठी अडकून पडले आहेत. नोट : हिजवडी हे सर्वात मोठं आयटी पार्क आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तुम्ही आणि तुमच्या अधिकाऱ्यांनी आम्हाला निराश केलं. आम्ही ज्या परिस्थितीत आहोत त्यावर स्पष्टीकरण देण्यासाठी तुमच्या अधिकाऱ्यांकडे हजारो कारण असतील”, असं ट्वीट सुधीर देशमुख यांनी केलं.

विशेष म्हणजे हिंजवडी हे पुण्यातील खूप मोठं आयटी पार्क आहे. तिथे दररोज लोकांना अशा प्रकारची वाहतूक कोंडींला सामोरे जावं लागतं. मात्र, प्रशासन अद्यापही यावर कुठला तोडगा काढू शकलेलं नाही.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI