AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नितीश कुमार सातव्यांदा घेणार मुख्यमंत्रिपदाची शपथ; भाजपचे चाणक्य अमित शाह सोहळ्याला उपस्थित राहणार

संयुक्त जनता दलाला (JDU) कमी जागा मिळाल्यामुळे नितीश कुमार यांना मुख्यमंत्रिपदी बसण्याचा नैतिक हक्क नाही, अशी टीका विरोधकांकडून करण्यात येत होती. | Amit Shah

नितीश कुमार सातव्यांदा घेणार मुख्यमंत्रिपदाची शपथ; भाजपचे चाणक्य अमित शाह सोहळ्याला उपस्थित राहणार
| Updated on: Nov 16, 2020 | 10:12 AM
Share

नवी दिल्ली: बिहार विधानसभा निवडणुकीतील राष्ट्रीय लोकशाहीच्या आघाडीच्या (NDA) विजयानंतर आज नितीश कुमार सातव्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेत आहेत. या सोहळ्याला भाजपचे चाणक्य अमित शाह आणि पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा उपस्थित राहणार असल्याची माहिती समोर येत आहे. संयुक्त जनता दलाला (JDU) कमी जागा मिळाल्यामुळे नितीश कुमार यांना मुख्यमंत्रिपदी बसण्याचा नैतिक हक्क नाही, अशी टीका विरोधकांकडून करण्यात येत होती. तर भाजपमधील काही गटांकडूनही संख्याबळाच्या आधारे भाजपचाच मुख्यमंत्री झाला पाहिजे, असा दावा केला जात होता. त्यामुळे नितीश कुमारांची मुख्यमंत्रिपदाची खुर्ची काहीशी डळमळीत झाली होती. मात्र, आता अमित शाह हे स्वत: नितीश यांच्या शपथविधीला उपस्थित राहणार असल्याने भाजपने संबंधितांना योग्य तो संदेश दिल्याची चर्चा आहे. (BJP Amit Shah will attend oath taking ceremony of Bihar Chief Minister designate Nitish Kumar in Patna)

बिहार विधानसभेच्या एकूण 243 जागांपैकी 125 जागांवर एनडीएला विजय मिळवला होता. यामध्ये भाजपला 74 तर संयुक्त जनता दलाच्या उमेदवारांना 43 जागांवर विजय मिळाला होता. मात्र, कमी जागा मिळूनही भाजपने नितीश कुमार यांनाच मुख्यमंत्री करण्याचा शब्द पाळला आहे. त्यामुळे भाजपमधील एक गट नाराज असल्याची चर्चा होती. त्यामुळे भविष्यात नितीश कुमार यांना मुख्यमंत्रिपद सांभाळण्यात अडचणी येतील, असा होरा बांधला जात आहे. मात्र, अमित शाह या शपथविधीला उपस्थित राहिल्याने भाजपचा नितीश कुमार यांना संपूर्ण पाठिंबा असल्याचा संदेश जाईल. त्यामुळे नितीश यांच्या भाजपमधील हितशत्रूंना परस्पर चाप बसण्याची शक्यता आहे.

दरम्यान, बिहारच्या मुख्यमंत्रिपदाची धुरा कोणाकडे दिली जाणार, हे अद्याप निश्चित झालेले नाही. भाजपमधील 4 चेहरे या पदासाठी आघाडीवर आहेत. सर्वात पहिल्या क्रमांकावर भाजप विधीमंडळ नेते तारकिशोर प्रसाद यांच्या नावाची चर्चा आहे. भाजपमधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार 2 मुख्यमंत्री निवडल्यास भाजप उपनेत्या रेणु देवी देखील उपमुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत पुढे आहेत.

संबंधित बातम्या:

एकेकाळी 7 दिवसात खुर्ची गेली, आता नितीश कुमार बिहारच्या मुख्यमंत्रिपदाची सातव्यांदा शपथ घेणार

बिहारमध्ये भाजपचा चेहरा कोण? उपमुख्यमंत्रिपदासाठी ‘हे’ 4 चेहरे आघाडीवर

नितीश कुमार भलेही मुख्यमंत्री होतील पण रिमोट कंट्रोल दुसऱ्याकडे असेल, काँग्रेस नेत्याचा निशाणा

(BJP Amit Shah will attend oath taking ceremony of Bihar Chief Minister designate Nitish Kumar in Patna)

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.