नितीश कुमार भलेही मुख्यमंत्री होतील पण रिमोट कंट्रोल दुसऱ्याकडे असेल, काँग्रेस नेत्याचा निशाणा

नितीश कुमार भलेही बिहारचे मुख्यमंत्री होतील पण रिमोट कंट्रोल दुसऱ्या कुणाच्या हातात असेल, असा निशाणा काँग्रेस नेते तारीक अन्वर यांनी साधला आहे.

नितीश कुमार भलेही मुख्यमंत्री होतील पण रिमोट कंट्रोल दुसऱ्याकडे असेल, काँग्रेस नेत्याचा निशाणा
Follow us
| Updated on: Nov 16, 2020 | 8:58 AM

पाटणा : जेडीयूचे प्रमुख नितीश कुमार (Nitish Kumar) सातव्यांदा बिहारचे मुख्यमंत्री होणार आहेत. रविवारी एनडीएच्या बैठकीमध्ये एकमताने नितीश कुमार यांचं नावं विधीमंडळ नेतेपदी निश्चित करण्यात आलं. आज (सोमवारी) सकाळी11.30 वाजता नितीश कुमार यांचा शपथविधी होणार आहे. अशातच नितीश कुमार भलेही मुख्यमंत्री होतील पण रिमोट कंट्रोल दुसऱ्याकडे असेल, असा निशाणा काँग्रेस नेते तारीक अन्वर (Tariq Anwar) यांनी नितीश कुमार यांच्यावर साधला आहे. (Tariq Anwar Slam Nitish Kumar)

बिहार निवडणुकीत (Bihar Election) भाजपने प्लॅन करुन नितीश कुमार कसे कमकुवत होतील, हे पाहिलं. त्यानुसार त्यांचा प्लॅन यशस्वी झाला. नितीश कुमार यांच्या पक्षाचं बिहारमध्ये मोठ्या प्रमाणावर अस्तित्व असताना भाजपने आताच्या निवडणुकीत जेडीयूची अवस्था कमजोर केली, अशी टीका तारीक अन्वर यांनी केली आहे.

नितीश कुमार हे पूर्वी एनडीएचे मजबूत नेते आणि बिहारचे मुख्यमंत्री होते पण आता भाजप त्यांना भलेही मुख्यमंत्रिपद देईल पण रिमोट कंट्रोल दुसऱ्याकडे असेल, अशी भविष्यवाणी तारीक अन्वर यांनी केली आहे.

69 वर्षांचे नितीश कुमार सातव्यांदा बिहारचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत.आज सकाळी साडे अकरा वाजता राजभवनात त्यांचा शपथविधी पार पडणार आहे. बिहारचे राज्यपाल फागू चव्हाण नितीश कुमार यांना शपथ देतील.

आपल्या राजकीय कारकीर्दीत सातव्यांदा तर सलग चौथ्यांदा नितीश कुमार बिहारच्या मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीवर विराजमान होतील. सलग तीन वेळा मुख्यमंत्रिपद भुषवल्यानंतर अँटीइन्कमबन्सीचा फटका नितीश कुमार यांना बसला. मात्र त्याचा त्यांच्यावर काहीही फरक पडला नाही. निवडणुकीपूर्वी भाजपने दिलेल्या शब्दाच्याआधारे नितीश कुमार सोमवारी (आज) मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील.

नितीश कुमार यांच्याबरोबर काही मंत्री देखील शपथ घेतील. बिहारच्या उपमुख्यमंत्रिपदासाठी भाजपकडून नवा चेहरा दिला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. विद्यमान उपमुख्यमंत्री सुशीलकुमार मोदी (Sushilkumar Modi) यांना पुन्हा संधी मिळण्याची शक्यता कमी आहे. प्रेम कुमार, कामेश्वर चौपाल यांची नावं शर्यतीत आहेत.

नितीश कुमार मुख्यमंत्रिपदी जरी विराजमान झाले तरी मंत्रिमंडळातील महत्त्वाची खाती भाजपकडे जाणार असल्याच्या चर्चा आहेत. कारण जेडीयूच्या तुलनेत भाजप आमदारांची संख्या जास्त आहे. भाजपचे जास्त आमदार असून देखील जेडीयूला मुख्यमंत्रिपद मिळणार असल्याने अगोदरच पक्षात नाराजीचा सूर आहे. अशा परिस्थितीत काही महत्त्वाची खाती भाजपकडे राहणार असल्याचे आडाखे काही राजकीय निरीक्षक बांधताना दिसत आहेत.

बिहार विधानसभा निवडणुकीत आरजेडी क्रमांक एकचा पक्ष ठरला. तेजस्वी यादव यांच्या झंझावाती प्रचाराला लोकांनी जोरदार प्रतिसाद देत आरजेडीचे 75 जागांवर उमेदवार विजयी झाले. भाजपला या निवडणुकीत अभूतपूर्व यश मिळालं. भाजपने टाकलेले सर्व डावपेच यशस्वी झाले. एक्झिट पोलमध्ये महागठबंधनची सरशी होणार, असं चित्र दाखवलं गेलं मात्र निकालानंतर एनडीएला स्पष्ट बहुमत मिळालं.

नितीश कुमार यांचे 43 आमदार निवडून आले आहेत तर भाजपचे 74 उमेदवार निवडून आले आहेत. भाजपच्या तुलनेत नितीश कुमार यांच्या जेडीयूचे आमदार खूपच कमी आहे. अशाही परिस्थितीत नितीश कुमार यांच्या गळ्यात मुख्यमंत्रिपदाची माळ पडणार असल्याने भाजपमध्ये अंतर्गत नाराजी असल्याची चर्चा आहे.

(Tariq Anwar Slam Nitish Kumar)

संबंधित बातम्या

जनादेश नितीश कुमारांविरोधात, फक्त 40 जागा जिंकून मुख्यमंत्रिपद कसे? राजदचा सवाल

बिहारच्या उपमुख्यमंत्रिपदासाठी भाजपकडून नवा चेहरा?

नितीश कुमार यांची विधिमंडळ नेतेपदी निवड, सातव्यांदा बिहारचे मुख्यमंत्री होणार, सोमवारी शपथविधी

व्हिडीओ पाहा :

Non Stop LIVE Update
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?.
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान.
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात.
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार.
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान.