‘मॅन वर्सेस वाईल्ड’मध्ये आज मोदी दिसणार, या क्रार्यक्रमाचं शूटिंग कसं होतं?

Nupur Chilkulwar

Nupur Chilkulwar |

Updated on: Aug 12, 2019 | 1:25 PM

आपण बेअर ग्रिल्सला आजपर्यंत अनेक स्टंट करताना, वेगवेगळ्या जीवांना बेफिकीरिने खाताना पाहिलं आहे. पण तो ते कसं करतो, हे कदाचित तुम्हाला माहीत नसेल.

'मॅन वर्सेस वाईल्ड'मध्ये आज मोदी दिसणार, या क्रार्यक्रमाचं शूटिंग कसं होतं?

मुंबई : अमेरिकेचा सर्व्हायवर शो ‘मॅन वर्सेस वाईल्ड’ (Man vs Wild) मध्ये भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) दिसणार आहेत. डिस्कव्हरी चॅनेलवर हा कार्यक्रम आज दाखवला जाईल. मोदींनी ही तयारी आंतरराष्ट्रीय ‘टायगर डे’ निमित्त केली आहे. ‘मॅन वर्सेस वाईल्ड’ या कार्यक्रमाचा होस्ट बेअर ग्रिल्सने (Bear Grylls) ट्विटरवर प्रोमो शेअर करत म्हटले की, 180 देशातील लोक लवकरच पंतप्रधान नरेंद्र मोदींना डिस्कव्हरी चॅनेलवर पाहू शकणार आहेत. या कार्यक्रमादरम्यान मोदी भारतातील वन्य जीवन पाहणार आहेत. तसेच, वन्य जीवांच्या संरक्षणासाठी जागरुकता अभियान राबवलं गेलं. 12 ऑगस्ट म्हणजेच आज नरेंद्र मोदी ‘मॅन वर्सेस वाईल्ड’ कार्यक्रमात दिसणार आहेत. रात्री 9 वाजता डिस्कव्हरी चॅनलवर हा कार्यक्रम प्रसारित होईल.

निर्भीड आणि साहसी बेअर ग्रिल्स

‘मॅन वर्सेस वाईल्ड’ या कार्यक्रमाचा होस्ट बेअर ग्रिल्स हा अत्यंत निर्भीाड आणि साहसी आहे. अनेक वर्षांपासून तो हा कार्यक्रम करतो आहे. या कार्यक्रमात तो अनेक प्रतिकूल परिस्थितीत जगण्यासाठीचा संघर्ष करताना दिसतो. या कार्यक्रमादरम्यान बेअर ग्रिल्सने आतापर्यंत अनेक जंगलं आणि पर्वतांवर अॅडव्हेंचर ट्रीप केल्या. या सर्व ट्रीपमध्ये त्याने कुठल्या ना कुठल्या भयंकर परिस्थितीशी झुंज दिली. मग ते बर्फाच्छादित पर्वतांवर आपले प्राण वाचवण्यासाठी पळणे असो, पाण्यात पोहून दुसऱ्या किनाऱ्यापर्यंत पोहोचणे असो किंवा कुठल्या जंगली प्राण्याला मारुन आपली भूक भागवणे असो. बेअर ग्रिल्सने आजवर जे काही या कार्यक्रमादरम्यान केलं, ते करण्याबाबत आपण विचारही करु शकत नाही.

कुठल्याही कठीण परिस्थितीत आपण स्वत:चे प्राण कशाप्रकारे वाचवू शकतो आणि स्वत:ला त्या समस्येतून कसं सोडवू शकतो, याची शिकवण या कार्यक्रमाच्या माध्यमातून बेअर ग्रिल्स नेहमीच देत आला आहे. त्याने त्याच्या या साहसी कार्यक्रमात अनेक हॉलिवूड कलाकारांनाही आमंत्रित केलं, त्यांच्यासोबत या अॅडव्हेंचर ट्रीप केल्या.

आपण बेअर ग्रिल्सला आजपर्यंत अनेक स्टंट करताना, वेगवेगळ्या जीवांना बेफिकीरिने खाताना पाहिलं आहे. पण तो ते कसं करतो, हे कदाचित तुम्हाला माहीत नसेल. तो हे सर्व काही एकट्याने करत नाही. तो त्याच्या या अॅडव्हेंचर ट्रीपवर एकटा नसतो. त्याच्यासोबत त्याचा एक कॅमेरामन नेहमी असतो, जो हे सर्व शूट करतो, हे तुम्हाला माहीत असेल. पण, त्याशिवाय अनेक लोक त्याच्यासोबत असतात, जे त्याला सुरक्षित ठेवतात.

‘मॅन वर्सेस वाईल्ड’ या कार्यक्रमाचं शूटिंग कसं होतं?

‘मॅन वर्सेस वाईल्ड’ हा एक रियालिटी शो आहे. यामध्ये बेअर ग्रिल्स हा त्या ठिकाणांवर जातो जिथे माणसाचं कुठलंही वास्तव्य नसतं. जसे की, दाट जंगल, बर्फाळ प्रदेश, वाळवंट इत्यादी ठिकाणी जाऊन तो तिथल्या परिस्थितीशी झगडून जिवंत राहण्याचा प्रयत्न करतो. यावेळी त्याच्यासोबत त्याची संपूर्ण टीम असते. बेअर ग्रिल्ससोबत एक्सपर्ट्सची टीम आहे, जी प्रत्येक वेळी त्याच्यासोबत असते.

या अॅडव्हेंचर ट्रीपदरम्यान त्याच्यासोबत साऊंडमन, स्टंट एक्सपर्ट, दिग्दर्शक आणि एक-दोन लोक असतात. यापैकी कॅमेरामन आणि साऊंडमन यांचं काम कार्यक्रमाला चांगल्या पद्धतीने शूट करण्याचं असतं. तर स्टंट एक्सपर्ट आणि त्याच्या सोबतचे लोक कुठल्याही परिस्थितीत बेअर ग्रिल्सचा जीव वाचवणे आणि कठीण परिस्थितीशी झुंज देण्याचं काम करतात. त्याशिवाय, टीममधील इतर लोक हे बेअर ग्रिल्सच्या मदतीसाठी असतात. तो जिथे जाईल तिथे त्याची ही संपूर्ण टीम त्याच्यासोबत असते.

हा कार्यक्रम बनावटी असल्याचं अनेकदा म्हटलं गेलं, मात्र बेअर ग्रिल्सच्या चाहत्यांना यापासून काहीही फरक पडत नाही. ते आजही बेअर ग्रिल्सचे स्टंट आणि त्याचा तो निर्भयपणा एन्जॉय करतात.

पाहा व्हिडीओ :

Non Stop LIVE Update

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI