VIDEO : डिस्कव्हरी चॅनेलच्या 'Man vs. Wild'मध्ये पंतप्रधान मोदी दिसणार

डिस्कव्हरी चॅनेलचा प्रसिद्ध शो 'मॅन वर्सेज वाईल्ड'मध्ये यंदा बेअर ग्रिल्ससोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी दिसणार आहेत. ही तयारी मोदींनी आतंरराष्ट्रीय टायगर डे निमित्त केली आहे.

VIDEO : डिस्कव्हरी चॅनेलच्या 'Man vs. Wild'मध्ये पंतप्रधान मोदी दिसणार

नवी दिल्ली : डिस्कव्हरी चॅनेलचा प्रसिद्ध शो ‘मॅन वर्सेज वाईल्ड’मध्ये यंदा बेअर ग्रिल्ससोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी दिसणार आहेत. ही तयारी मोदींनी आतंरराष्ट्रीय टायगर डे निमित्त केली आहे. बेअर ग्रिल्सने ट्विटरवर प्रोमो शेअर करत म्हटले की, 180 देशातील लोक लवकरच पंतप्रधान नरेंद्र मोदींना डिस्कव्हरी चॅनेलवर पाहू शकणार आहेत.

मोदी भारतातील वन्य जीवन पाहणार आहेत. ज्यामध्ये जंगली जीवांच्या संरक्षणासाठी जागरुकता अभियान करणार आहेत. येत्या 12 ऑगस्ट रोजी नरेंद्र मोदी मॅन वर्सेज वाईल्ड कार्यक्रमात दिसणार आहेत.

मोदी या कार्यक्रमात पूर्णपणे वेगळ्या वेशभूषेत दिसणार आहेत. आतापर्यंत लोकांनी बेअर ग्रिल्सला अति दुर्गम आणि धोकादायक क्षेत्रात जाताना पाहिले असेल. तसेच अनेक स्टंट करतानाही आपण त्याला पाहिले आहे. पण आता त्याच्यासोबत मोदींनाही आपण स्टंट करताना पाहणार आहोत. ग्रिल्ससोबत मोदी त्या स्पोर्टी लूकमध्ये जंगलात फिरताना, बोटीने नदी पार करताना, झाडातून फिरताना, डोंगरावर चढताना दिसणार आहेत.

डिस्कव्हरी चॅनलचा हा शो जगभर प्रसिद्ध आहे. जगातील अनेक भाषांमध्ये हा शो डब करुन दाखवला जातो. अमेरिकेचे माजी राष्ट्रपती बराक ओबामाही या शोमध्ये सहभागी झाले होते. ओबामा यांनी ग्लोबल वॉर्मिंग, क्लायमेंट चेंज, नेचर आणि वाईल्ड लाईफ विषयावर भाष्य केले होते.

आंतरराष्ट्रीय टायगर डे निमित्ताने हा शो बनवला आहे. भारतात वाघांना वाघांना वाचवण्यासाठी अनेक प्रयत्न केले जाणार आहेत. या संदर्भात मोदींनी एक ट्वीटही केले आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *