सांगली-कोल्हापूरच्या पूरग्रस्तांना ऑनलाईन मदत कशी कराल?

प्रविण शिंदे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

प्रविण शिंदे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम |

Updated on: Aug 09, 2019 | 10:12 PM

पूरग्रस्तांना आपलीही काही मदत व्हावी, यासाठी अनेक नागरिक मदतीचा हात पुढे करत आहेत. मात्र, ही मदत नेमकी द्यायची कशी, ती पूरग्रस्तांपर्यंत पोहचवायची कशी असा प्रश्न अनेकांना पडला आहे. त्यांच्यासाठी मदत करण्याचे हे काही मार्ग.

सांगली-कोल्हापूरच्या पूरग्रस्तांना ऑनलाईन मदत कशी कराल?

मुंबई : पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार पावसाने तयार झालेल्या महापुराच्या स्थितीत अनेक नागरिकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत, तर लाखो लोक बेघर झाले आहेत. अशास्थितीत सरकार मदत आणि बचाव कार्य करतच आहे. सोबत अनेक स्वयंसेवी संस्थां देखील या पूरग्रस्तांना मदतीसाठी पुढे आल्या आहेत. या पूरग्रस्तांना आपलीही काही मदत व्हावी, यासाठी अनेक नागरिक मदतीचा हात पुढे करत आहेत. मात्र, ही मदत नेमकी द्यायची कशी, ती पूरग्रस्तांपर्यंत पोहचवायची कशी असा प्रश्न अनेकांना पडला आहे. त्यांच्यासाठी मदत करण्याचे हे काही मार्ग.

मुख्यमंत्री सहाय्यता निधी

आपत्कालीन स्थितीत सापडलेल्या राज्यातील आणि देशातील नागरिकांना मदत करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने https://cmrf.maharashtra.gov.in ही वेबसाईट सुरु केलेली आहे. तुम्ही जर ऑनलाईन पेमेंटच्या माध्यमातून आर्थिक मदत करणार असाल तर या वेबसाईटवर मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा एक बारकोड देण्यात आला आहे. तो स्कॅन करुन तुम्ही अगदी काही क्षणात तुम्हाला हवी तेवढी रक्कम येथे दान करु शकता. त्यासाठी तुम्हाला तुमच्याकडे असलेले भीम अॅप किंवा गुगल पे, फोन पे, पेटीएम असे कोणतेही यूपीआयचा (UPI) उपयोग करुन व्यवहार करणारे अॅप वापरता येईल.

या व्यतिरिक्त वेबसाईटवर डोनेट ऑनलाईन (Donate Online) हा पर्याय देखील उपलब्ध येईल. येथे क्लिक केल्यानंतर व्यक्ती, सरकारी संस्था, साखर कारखाना, संस्था, उद्योजक म्हणून मदत करण्याचे पर्याय उपलब्ध आहेत. यातील व्यक्ती (Individual) हा पर्याय निवडा. त्याखालील रकाण्यात तुम्हाला कशासाठी मदत करायची आहे याचेही काही पर्याय आहेत. त्यात मुख्यमंत्री सहाय्यता निधी, जलयुक्त शिवार, दुष्काळ (2015) आणि शेतकरी मदत निधी असे पर्याय आहेत.

पूरग्रस्तांना मदतीसाठी यापैकीचा मुख्यमंत्री सहाय्यता निधी हा पर्याय निवडा. त्यानंतर तुम्हाला तुमची पूर्ण माहिती संबंधित वेबसाईटवर भरावी लागेल. ती माहिती भरल्यानंतर तुम्ही तुमची आर्थिक मदत मुख्यमंत्री सहाय्यता निधीत वर्ग करु शकता.

जिल्हाधिकाऱ्यांनी सुरु केलेल्या खात्यावर आर्थिक मदत

सांगली आणि कोल्हापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी देखील आपल्या स्तरावर पूरग्रस्तांच्या मदतीसाठी आर्थिक मदतीचे आवाहन केले आहे. जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी नागरिकांना पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी मदत कक्षाशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे. त्यासाठी जिल्हास्तरीय पूरग्रस्त मदत सनियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे. जिल्ह्यातील दानशूर व्यक्ती आणि संस्थांनी या कक्षाकडे पूरग्रस्तांसाठी मदत करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी केले आहे.

या पूरग्रस्त मदत सनियंत्रण कक्षाच्या अधिकारी म्हणून जिल्हा पुरवठा अधिकारी राणी ताटे (मो. क्र. 9623389673) आणि उपमुख्य कार्यकारी अधिकारी रविकांत अडसूळ (मो. क्र. 9923009444) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. हा कक्ष सामान्य प्रशासन विभाग, जिल्हा परिषद कोल्हापूर येथे सुरू करण्यात आला आहे. या कक्षाचा दूरध्वनी क्रमांक 0231-2655416, व्हॉट्सॲप क्रमांक 9130059542, मोबाईल क्रमांक 9403145611 आणि ई-मेल आयडी floodreliefkolhapur@gmail.com असा आहे. यावरही तुम्ही मदत करु शकता.

या व्यतिरिक्त अनेक स्वयंसेवी संस्था आणि संघटनांनी देखील पूरग्रस्तांना मदतीचे आवाहन करत वस्तू अथवा पैशांच्या स्वरुपात मदतीचे आवाहन केले आहे. त्यातील विश्वासार्ह आणि जबाबदार संघटनांकडेही आपण मदत देऊ शकता.


Non Stop LIVE Update

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI