AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लोन काढून खरेदी, सणांमध्ये उधारीचा विक्रम पार

दिवाळी आणि छठ सणात लोक कर्ज घेऊन किंवा उधारीवर खरेदी करत आहेत. यामध्ये एक नवा विक्रम रचला गेला आहे. गोक्विक नेटवर्कच्या अहवालानुसार, गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा क्रेडिट किंवा कर्जावरील ऑनलाइन खरेदी दुप्पट झाली आहे. गेल्या वर्षी तो 3.49 टक्के होता, तो यंदा वाढून 6.9 टक्के झाला आहे. यंदा कॅश ऑन डिलिव्हरी ऑर्डरमध्ये 8 टक्क्यांची घट झाली आहे. याचे एक कारण म्हणजे ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म्सना त्यांच्या पेमेंट आणि रिफंड सिस्टीममध्ये सुधारणा करावी लागेल.

लोन काढून खरेदी, सणांमध्ये उधारीचा विक्रम पार
| Updated on: Nov 10, 2024 | 3:27 PM
Share

बाजारात एक नवा ट्रेंड पाहायला मिळत आहे. लोक कर्ज घेऊन किंवा उधारीवर खरेदी करत आहेत. यामध्ये एक नवा विक्रम रचला गेला आहे. दिवाळी आणि छठ हे असे दोन मोठे सण आहेत, ज्यात देशातील सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या उत्तर प्रदेश आणि बिहार या दोन राज्यांतील लोक मोठ्या प्रमाणात खरेदी करतात. त्यामुळे हे दोन्ही सण अर्थव्यवस्थेसाठीही शुभ मानले जातात. पण, यात उधारीवर खरेदी करत नवा विक्रम रचला गेला आहे.

कर्जावर खरेदी करण्याचा नवा विक्रम

दसऱ्याच्या निमित्ताने लोकांनी या सणांची खरेदी सुरू केली असून यंदा या खरेदीत उधारीवर किंवा कर्जावर खरेदी करण्याचा नवा विक्रम करण्यात आला आहे.

दिवाळी 31 ऑक्टोबर आणि 1 नोव्हेंबर रोजी साजरी करण्यात आली. त्याचबरोबर छठ चा सणही 5 नोव्हेंबरपासून सुरु होऊन 8 नोव्हेंबरपर्यंत चालणार आहे.

कर्जावरील ऑनलाइन खरेदी दुप्पट

गोक्विक नेटवर्कच्या अहवालानुसार, गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा क्रेडिट किंवा कर्जावरील ऑनलाइन खरेदी दुप्पट झाली आहे. गेल्या वर्षी तो 3.49 टक्के होता, तो यंदा वाढून 6.9 टक्के झाला आहे.

यंदा प्री-पेड ऑर्डरमध्ये 13 टक्क्यांनी वाढ

दोन अर्थ आहेत, एक म्हणजे लोक आता कर्ज किंवा क्रेडिटने आपले छंद किंवा गरजा पूर्ण करत आहेत. दुसरं म्हणजे अर्थव्यवस्थेतील ग्राहकांच्या भावनेतही सुधारणा दिसून येते. दिवाळी आणि छठच्या पार्श्वभूमीवर यंदा प्री-पेड ऑर्डरमध्ये 13 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

कॅश ऑन डिलिव्हरी ऑर्डरमध्ये 8 टक्क्यांची घट

यंदा कॅश ऑन डिलिव्हरी ऑर्डरमध्ये 8 टक्क्यांची घट झाली आहे. याचे एक कारण म्हणजे ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म्सना त्यांच्या पेमेंट आणि रिफंड सिस्टीममध्ये सुधारणा करावी लागेल.

‘बाय नाऊ पे लेटर’चा पर्याय

आज उधार आणि कर्जावर खरेदी करणेही सोपे झाले आहे. ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर लोकांना ‘बाय नाऊ पे लेटर’चा पर्याय मिळतो. त्याचबरोबर अनेक डिजिटल पेमेंट प्लॅटफॉर्म लवकर पगार, क्रेडिट लाइन असे इतर पर्यायही देतात. तर, लोक आता क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्डवर ईएमआयचा पर्याय घेऊन खरेदी करण्यास प्राधान्य देतात.

लोक कर्ज घेऊन किंवा उधारीवर खरेदी करत आहेत. पण, याचा अतिरेक होऊ नये, याकडे देखील लक्ष द्यायला हवं. कारण, यात नुकसान होण्याची देखील शक्यता आहे. तसेच तुमचे अधिकचे पैसे देखील जाऊ शकतात.

Follow Us
भाऊबीजेला उद्धव आणि राज ठाकरे एकत्र, कौटुंबिक फोटोंनी लक्ष वेधलं!
भाऊबीजेला उद्धव आणि राज ठाकरे एकत्र, कौटुंबिक फोटोंनी लक्ष वेधलं!
पंकजा मुंडेंच्या रामटेक बंगल्यावर धनंजय मुंडेंची भाऊबीज; पाहा खास क्षण
Dhananjay Munde : पंकजा मुंडे यांच्या रामटेक बंगल्यावर धनंजय मुंडेंची भाऊबीज; पाहा खास क्षण
ठाकरे बंधूंचा कौटुंबिक स्नेह! भाऊबीजेच्या निमित्ताने ठाकरे बंधू एकत्र
Thackeray Brothers : ठाकरे बंधूंचा कौटुंबिक स्नेह! भाऊबीजेच्या निमित्ताने ठाकरे बंधू पुन्हा एकत्र
दोन्ही NCP विलिनीकरणाबाबत राऊतांचं मोठं वक्तव्य; बावनकुळे काय म्हणाले?
Chandrashekhar Bawankule : दोन्ही NCP विलिनीकरणाबाबत राऊतांचं मोठं वक्तव्य; बावनकुळे काय म्हणाले?
अजितदादांचा अपघात की घातपात? उमेश पाटलांच्या विधानाने महाराष्ट्र...
अजितदादांचा अपघात की घातपात? उमेश पाटलांच्या विधानाने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ!
रोहित पवारांकडून सोनिया गांधींच्या आत्मचरित्राचं भरभरून कौतुक; म्हणाले
रोहित पवारांकडून सोनिया गांधींच्या आत्मचरित्राचं भरभरून कौतुक; म्हणाले, जीवनप्रवास प्रेरणादायी!
राजकारणापलीकडचं बहीण-भावाचं नातं! प्रसाद लाड आणि चित्रा वाघ यांनी...
राजकारणापलीकडचं बहीण-भावाचं नातं! प्रसाद लाड आणि चित्रा वाघ यांनी साजरी केली भाऊबीज
विलीनीकरणाबाबत सुनेत्रा पवारांची एका वाक्यात प्रतिक्रिया; नेमकं काय...
Sunetra Pawar : विलीनीकरणाबाबत सुनेत्रा पवारांची एका वाक्यात प्रतिक्रिया; नेमकं काय म्हणाल्या?
अमित शाह रविवारी पुणे दौऱ्यावर; तीन कार्यक्रमांसह राजकीय बैठकांकडे...
अमित शाह रविवारी पुणे दौऱ्यावर; तीन कार्यक्रमांसह राजकीय बैठकांकडे सर्वांचे लक्ष!
नागपुरात दिवाळीत आगीच्या 40 हून अधिक घटना; आता 106 फायर हायड्रंट्स उभा
Nagpur : नागपुरात दिवाळीत आगीच्या 40 हून अधिक घटना; आता 106 फायर हायड्रंट्स उभारणार!