पत्नीचा खून करण्यासाठी घेतले दुकानातून कटर अन् मुलीसाठी चॉकलेट, चेहऱ्यावर असंख्य वार, औरंगाबादेत पतीला अटक

मी तुला तुझे साहित्य परत देण्यासाठी आलो आहे, असे म्हणत किरणने तिला खोलीत नेले. तेथे दोघांत भांडण झाले. यात किरणने कटरने तिच्या चेहऱ्यावर वार केले. यात ती प्रचंड रक्तबंबाळ झाली. रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.

पत्नीचा खून करण्यासाठी घेतले दुकानातून कटर अन् मुलीसाठी चॉकलेट, चेहऱ्यावर असंख्य वार, औरंगाबादेत पतीला अटक


औरंगाबादः वाळूज परिसरातील रांजणगावमध्ये पत्नीचा निर्घृण (Murder in Aurangabad) करणाऱ्या पोलिसांनी अटक केली आहे. पत्नीने तोंडी सोडचिठ्ठी घेतल्यानंतर ती दुसरीकडे राहत होती. दरम्यान, पत्नी कामावर गेली असताना दीड वर्षाच्या मुलीला सोबत घेऊन त्याने मुलीसाठी चॉकलेट आणि पत्नीचा खून करण्यासाठीचे कटर एकाच वेळी दुकानातून खरेदी केल्याची माहिती गुन्ह्याच्या तपासात (Aurangabad police ) उघड झाली. हा घटनाक्रम ऐकून पोलिसांनाही हादरा बसला.

पत्नी एकत्र राहण्यास तयार नसल्याचा राग

या प्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवकन्या किरण खिल्लारे, असे मृत पत्नीचे नाव असून पतीचे नाव किरण खिल्लारे असे आहे. शिवकन्या आणि किरणचे तीन वर्षांपूर्वी लग्न झाले होते. त्यानंतर दोघेही किरायाने रांजणगावात राहत होते. यादरम्याना, एक मुलगी झाली. मात्र किरण दारू पिऊन त्रास देत असल्यामुळे शिवकन्या मुलीसह मावशीकडे निमगावला गेली होती. त्यानंतर किरण पत्नी आणि मुलीला घेण्यासाठी गेला असता, तिने त्याच्यासोबत येण्यास नकार दिला व मी तुला सोडचिठ्ठी देत असल्याचे म्हटले.
काही दिवसानंतर शिवकन्या ही मुलीला घेऊन रांजणगावात किरायाने राहू लागली. एका कंपनीत कामालाही जाऊ लागली. दहा दिवसांपूर्वी तिने आईला मुलीला सांभाळण्यासाठी बोलावून घेतले होते. किरण गुरुवारी नांदेडहून रांजणगावात आला. त्याने मुलगी हर्षदाला दुकानात नेत चॉकलेट घेऊन दिले तर पत्नीचा खून करण्यासाठी कटरदेखील खरेदी करुन खिशात ठेवले.

चेहऱ्यावर कटरने वार करत केले रक्तबंबाबळ

गुरुवारी शिवकन्या रात्री कंपनीतून घरी आली तेव्हा, मी तुला तुझे साहित्य परत देण्यासाठी आलो आहे, असे म्हणत किरणने तिला खोलीत नेले. तेथे दोघांत भांडण झाले. यात किरणने कटरने तिच्या चेहऱ्यावर वार केले. यात ती प्रचंड रक्तबंबाळ झाली. रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. सदर घटनेनंतर किरण घरातून फरार झाला. पोलिसांना ही माहिती कळाल्यानंतर त्याच्या मोबाइलचे लोकेशन ट्रेस करत त्याला रेल्वे स्टेशन परिसरातून अटक करण्यात आले. किरणला 22 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

इतर बातम्या-

हॅलो पोलीस स्टेशन? माझा बॉयफ्रेण्ड माझ्याशी बोलत नाहीये” व्याकुळ प्रेयसीला पोलिसांचं उत्तर काय?

बिर्याणीच्या दुकानात 16 वर्षीय मुलावर अनैसर्गिक अत्याचार, अंबरनाथमध्ये खळबळ

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI