Vastu Tips | घरात ‘या’ 5 गोष्टी कधीच संपवू देवू नका , नाहीतर …

वास्तूशास्त्र ही ज्योतिषशास्त्राची महत्त्वाची शाखा मानली जाते. वास्तूचा आपल्या आयुष्याशी थेट संबंध असतो.जर एखाद्या व्यक्तीने आपल्या जीवनात वास्तुशी संबंधित काही गोष्टींची काळजी घेतली तर सर्व समस्या सहजपणे दूर होऊ शकतात.

Vastu Tips | घरात 'या' 5 गोष्टी कधीच संपवू देवू नका , नाहीतर ...
vastu-tips
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: मृणाल पाटील

Dec 19, 2021 | 7:12 AM

मुंंबई :  वास्तूशास्त्र ही ज्योतिषशास्त्राची महत्त्वाची शाखा मानली जाते. वास्तूचा आपल्या आयुष्याशी थेट संबंध असतो.जर एखाद्या व्यक्तीने आपल्या जीवनात वास्तुशी संबंधित काही गोष्टींची काळजी घेतली तर सर्व समस्या सहजपणे दूर होऊ शकतात. वास्तूनुसार घरातील स्वयंपाकघर खूप महत्त्वाचे मानले जाते. स्वयंपाकघरात अशा अनेक गोष्टी असतात, ज्यांचा उपयोग करुन आपण घरात सुख, शांती आणू शकतो. चला तर मग जाणून घेउयात 5 गोष्टींबद्दल.

पीठ
प्रत्येक घराच्या स्वयंपाकघरात पीठ असते आणि बहुतेक लोक ते घरी मोठ्या प्रमाणात साठवतात. पण ही पद्धत चुकीची आहे. वास्तूनुसार डब्यात पीठ पूर्णपणे संपत नाही, त्याआधी नवीन पीठ भरावे. पिठाचे भांडे कधीही इतके रिकामे नसावे. असे केल्याने कुटुंबात कलह निर्माण होतो.

तांदूळ
तांदळाचा संबंध शुक्र ग्रहाशी मानला जातो आणि शुक्र हा जीवनात सुख-सुविधा देणारा ग्रह मानला जातो. स्वयंपाकघरात तांदूळ असल्यास सुख-समृद्धी राहते, तसेच शुक्र दोष दूर होतो, असे म्हटले जाते. त्यामुळे कधीही पूर्ण संपू देऊ नका.

मोहरीचे तेल
मोहरीचे तेल अनेक घरांमध्ये स्वयंपाकाचे तेल म्हणून वापरले जाते. त्याचा संबंध शनिशी आहे. जर ते पूर्णपणे संपले तर शनिदोष उद्भवू शकतो आणि कुटुंबात संकटे निर्माण येऊ शकतात. त्यामुळे तुमच्या स्वयंपाकघरातील मोहरीचे तेल कधीही संपू देऊ नका.

हळद
हळदीचा संबंध गुरूशी आहे. गुरूची कृपा असेल तर मोठ्या संकटांपासून वाचतो. पण जर गुरु सदोष असेल तर कुटुंबात अनेक समस्या निर्माण होतात. आर्थिक चणचण, शिक्षणात अडथळे, लग्नात अडथळे इ. त्यामुळे तुमच्या स्वयंपाकघरातील हळद कधीही संपू देऊ नका.

मीठ
मिठाचा संबंध राहूशी असल्याचे मानले जाते. तुमच्या स्वयंपाकघरात मीठ ठेवल्यास राहूशी संबंधित सर्व समस्या दूर होतात. त्यामुळे ते कधीही संपू देऊ नका.

संबंधित बातम्या : 

Vastu Tips : वास्तूनुसार घरातील ‘या’ ठिकाणी बूट घालू नका, वाचा याबद्दल अधिक!

फटाफट पैसे कमवायचे आहेत? मग ‘या’ वास्तु टिप्स फॉलो करा, तुम्हाला यश नक्की मिळेल!

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें