सिडनी कसोटीचा निकाल वेगळा लागू शकला असता; हनुमा विहारीने व्यक्त केली खंत

अक्षय चोरगे

|

Updated on: Jan 13, 2021 | 8:54 AM

ऑस्ट्रेलियाविरुद्धचा सिडनी कसोटी सामना भारताच्या हातून निसटत चाललेला असाताना हनुमा विहारी आणि रवीचंद्रन अश्विनने निकराने लढा देत हा सामना ड्रॉ केला.

सिडनी कसोटीचा निकाल वेगळा लागू शकला असता; हनुमा विहारीने व्यक्त केली खंत
Follow us

सिडनी : ऑस्ट्रेलियाविरुद्धचा सिडनी कसोटी सामना भारताच्या हातून निसटत चाललेला असाताना हनुमा विहारी (Hanuma Vihari) आणि रवीचंद्रन अश्विनने (Ravichandran Ashwin) निकराने लढा देत हा सामना ड्रॉ केला. विहारी आणि अश्विनने अंगावर जोरदार बाऊन्सर्स झेलत, दुखापती असतानाही ऑस्ट्रेलियन गोलंदाजीचा सामना केला. दोघांनी तब्बल 256 चेंडूंचा सामना करत 62 धावांची निर्णायक आणि नाबाद भागिदारी केली. फलंदाजी करत असताना विहारीच्या मांडीचे स्नायू (हॅमस्ट्रिंग) दुखावले होते, तर कंबरेच्या दुखण्याने अश्विन हैरान झाला होता. विहारीला असं वाटतंय की त्याला हॅमस्ट्रिंगचा त्रास नसता झाला तर तो सिडनी कसोटी सामन्यात भारतीय संघाला विजय मिळवून देऊ शकला असता. (Ind vs Aus : Hanuma Vihari says they have won match if he was not injured)

बीसीसीआयला दिलेल्या एका मुलाखतीत हनुमा विहारी म्हणाला की, “अश्विन मोठ्या भावाप्रमाणे सामना संपेपर्यंत माझ्याशी बोलत राहिला. जेव्हा त्याला वाटायचं की मी खराब फटके खेळतोय, तेव्हा तो मला येऊन सांगायचा. त्याने मला सामन्यावर फोकस करण्याचा सल्ला दिला. अर्थातच हा सामना अनिर्णित झाला हा काही वाईट निकाल नाही. परंतु मी जखमी झालो नसतो आणि पुजारा अजून थोडा वेळ टिकला असता तर भारतीय संघ या सामन्यात जिंकू शकला असता. तसं झालं असतं तर हा एक शानदार आणि ऐतिहासिक विजय ठरला असता”. दरम्यान, ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या ब्रिस्बेन कसोटीपूर्वी (brisbane Test) टीम इंडियाला (Team India) मोठा झटका बसला आहे. दुखापतग्रस्त रवींद्र जाडेजा यापूर्वीच या कसोटी सामन्याला मुकणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. त्यातच आता हनुमा विहारीदेखील दुखापतीमुळे चौथा कसोटी सामना खेळू शकणार नाही.

सिडनी कसोटी सामन्यात फलंदाजी करत असताना हनुमा विहारीच्या मांडीचे स्नायू दुखावले होते, त्यामुळे या सामन्यात त्याने धावून रन्स काढल्या नाहीत. त्याला नीट चालताही येत नव्हते. तरीदेखील एखाद्या योद्ध्याप्रमाणे तो शेवटच्या चेंडूपर्यंत मैदानात उभा राहिला. एकवेळ अशी परिस्थिती होती की भारत सिडनी कसोटी सामन्यात पराभूत होईल, परंतु हनुमा विहारीने रवीचंद्रन अश्विनच्या साथीने किल्ला लढवला. दोघेही 42.4 षटकं मैदानात उभे राहिले. पायाच्या दुखापतीमुळे विहारी धावू शकत नव्हता. त्यामुळे दोघांनाही रन्स काढता आल्या नाहीत, त्यामुळे दोघांनी 62 धावांची भागिदारी करत सामना वाचवला. यात विहारीने 161 चेंडूत 23 धावा तर अश्विनने 128 चेंडूत 39 धावा जमवल्या.

हनुमा विहारी चौथ्या कसोटी सामन्याला मुकणार

बीसीसीआयमधील (BCCI) सूत्रांनी असे सांगितले आहे की, चौथ्या कसोटी सामना 15 जानेवारीपासून सुरु होणार आहे, या सामन्यापर्यंत हनुमा विहारी फिट होऊ शकणार नाही. हा त्यामुळे त्याला या सामन्यात संधी मिळणार नाही. विहारीची दुखापत ग्रेड वन श्रेणीतील असली तरी त्याला पुढील चार आठवडे खेळता येणार नाही. त्यानंतर त्याला रिहॅबिलिटेशनच्या प्रक्रियेतून जावं लागेल. केवळ ब्रिस्बेन टेस्टच नव्हे तर इंग्लंडविरोधात भारतात होणाऱ्या कसोटी मालिकेलाही तो मुकणार असल्याचे बोलले जात आहे.

हेही वाचा

ना शमी, ना उमेश यादव, आता बुमराहचीही कमी, भारताच्या वेगवान माऱ्याची धुरा कोण सांभाळणार?

ऋषभ पंतला बाद करण्यासाठी स्टिव्ह स्मिथचा ‘डर्टी गेम’, नेटीझन्सनी झापलं

डेव्हिड वार्नरची इन्स्टाग्राम पोस्ट, टीम इंडियासह मोहम्मद सिराजची मागितली माफी

(Ind vs Aus : Hanuma Vihari says they have won match if he was not injured)

Non Stop LIVE Update

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI