Sydney Test, Day 5 : भारताच्या विजयाच्या आशा मंदावल्या, पंत-पुजाराची जोडी माघारी

ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडियातील (Aus vs Ind 3rd Test) तिसरा कसोटी सामना सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर सध्या सुरु आहे.

Sydney Test, Day 5 : भारताच्या विजयाच्या आशा मंदावल्या, पंत-पुजाराची जोडी माघारी

सिडनी : ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडियातील (Aus vs Ind 3rd Test) तिसरा कसोटी सामना सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर सध्या सुरु आहे. या सामन्यातील चौथ्या दिवसावर ऑस्ट्रेलियन संघाने वर्चस्व गाजवलं होतं. काल (रविवारी) टीम इंडियाने चौथ्या दिवसअखेर 2 विकेट गमावून 98 धावा केल्या होत्या. तेव्हा चेतेश्वर पुजारा 9 तर अजिंक्य रहाणे 4 धावांवर नाबाद होते. परंतु आज भारताची सुरुवात खूप वाईट झाली. सकाळी सुरुवातीलाच रहाणे (4) बाद झाला. त्यामुळे भारतीय संघ बॅकफुटवर गेला होता. परंतु विस्फोटक फलंदाज ऋषभ पंत आणि भरवशाचा फलंदाज चेतेश्वर पुजारा या दोघांनी भारताचा डाव सावरला. (IND vs AUS: Rishabh Pant and Pujara fight to save Sydney Test against Australia)

पुजाराने नेहमीप्रमाणे बचावात्मक धोरण स्वीकारलं होतं. तर ऋषभ पंत जलदगतीने धावा फटकावत होता. पंतने आतापर्यंत 118 चेंडूत 97 धावा फटकावल्या. या खेळीत त्याने 12 चौकार आणि 3 षटकार ठोकले आहेत. तर पुजाराने 205 चेंडूत 12 चौकारांच्या सहाय्याने 77 धावा जमवल्या. दोघांनी आतापर्यंत 148 धावांची भागिदारी रचली. कप्तान रहाणे बाद झाल्यानंतर भारत हा सामना गमावणार अशी स्थिती निर्माण झालेली असताना पंत आणि पुजाराने भारताचा डाव सावरला. परंतु ही जोडी भारताला विजय मिळवून देऊ शकली नाही. धावफलकावर 250 धावा लागलेल्या असताना ऋषभ पंत बाद झाला. पंत बाद झाल्यानंतर पुजाराने काही आक्रमक फटके खेळून टीम इंडियाच्या विजयाच्या आशा जिवंत ठेवल्या. परंतु धावफलकावर 272 धावा लागलेल्या असताना पुजारादेखील बाद झाला. त्यामुळे भारताच्या विजयाच्या आशा आता मंदावल्या आहेत.

दुखापतीनंतरही पंतचा संघर्ष

सामन्याच्या तिसऱ्या दिवशी फलंदाजी करताना ऋषभ पंतला दुखापत झाली होती. कोपरावर चेंडू लागल्याने तो चौथ्या दिवशी विकेटकीपिंगसाठी मैदानात आला नव्हता. आजही तो खेळेल की नाही, यावर शंका होती. अशा परिस्थितीत पंत मैदानात उतरला. पंतचं आज प्रमोशन करण्यात आलं. नेहमी सहाव्या नंबरवर खेळणारा पंत पाचव्या नंबरवर खेळण्यास आला. मैदानात उतरल्यापासून त्याने आक्रमक फटके खेळण्यास सुरुवात केली आहे. कोपराला झालेल्या दुखापतीने तो अनेकदा विव्हळताना दिसला तरीदेखील त्याची फटकेबाजी सुरु आहे. पंत-पुजारामधील या भागिदारीने भारताच्या विजयाच्या आशा निर्माण केल्या आहेत.

भारताची चांगली सुरुवात

दरम्यान, रविवारी टीम इंडियाच्या दुसऱ्या डावाची चांगली सुरुवात झाली होती. शुबमन गिल आणि रोहित शर्मा या सलामी जोडीने टीम इंडियाला आश्वासक सुरुवात दिली. या दोघांनी 71 धावांची भागीदारी केली. शुबमन गिलच्या रुपात टीम इंडियाला पहिला धक्का बसला. गिल 31 धावांवर बाद झाला. यानंतर चेतेश्वर पुजारा मैदानात आला. रोहितने पुजारासह स्कोअरबोर्ड हलता ठेवला. यादरम्यान रोहितने अर्धशतक पूर्ण केलं. मात्र अर्धशतकानंतर रोहित आऊट झाला. रोहितने 98 चेंडूत 5 फोर आणि 1 सिक्ससह 52 धावांची खेळी केली. रोहितनंतर कर्णधार अजिंक्य रहाणे मैदानात आला. या दोघांनी दिवसखेर सावध खेळी केली. चौथ्या दिवसअखेर टीम इंडियाने 2 विकेट्स गमावून 98 धावा केल्या होत्या. यामुळे टीम इंडियाला विजयासाठी पाचव्या दिवशी आणखी 309 धावांची आवश्यकता आहे. भारताने आतापर्यंत 206 धावा केल्याने विजयासाठी संघाला 201 धावांची आवश्यकता आहे.

ऑस्ट्रेलियाचा डाव 312 धावांवर घोषित

तत्पूर्वी ऑस्ट्रेलियाला दुसऱ्या डावात 94 धावांची आघाडी मिळाली होती. ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या डाव 312-6 धावांवर घोषित केला. त्यामुळे भारताला विजयासाठी 407 धावांचे आव्हान मिळाले आहे. ऑस्ट्रेलियाकडून दुसऱ्या डावात कॅमरॉन ग्रीनने सर्वाधिक 84 धावा केल्या. तर स्टीव्हन स्मिथने 81 धावा केल्या. तसेच मार्नस लाबुशेनने 73 धावांची खेळी केली होती.

हेही वाचा

प्लॅटिना बाईक ते आंतराष्ट्रीय क्रिकेट सामना, ऑस्ट्रेलियात वर्णभेदाची टीका, वाचा मोहम्मद सिराजची संघर्षगाथा

टीम इंडियासाठी मोठा धक्का, जाडेजा इंग्लंडविरोधातील पहिल्या 2 कसोटींना मुकणार

“माझ्यावरही वर्णभेदी टीका करण्यात आली होती”, अश्विनचा धक्कादायक खुलासा

(IND vs AUS: Rishabh Pant and Pujara fight to save Sydney Test against Australia)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI