Independence Day: स्वातंत्र्य दिनी जवानांच्या पराक्रमाचा सन्मान, 1 कीर्ती, 9 शौर्य चक्रांसह 84 शौर्य पुरस्कारांचं वितरण

देशाच्या 74 व्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी जवानांना शौर्य पुरस्काराने सन्मानित केलं (Gallantry awards distribution on Independence day).

Independence Day: स्वातंत्र्य दिनी जवानांच्या पराक्रमाचा सन्मान, 1 कीर्ती, 9 शौर्य चक्रांसह 84 शौर्य पुरस्कारांचं वितरण
Follow us
| Updated on: Aug 15, 2020 | 11:07 AM

नवी दिल्ली : देशाच्या 74 व्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी देशाच्या सुरक्षेसाठी आपली जीवाची बाजी लावणाऱ्या शूर जवानांना त्यांच्या शौर्यासाठी शौर्य पुरस्काराने सन्मानित केलं (Gallantry awards distribution on Independence day). यावेळी जम्मू आणि काश्मीर पोलीस कान्स्टेबल, 1 स्पेशल फोर्सचे अधिकारी आणि एका भारतीय वायु दलाच्या वैमानिकासह 84 जवानांना शौर्य पुरस्कार देण्यात आला.

जम्मू काश्मीर पोलीस विभागात हेड कॉन्स्टेबल असणाऱ्या अब्दुल रशीद कालस यांना त्यांच्या शौर्यासाठी मरणोत्तर किर्ती चक्र देण्यात आले. किर्ती चक्र शांततेच्या काळात दिला जाणारा सर्वात मोठा दुसरा पुरस्कार आहे. इतर 9 जवांनांना देखील त्यांच्या बहादुरपणासाठी शौर्य चक्र देऊन सन्मानित करण्यात आलं होतं. शौर्य चक्र शांततेच्या काळात दिला जाणारा तिसरा मोठा सन्मान आहे.

यावेळी लेफ्टनंट कर्नल कृष्ण सिंह रावत, मेजर अनिल उर्स, हवलदार आलोक कुमार दुबे, विंग कमांडर विशाल नायर, जम्मू काश्मीर पोलीस उप महासंचालक (डेप्युटी इंस्पेक्टर जनरल) अमित कुमार, CISF सब इंस्पेक्टर महावीर प्रसाद (मरणोत्तर), CISF हेड कॉन्स्टेबल ई नायक (मरणोत्तर), CISF कॉन्स्टेबल महेंद्र कुमार पासवान (मरणोत्तर) आणि CISF कॉन्स्टेबल सतीश प्रसाद कुशवाह (मरणोत्तर) यांना शौर्य चक्र देऊन सन्मानित करण्यात आलं.

5 सैन्य मेडल बार आणि 60 सैन्य मेडल

याशिवाय 5 सैन्य मेडल बार (दूसरी बार सैन्य मेडल), 60 सैन्य मेडल, 4 नवे सैन्य मेडल आणि 5 वायु सैन्य मेडलने सुरक्षा दलांना सन्मानित करण्यात आलं. 1 पॅराच्या (स्पेशल फोर्स) लेफ्टनंट कर्नल रावत यांना जम्मू काश्मिरमध्ये LoC जवळ राबवण्यातआलेल्या एका मोहिमेसाठी शौर्य चक्र देण्यात आलं. लेफ्टनंट कर्नल रावत आणि त्यांच्या टीमने दहशतवादी घुसखोरी करण्याच्या आधी तब्बल 36 तास दबा धरुन वाट पाहिली आणि 4 दहशतवाद्यांचा खात्मा केला. त्यांच्या नेतृत्वासाठी आणि शौर्यासाठी त्यांना हा पुरस्कार देण्यात आला.

मेजर अनिल उर्स यांनी देखील एक अशाचं मोहिमेचं नेतृत्व केलं होतं. यात 5 दहशतवादींना कंठस्नान घालण्यात यश आलं होतं. त्यांना देण्यात आलेल्या प्रशस्तीपत्रानुसार त्यांच्या टीमने देशाच्या सुरक्षेसाठी “साहस आणि दुर्मिळ युद्ध नेतृत्व” दाखवलं. जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादविरोधी ऑपरेशनमध्ये हवालदार दुबे यांनी A++ कॅटेगरीच्या दहशतवाद्याला अगदी त्याच्या जवळ जाऊन मारलं. त्यांना दिलेल्या सन्मानपत्रात म्हटलं आहे, की त्यांच्या साहसामुळे दहशतवादी पळून जाण्यात अपयशी ठरले. तसेच शेवटी 4 दहशतवाद्यांना मारण्यात यश आलं.

राष्ट्रपती कोविंद यांनी विविध सैन्याच्या मोहिमांमध्ये आपलं योगदान देणार्या 19 जवांनांना ‘मेंशन-इन-डिस्पॅच’ देण्यालाही मंजूरी दिली. यात 8 जणांना ऑपरेशन मेघदूत आणि ऑपरेशन रक्षकसाठी मरणोत्तर सन्मान देण्यात आला.

संबंधित बातम्या :

PM Modi Independence Day Speech | कोरोना लस ते LAC वर सडेतोड उत्तर, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणातील 10 महत्त्वाचे मुद्दे

Vande Mataram : स्वातंत्र्य दिनानिमित्त भारताच्या 100 बड्या संगीतकारांनी एकत्र येऊन गायले वंदे मातरम्

PM Modi Independence Day | कोरोनाच्या तीन लसी विविध टप्प्यात, लाल किल्ल्यावरुन पंतप्रधानांकडून खुशखबर, नरेंद्र मोदींचा पुन्हा ‘आत्मनिर्भर भारता’चा मंत्र

PHOTO : लाल किल्ल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते ध्वजारोहण

संबंधित व्हिडीओ :

Gallantry awards distribution on Independence day

Non Stop LIVE Update
बच्चू कडूचा राजकारणात कोणी बाप नाही, बच्चू कडू यांचा जोरदार प्रहार
बच्चू कडूचा राजकारणात कोणी बाप नाही, बच्चू कडू यांचा जोरदार प्रहार.
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास.
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?.
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?.
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप.
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले.
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?.
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?.
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.