AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

India China Face Off | आमचे 5 जवान भारताने मारले, चीनचा दावा, गलवान खोऱ्यात भारत-चीनमध्ये संघर्ष

चीनी वृत्तपत्र ग्लोबल टाईम्सचे संपादक यांनी ट्विट करत सांगितलं की, या संघर्षात चीनचे सैनिकही शहीद झाले आहेत.

India China Face Off | आमचे 5 जवान भारताने मारले, चीनचा दावा, गलवान खोऱ्यात भारत-चीनमध्ये संघर्ष
| Edited By: | Updated on: Jun 16, 2020 | 4:43 PM
Share

India China Face Off  : नवी दिल्ली : भारतानेही आमचे 5 सैनिक मारले असा दावा चिनी वृत्तपत्र ग्लोबल टाईम्सने केला आहे.  भारत आणि चीन सैनिकांमध्ये काल संघर्ष झाला. गलवान खोऱ्यात  भारत आणि चीन सैन्यांमध्ये झालेल्या (India China Face Off) संघर्षात भारताचे तीन जवान शहीद झाले आहेत. यामध्ये एक अधिकारी आणि दोन जवानांचा समावेश आहे.

दुसरीकडे चिनी वृत्तपत्र ग्लोबल टाईम्सने दावा केला आहे की, या संघर्षात चीनचे सैनिकही मारले गेले आहेत. चीनचे पाच सैनिक शहीद तर 11 जवान जखमी झाल्याचा दावा ग्लोबल टाईम्सने  केला आहे. मात्र, याबाबत अद्याप कुठली अधिकृत (India China Face Off) माहिती दोन्ही देशांनी दिलेली नाही.

भारतीय सेनेने दिलेल्या माहितीनुसार, या पूर्ण घटनेत चीनच्या सेनेलाही नुकसान झालं आहे.  “गलवान खोऱ्यात सैन्य माघारीदरम्यान अचानक संघर्ष उफाळला. काल रात्रीच्या वेळी गलवान खोऱ्यात दोन्ही सैन्यांमध्ये मोठा संघर्ष झाला. यामध्ये चिनी सैनिकांसोबतच्या संघर्षात भारताचे एकूण तीन जवान शहीद झाले आहेत. यामध्ये एका अधिकाऱ्याचाही समावेश आहे”.

ग्लोबल टाईम्सच्या संपादकांनी ट्विट केलं की, “या संघर्षात चीनचंही नुकसान झालं आहे. भारताने चीनला कमी लेखू नये”.

लडाखमधील सीमावादाच्या पार्श्वभूमीवर नुकतंच भारत आणि चीनमधील सैन्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक झाली होती. मात्र, आता पुन्हा दोन्ही देशांच्या सैन्यामध्ये गोळीबार झाल्याने सीमेवरील चिंता वाढली आहे. जम्मू काश्मीरमध्ये लडाखमधील गलवान खोऱ्यात भारत आणि चीनच्या सैन्यांमध्ये चकमक झाली (India China Face Off).

45 वर्षांनी शांतता कराराचा चीनकडून भंग

1993 च्या सीमेवरील शांतता कराराचा चीनकडून भंग करण्यात आला आहे. भारत-चीन सीमेवर 1975 नंतर प्रथमच असा गोळीबार होऊन सैनिक शहीद झाल्याची घटना घडली आहे. 1975 मध्ये भारताचे 4 जवान शहीद झाले होते. 1975 ला अरुणाचल प्रदेशात संघर्ष उफाळला होता.

India China Face Off

संबंधित बातम्या :

India China Violent Face off Live | भारत-चीनच्या सैन्यांमध्ये संघर्ष, दिल्लीत वेगवान घडामोडी

भारत-चीनदरम्यान झडप, भारताचे तीन जवान शहीद, 1975 नंतर पहिल्यांदाच भारत-चीन सीमेवर गोळीबार

भारतीय सैन्य उत्तर देईल, पण चिनी वस्तूवर बहिष्कार टाकून सैन्याला पाठिंबा द्या : ब्रि. हेमंत महाजन

मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा.
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी.
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण.
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर.