AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Corona Update | देशात कोरोनाचे 44,059 नवे रुग्ण, दिल्लीत सर्वाधिक कोरोना बळी

देशात गेल्या 24 तासात तब्बल 44 हजार 59 नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत.

Corona Update | देशात कोरोनाचे 44,059 नवे रुग्ण, दिल्लीत सर्वाधिक कोरोना बळी
| Updated on: Nov 23, 2020 | 12:32 PM
Share

नवी दिल्ली : देशात गेल्या 24 तासात तब्बल 44 हजार 59 नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत (New Corona Cases Found). मात्र, दिलासादायक म्हणजे रविवारी नोंद करण्यात आलेल्या कोरोना रुग्णांच्या आकडेवारीच्या तुलनेत 2.5 टक्क्यांनी ते कमी आहे. त्यामुळे देशातील कोरोना विषाणूचे रुग्ण 9.13 मिलियनवर पोहोचले आहेत. यामध्ये गेल्या 24 तासात 511 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. तर अ‍ॅक्टिव्ह केसेस हे 4 लाख 50 हजारांच्या खाली पोहोचले आहेत. सोमवारी देशातील अ‍ॅक्टिव्ह कोरोना रुग्णांची संख्या 4 लाख 43 हजार 489 वर पोहोचले आहे. रविवारी 45 हजार 209 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 501 जणांनी कोरोनामुळे आपला जीव गमावला आहे (New Corona Cases Found).

10 राज्यांमध्ये सर्वाधिक कोरोना बळी

देशात 10 राज्यांमध्ये आणि केंद्र शासित प्रदेशात सर्वाधिक मृत्यू नोंदवण्यात आले आहेत. रविवारी नोंदवण्यात आलेले 509 मृत्यूंपैकी 77 टक्के मृत्यू हे या राज्यांमधील आहेत.

दिल्लीमध्ये सर्वाधिक नवीन मृत्यू

10 सर्वाधिक कोरोना बळी असलेल्या राज्यांमध्ये दिल्ली पहिल्या क्रमांकावर आहे. रविवारी दिल्लीत कोरोनामुळे 121 मृत्यू झाले आहेत. आतापर्यंत राजधानीत 8391 जणांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे. देशता झालेल्या एकूण मृत्यूंपैकी 22 टक्के मृत्यू दे दिल्लीतील आहेत. तर त्या खालोखाल महाराष्ट्र, उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगालचा क्रमांक लागतो (New Corona Cases Found).

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व मुख्यमंत्र्यांची बैठक बोलावली

कोरोना विषाणू लसीच्या वितरणासंदर्भातील धोरण आणि देशातील कोरोना रुग्ण वाढ याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मुख्यमंत्र्यांची मंगळवारी (24 नोव्हेंबर) महत्त्वाची बैठक बोलावली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून होणाऱ्या बैठकीत मुख्यमंत्री तसेच राज्याचे इतर प्रतिनिधी आणि केंद्रशासित प्रदेशांसोबत चर्चा करण्याची शक्यता आहे. पीटीआ4यने दिलेल्या वृत्तानुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सलग दोन बैठका होतील.

सकाळी दहाच्या आसपास ही बैठक सुरु होईल. सुरुवातीला सर्वात जास्त कोरोनाचे रुग्ण असलेल्या भागाच्या मुख्यमंत्र्यांशी पंतप्रधान संवाद साधतील. या बैठकीत कोरोना लसीच्या वितरणाशी संबंधित चर्चा होण्याची शक्यता आहे. कोरोना लसीसाठी राज्याची व्यवस्था काय आहे? यांची माहिती मोदी घेवू शकतात.

दोन कंपन्यांच्या लसीची चाचणी तिसऱ्या टप्यात आहे. सिरम, भारत बायोटेकच्या लसी तिसऱ्या टप्यात तर दोन टप्यात 90 ते 95 टक्के लस प्रभावशाली ठरल्या आहेत.

New Corona Cases Found

संबंधित बातम्या :

PM Narendra Modi | कोरोनाने चिंता वाढवली, पंतप्रधान मोदींची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा

दिल्लीत पुन्हा एकदा कोरोनाचा प्रकोप, सचखंड एक्सप्रेसच्या प्रवाशांची औरंगाबादेत कोरोना चाचणी!

Corona | एकदा बरं झाल्यानंतरही पुन्हा संसर्गाची शक्यता, लस आल्यानंतरही संकट कायम राहील?

भारतातील कोरोनाग्रस्तांची संख्या 90 लाखांच्या पार; देशभरात 1 लाख 32 हजारांहून अधिक मृत्यू : आरोग्य मंत्रालय

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.