कोविशिल्ड लसीचे 4-5 कोटी डोस सर्वात आधी भारताला मिळणार : सीरम इन्स्टिट्यूट

कोरोनावरील लस 'कोविशिल्ड'चे 4-5 कोटी डोस सर्वप्रथम भारताला दिले जाणार आहेत, अशी माहिती सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाकडून देण्यात आली आहे.

कोविशिल्ड लसीचे 4-5 कोटी डोस सर्वात आधी भारताला मिळणार : सीरम इन्स्टिट्यूट

पुणे : कोरोनावरील लस ‘कोविशिल्ड’चे 4-5 कोटी डोस सर्वप्रथम भारताला दिले जाणार आहेत, अशी माहिती सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाकडून (Serum Institute of India, SII) नुकतीच देण्यात आली आहे. सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे सीईओ आदर आदर पुनावाला (Adar Poonawalla) म्हणाले की, कोरोना व्हॅक्सिन ‘कोविशिल्ड’चे (Covishield Vaccine) 4-5 कोटी डोस सर्वात आधी भारताला दिले जातील. (India will get first 40 and 50 million doses of Coronavirus Caccine covishield says adar poonawalla, CEO of serum institute of india)

आदर पुनावाला म्हणाले की, 2021 च्या पहिल्या सहा महिन्यांमध्ये लसींची कमतरता दिसून येईल. परंतु ऑगस्ट-सप्टेंबर 2021 पर्यंत लस निर्मिती करणाऱ्या कंपन्या लसींचा पुरवठा करण्यात सक्षम होतील. दरम्यान, किती प्रमाणात लसी हव्या आहेत आणि त्या किती वेळात हव्या आहेत, हे सरकार ठरवणार आहे. जुलै 2021 पर्यंत लसींचे 30 कोटी डोस तयार करण्याचे आपले लक्ष्य आहे.

सिरम इन्स्टिट्यूटही कोरोनावरील लस विकसित करत आहे. सिरमने लस तयार करण्यासाठी अॅस्ट्राझेनेका आणि ऑक्सफोर्ड युनिवर्सिटीसह भागिदारी केली आहे. गेल्या आठवड्यात पुनावाला म्हणाले होते की, जानेवारीपासून भारतात कोरोनावरील लसीकरणास सुरुवात होऊ शकते. पुनावाला यांनी सोमवारी न्यूज एजन्सी ANI शी बातचित केली. ते म्हणाले की, काहीच दिवसात कोरोनावरील लसीच्या वापरासाठी मंजुरी मिळेल आणि कंपनीने ही मंजुरी मिळण्यापूर्वीच लसीचे 4-5 कोटी डोस तयार करुन ठेवले आहेत.

डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीला आधी फायझर आणि नंतर सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने (Serum Institute of India, SII) कोरोना लसीच्या आपत्कालीन परिस्थितीत वापर करण्याबाबत परवानगी मागितली आहे. यामुळे सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया ही लसीच्या वापराची अधिकृतता मिळवणारी पहिली भारतीय कंपनी असणार आहे. सीरमने ड्रग्स कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाकडून (Drugs Controller General of India, DCGI) त्यांच्या कोरोना लसीच्या म्हणजेच ‘कोविशिल्ड’ च्या आपत्कालीन वापरासाठी परवानगी मागितली आहे.

सीरम ऑक्सफोर्ड-अ‍ॅस्ट्रॅजेनेकाद्वारे विकसित केलेल्या ‘कोविशिल्ड’ या लसीचं भारतात ट्रायल आणि उत्पादन करत आहे. यामुळे आपत्कालीन वापरासाठी लसीला परवानगी देण्यात यावी अशी मागणी करत त्यांनी जनतेच्या हिताचा हवाला दिला आहे. याने कोरोनाचा धोका टाळण्यास आणखी मदत होईल असं सीरमने म्हटलं आहे. त्यामुळे यावर आता काय निर्णय होणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

आपत्कालीन मंजुरी म्हणजे काय?

आणीबाणी वापर प्राधिकरण म्हणजेच आपत्कालीन मंजुरी ही औषधं, निदान चाचण्या किंवा वैद्यकीय उपकरणांसाठीसुद्धा घेतली जाते. सेंट्रल ड्रग्स स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशन ही आपत्कालीन मंजुरीसाठी नियामक आहे. लसी आणि औषधाचा वापर अनेक चाचण्या आणि निकालानंतर मंजूर केला जातो. पण कोरोनासारखा जीवघेणा संसर्ग किंवा इतर साथीचा रोग असल्याच यासाठी लसीच्या वापरावर जोख स्वीकारत आपत्कालीन मंजुरी दिली जाते.

लस बनवण्याच्या बाबतीत सिरम सर्वात पुढे

कोरोनावरील लस बनवण्याच्या बाबतीत भारताची औषध निर्मिती करणारी कंपनी सिरम इन्स्टिट्यूट सर्वात पुढे आहे. ऑक्सफोर्डसोबत हातमिळवणी करत कोरोनावरील लस बनवण्याच्या कामात व्यस्त असलेल्या या कंपनीची स्थापना 1966 मध्ये झाली होती. सायरस पुनावाला हे या संस्थेचे संस्थापक आहेत. कोरोनावरील लस बनवण्याच्या स्पर्धेत दुसऱ्या नंबरवर भारत बायोटेक ही कंपनी आहे. या कंपनीची स्थापना 1996 मध्ये झाली होती. डॉ. कृष्ण एल्ला यांनी ही कंपनी सुरु केली होती. या कंपनीचे अध्यक्ष म्हणून सध्या डॉ. व्ही. कृष्ण मोहन कारभार सांभाळत आहेत.

संबंधित बातम्या:

तुमच्यापर्यंत लस कशी पोहोचणार, वॅक्सिनचा साठा ते लसीकरण 4 राज्यात रंगीत तालीम

ब्रिटनमध्ये कोरोनाचा आणखी एक घातक अवतार, वेगवान संसर्गामुळे खळबळ

कोरोनाच्या नव्या घातक प्रजातीवर जागतिक आरोग्य संघटनेचा इशारा, युरोपीय देशांना विशेष सूचना

(India will get first 40 and 50 million doses of Coronavirus Caccine covishield says adar poonawalla, CEO of serum institute of india)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI