Indian Railway: रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर, 12 सप्टेंबरपासून 80 स्पेशल ट्रेन सुरु होणार

भारतीय रेल्वेने 12 सप्टेंबरपासून 80 नव्या स्पेशल ट्रेन सुरु करण्याची घोषणा केली आहे. या रेल्वे गाड्यांच्या तिकिट बुकिंगची सुरुवात 10 सप्टेंबरपासून होणार आहे (Indian Railway annouce special trains).

Indian Railway: रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर, 12 सप्टेंबरपासून 80 स्पेशल ट्रेन सुरु होणार

नवी दिल्ली : भारतीय रेल्वेने 12 सप्टेंबरपासून 80 नव्या स्पेशल ट्रेन सुरु करण्याची घोषणा केली आहे. या रेल्वे गाड्यांच्या तिकिट बुकिंगची सुरुवात 10 सप्टेंबरपासून होणार आहे (Indian Railway annouce special trains). रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष विनोद कुमार यांनी आज (5 सप्टेंबर) ही माहिती दिली.

विनोद कुमार म्हणाले, “भारतीय रेल्वे विभागाने 12 सप्टेंबरपासून 80 ट्रेन सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी 10 सप्टेंबरपासून तिकिट बूक करता येणार आहे. या 80 स्पेशल ट्रेन आधी सुरु असलेल्या 230 ट्रेनच्या व्यतिरिक्त चालवलं जाणार आहे. राज्यांच्या मागणी आणि आवश्यकतेनुसार रेल्वे गाड्या सुरु केल्या जातील.”

“नव्याने सुरु करण्यात येणाऱ्या स्पेशल ट्रेनबाबत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व खबरदारी घेतली जाणार आहे. जेथे जेथे ट्रेन सुरु करण्याची मागणी होत आहे किंवा मोठी प्रतिक्षा यादी आहे तेथे आधी क्लोन ट्रेन सुरु केली जाईल. त्यानंतर मिळणाऱ्या प्रतिसादावर नियमितपणे आणखी ट्रेन सुरु केल्या जातील,” असंही भारतीय रेल्वे मंडळाचे अध्यक्ष विनोद कुमार यांनी सांगितलं.

परीक्षांसाठी राज्य सरकारांनी विनंती केल्यास आणखी स्पेशल ट्रेन सुरु केल्या जातील, असंही विनोद कुमार यांनी नमूद केलं. दरम्यान, कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सध्या देशभरात केवळ 230 स्पेशल ट्रेन सुरु आहेत. टप्प्याने ही संख्या वाढवण्यात येत आहे.

हेही वाचा :

‘पुण्यात यंत्रणेवर कुणाचंही नियंत्रण नाही’, प्रकाश जावडेकर आणि शरद पवारांसमोर आमदार-खासदारांचा तक्रारींचा पाढा

पांडुरंग रायकरांच्या मृत्यूचा अहवाल सोमवारी येईल, दोषींवर कडक कारवाई करणार : अजित पवार

महिला आयोगाच्या आडून भाजप माझ्या अटकेचा खेळ रचतंय : आमदार प्रताप सरनाईक

Indian Railway annouce special trains

Published On - 6:02 pm, Sat, 5 September 20

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI