AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राज्यातील रेल्वेसेवा अंशत: सुरु, मुंबई-पुण्यातून प्रत्येकी 5 ट्रेन सुटणार, प्रवासासाठी नियम काय?

मुंबईतील सीएसएमटी रेल्वे स्टेशनवरुन वाराणसीला जाणारी पहिली ट्रेन रात्री 12.10 च्या दरम्यान रवाना (Indian Railway Resume service) झाली.

राज्यातील रेल्वेसेवा अंशत: सुरु, मुंबई-पुण्यातून प्रत्येकी 5 ट्रेन सुटणार, प्रवासासाठी नियम काय?
| Updated on: Jun 01, 2020 | 12:50 PM
Share

नवी दिल्ली : लॉकडाऊनदरम्यान अडकलेल्या प्रवाशांना त्यांच्या राज्यात (Mumbai Pune Special railway) पोहोचता यावं, यासाठी रेल्वे मंत्रालयाने 100 विशेष रेल्वे सुरु करण्याची घोषणा केली होती. त्यानुसार आजपासून देशातील प्रमुख शहरातून या स्पेशल ट्रेन सुरु होणार आहेत. राज्यातून मुंबई आणि पुण्यातून प्रत्येकी पाच गाड्या दररोज धावणार आहेत. मात्र यात महाराष्ट्राअंतर्गत प्रवासाची मुभा नाही. तसेच आरक्षण असल्याशिवाय कोणालाही प्रवास करता येणार नाही. (Indian Railway Resume service)

मुंबईतील सीएसएमटी रेल्वे स्टेशनवरुन वाराणसीला जाणारी पहिली ट्रेन रात्री 12.10 च्या दरम्यान रवाना (Indian Railway Resume service) झाली. मुंबईतून सुटणाऱ्या पाचही गाड्या या पुणे मार्गे धावणार आहेत. पुणे रेल्वे स्थानकावरुन दानापूर एक्स्प्रेस ही गाडी रोज सुटणार आहे.

तर पुण्यातून पाच गाड्या सोडण्यात येणार आहे. यातील एक रेल्वे पुणे-पाटना या रेल्वेमार्गावर रोज धावणार आहे. तसेच मुंबई – भुवनेश्वर कोणार्क एक्स्प्रेस, निजामुद्दीन- गोवा, मुंबई – हैदराबाद हुसेनसागर एक्सप्रेस इत्यादी गाड्या पुण्यातून पुढे जाणार आहेत. मात्र यातून कोणालाही मुंबई-पुणे रेल्वे प्रवास करता येणार नाही.

या गाड्यात फक्त पाकिटबंद वस्तू, खाण्यासाठी तयार असलेले भोजन, पाण्याच्या सीलबंद बॉटल्स, चहा, कॉफी यांची व्यवस्था व्हेंडरकडून किंवा पॅंट्रीमार्फत होणार आहे. तसेच सामान आणि पार्सलही बुक करण्याची व्यवस्था या गाड्यांमध्ये करण्यात आली आहे, अशी माहिती मध्य रेल्वेच्या पुणे विभागाचे जनसंपर्क अधिकारी मनोज झंवर यांनी दिली.

असे करता येणार आरक्षण

या सर्व विशेष गाड्यांचे बुकिंग आयआरसीटीसी वेबसाइट www.irctc.co.in व मोबाईल अ‍ॅपद्वारे करता येणार आहे. प्रवाशांना जास्तीत जास्त 30 दिवसांच्या आगाऊ आरक्षण कालावधीनुसार ऑनलाईन आरक्षण करता येणार आहे.

कोणत्याही रेल्वे स्थानकावरील आरक्षण काऊंटरवर तिकिटे आरक्षित केली जाणार नाहीत. ‘एजंट’, (आयआरसीटीसी एजंट आणि रेल्वे एजंट दोघे) यांच्यामार्फत तिकीटं बुक करण्यास परवानगी नाही.

या वातानुकूलित आणि बिगर वातानुकूलित दोन्ही वर्ग असलेल्या विशेष गाड्या पूर्णपणे राखीव गाड्या असतील. सामान्य द्वितीय श्रेणी (जीएस) डब्ब्यातही बसण्यासाठी राखीव जागा असेल. भाडे सामान्य असेल आणि सामान्य द्वितीय श्रेणी (जीएस) डब्ब्यांसाठी राखीव असल्यास, द्वितीय आसन (2 एस) श्रेणीचे भाडे आकारले जाईल आणि सर्व प्रवाशांना जागा देण्यात येईल.

अस्तित्त्वात असलेल्या नियमांनुसार आरएसी आणि प्रतीक्षा यादी तयार केली जाईल. परंतु प्रतीक्षा यादीतील तिकीट धारकांना ट्रेनमध्ये चढण्याची परवानगी दिली जाणार (Indian Railway Resume service) नाही.

प्रवाशांना सामान्य सूचना

1. सर्व प्रवाशांची अनिवार्यपणे तपासणी करण्यात येईल. केवळ लक्षणं नसलेल्या प्रवाशांना ट्रेनमध्ये प्रवेश करण्यास / बसण्यास परवानगी आहे.

2. केवळ पुष्टीकृत (confirmed) तिकीट असलेल्या प्रवाशांनाच रेल्वे स्थानकात प्रवेश देण्यात येईल.

3. सर्व प्रवाशांनी प्रवेशावेळी आणि प्रवासादरम्यान चेहरा झाकावा. तसेच मास्क घालावा.

4. स्टेशनवर थर्मल स्क्रिनिंग सुलभ करण्यासाठी प्रवाशांनी कमीतकमी 90 मिनीटे आधी स्टेशनवर पोहचणे गरजेचे.

5. प्रवाशांनी स्टेशनवर आणि ट्रेनमध्ये सामाजिक अंतर ठेवले पाहिजे.

6. त्यांच्या गंतव्यस्थानावर आगमन झाल्यानंतर, प्रवाश्यांना गंतव्य राज्य/केंद्रशासित प्रदेशांनी सूचित केलेल्या आरोग्य प्रोटोकॉलचे पालन करावे लागेल.

संबंधित बातम्या :

मी आधी बोललो तर पियुष गोयल यांना राग आला, मात्र त्यांचे धन्यवाद : उद्धव ठाकरे

रेल्वे स्टेशन ते घर, मुंबईत केवळ पाच स्थानकांवर टॅक्सी सेवेला मंजुरी

पुण्यातील 150 उद्याने पुन्हा खुली होणार, ज्येष्ठ नागरिक-महिलांना प्रवेशबंदी

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.