भारतीय जवान हनीट्रॅपमध्ये, संवेदनशील माहिती पाकिस्तानला पुरवली

नवी दिल्ली : भारतीय जवान पाकिस्तानच्या हनीट्रॅपमध्ये अडकल्याचं समोर आलंय. राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची असलेली माहिती या जवानाने अश्लील फोटो आणि पाच हजार रुपयांसाठी एका पाकिस्तानी एजंटला पुरवली. सोशल मीडियाच्या माध्यमातून हा सर्व प्रकार घडलाय. सोमवीर नावाच्या जवानाला कथित पाकिस्तानी एजंटने हनीट्रॅपमध्ये अडकवलं. तिने स्वतःला आपण जम्मू काश्मीरमधील विद्यार्थी असल्याचं सांगितलं होतं. या प्रकरणी […]

भारतीय जवान हनीट्रॅपमध्ये, संवेदनशील माहिती पाकिस्तानला पुरवली
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:41 PM

नवी दिल्ली : भारतीय जवान पाकिस्तानच्या हनीट्रॅपमध्ये अडकल्याचं समोर आलंय. राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची असलेली माहिती या जवानाने अश्लील फोटो आणि पाच हजार रुपयांसाठी एका पाकिस्तानी एजंटला पुरवली. सोशल मीडियाच्या माध्यमातून हा सर्व प्रकार घडलाय. सोमवीर नावाच्या जवानाला कथित पाकिस्तानी एजंटने हनीट्रॅपमध्ये अडकवलं. तिने स्वतःला आपण जम्मू काश्मीरमधील विद्यार्थी असल्याचं सांगितलं होतं. या प्रकरणी आणखी 50 जवान तपास यंत्रणांच्या निगराणीखाली आहेत.

भारतीय जवानाला जाळ्यात अडकवण्यासाठी पाकिस्तानी एजंटने आकर्षित करण्यासाठी अश्लील फोटो पाठवले. यानंतर या जवानाने भारतीय सैन्यासंबंधित टँक, शस्त्र, लष्कर कंपनी याबाबत अत्यंत महत्त्वाची माहिती पुरवल्याचं बोललं जातंय. पाकिस्तानी एजंटकडून पाच हजार रुपये दिल्याचीही माहिती आहे. राजस्थान पोलिसांनी शनिवारी सोमवीरला अटक केल्यानंतर या गोष्टीचा खुलासा रविवारी करण्यात आला.

जवान सोमवीरला शनिवारी स्थानिक न्यायालयात हजर करण्यात आलं. त्यानंतर त्याला 18 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. Official Secret Act 1923 अंतर्गत या जवानावर अनेक कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय. सोमवीरच्या संशयित हालचाली आर्मी इंटिलेजन्सला आढळून आल्या होत्या. त्यानंतर त्याला अटक करण्यात आली.

पाच हजार रुपये भावाच्या अकाऊंटमध्ये मागवले

सोमवीर केवळ हनीट्रॅपमध्येच अडकला नाही, तर त्याने पाच हजार रुपयांव्यतिरिक्त आणखी पैशांचीही मागणी केली होती. ‘टाइम्स ऑफ इंडिया’च्या वृत्तानुसार, सोमवीरला हेरगिरी करण्यासाठी पाच हजार रुपये देण्यात आले. ही बाब कुणाला कळू नये यासाठी पैसे सोमवीरच्या भावाच्या अकाऊंटमध्ये ट्रान्सफर करण्यात आले. यानंतर सोमवीरने स्वतःच्या ईवॉलेटमध्ये पैसे मागवले.

सोमवीर सोशल मीडियाच्या माध्यमातून पाकिस्तानी एजंटच्या जाळ्यात अडकला. सात महिन्यांपूर्वी आयएसआयच्या एजंटने सोमवीरसोबत सोशल मीडियाच्या माध्यमातून मैत्री केली. अनिक चोप्रा असं तिचं नाव लिहिलेलं होतं. मेसेजवरुन सुरु झालेली ही मैत्री व्हिडीओ कॉलिंगपर्यंत पोहोचली. दोघांमध्ये अश्लील बोलणंही सुरु झालं. यानंतर एजंटने सोमवीरकडून संवेदनशील माहिती मिळवली, असं बोललं जातंय.

कराचीमध्ये अनिक चोप्रा या नावाने फेक सोशल मीडिया अकाऊंट तयार करण्यात आलं होतं. मूळ हरियाणाचा असलेला सोमवीर याच सोशल मीडिया अकाऊंटच्या संपर्कात आला. सोमवीरने 2016 मध्ये भारतीय सैन्यात नोकरी सुरु केली होती. महत्त्वाची माहिती शेअर केल्याचं सोमवीरनेही मान्य केलं आहे. मोबाईल जप्त करुन आता त्याची पुढील चौकशी सुरु आहे.

Non Stop LIVE Update
अजित पवारांचं कौतुक करताना महादेव जानकर चुकले, व्हिडीओ तुफान व्हायरल
अजित पवारांचं कौतुक करताना महादेव जानकर चुकले, व्हिडीओ तुफान व्हायरल.
राणेंच्या आव्हानाला ठाकरेंचं प्रत्युत्तर, म्हणाले तू आडवा येच तुला...
राणेंच्या आव्हानाला ठाकरेंचं प्रत्युत्तर, म्हणाले तू आडवा येच तुला....
लोकांनी ठरवलं तर काही चमत्कार होऊ शकतो, पंकजा मुंडेंचं भाषण चर्चेत
लोकांनी ठरवलं तर काही चमत्कार होऊ शकतो, पंकजा मुंडेंचं भाषण चर्चेत.
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'.
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार.
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया.
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?.
ज्यांनी पत्नीला सोडलं..., शरद पवारांवरील टीकेनंतर मोदींवर कुणाची टीका?
ज्यांनी पत्नीला सोडलं..., शरद पवारांवरील टीकेनंतर मोदींवर कुणाची टीका?.
मोदी महानटसम्राट...काँग्रेसच्या बड्या नेत्याची पतंप्रधानांवर खोचक टीका
मोदी महानटसम्राट...काँग्रेसच्या बड्या नेत्याची पतंप्रधानांवर खोचक टीका.
दादा आवाज येत नाही, अजितदादांकडून कार्यकर्त्यांची फिरकी, काय दिल उत्तर
दादा आवाज येत नाही, अजितदादांकडून कार्यकर्त्यांची फिरकी, काय दिल उत्तर.