कोरोना काळात डोनाल्ड ट्रम्प अडखळले, पण मोदींनी देशाला वाचवलं : जे. पी. नड्डा

कोरोनाविरोधाच्या लढाईत डोनाल्ड ट्रम्प अडखळले. पण भारतात योग्यवेळी लॉकडाऊनचा निर्णय घेऊन पंतप्रधान मोदींनी देशाच्या नागरिकांना वाचवण्याचं काम केलं", असा दावा जे. पी. नड्डा यांनी केला (J P Nadda appreciate work of Modi Government).

कोरोना काळात डोनाल्ड ट्रम्प अडखळले, पण मोदींनी देशाला वाचवलं : जे. पी. नड्डा
Follow us
| Updated on: Nov 05, 2020 | 7:09 PM

पाटणा : अमेरिकेत कोरोना संकट हा निवडणुकीचा मुद्दा बनला होता. विरोधकांनी प्रचारसभांमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांच्या कार्यपद्धतीवर प्रचंड टीका केली. त्याचाच परिणाम आता निवडणुकीच्या निकालांमध्ये दिसत आहे. मात्र, या निवडणुकीचा मुद्दा पकडत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी मोदी सरकारच्या कामांचं कौतुक केलं (J P Nadda appreciate work of Modi Government).

“अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीचा निकाल आता समोर येत आहे. कोरोनाविरोधाच्या लढाईत डोनाल्ड ट्रम्प अडखळले. पण भारतात योग्यवेळी लॉकडाऊनचा निर्णय घेऊन पंतप्रधान मोदींनी देशाच्या नागरिकांना वाचवण्याचं काम केलं”, असा दावा जे. पी. नड्डा यांनी केला (J P Nadda appreciate work of Modi Government).

बिहारमध्ये तिसऱ्या टप्प्याच्या निवडणुकीसाठी प्रचाराची रणधुमाळी सुरु आहेत. मतदारांचे मत जिंकण्यासाठी प्रत्येक पक्षाचे नेते अनेक दावे करत आहेत. जिंकून आलं तर प्रभावीपणे जनतेचं काम करु, असं आश्वासन देत आहेत. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा हेदेखील प्रचारात व्यस्त आहेत. ते आज (5 नोव्हेंबर) दरभंगा येथील प्रचारसभेत बोलत होते.

“भारतात जेव्हा कोरोना आला तेव्हा देशात टेस्टसाठी फक्त एकच लॅब होती. मात्र, आज देशभरात जवळपास 15 लाख टेस्ट होत आहेत. लॉकडाऊनदरम्यान सरकारने या संकाटविरोधात लढण्यासाठी तयारी केली. पीपीई किट आणि व्हेंटिलेटरचं उत्पादन आज देशात होत आहे”, असं जे पी नड्डा म्हणाले.

जे पी नड्डा यांनी आपल्या भाषणात राष्ट्रीय जनता दलावर सडकून टीका केली. “बिहार आता कंदिल युगातून एलईडी युगाकडे जात आहे, बाहुबलीतून निघून विकास बलच्या दिशेने जात आहे”, असं जे पी नड्डा म्हणाले.

“बिहार निवडणुकीत राम जन्मभूमीचा विषय का काढतात? असा सवाल लोक करतात. सीतामातेच्या जन्मभूमीवर राम जन्मभूमीची बात नाही करणार तर कुठे करायची? मोदी पुन्हा मुख्यमंत्री बनल्यानंतर सुप्रीम कोर्टाने राम जन्मभूमीच्या पक्षाने निकाल दिला. आता अयोध्येत भव्य मंदिर बांधलं जात आहे”, असं जे पी नड्डा आपल्या भाषणात म्हणाले.

हेही वाचा : “आली-आली-आली, गेली-गेली-गेली”, भाजप अध्यक्षांकडून प्रचारात बिहारमधील लहानपणीचा किस्सा

Non Stop LIVE Update
इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट आता..., मोदींचा इंडिया आघाडीवर हल्लाबोल
इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट आता..., मोदींचा इंडिया आघाडीवर हल्लाबोल.
वोट करायला पोहोचला अन् EVM मशीनच पेटवल्या, कुठं घडला धक्कादायक प्रकार?
वोट करायला पोहोचला अन् EVM मशीनच पेटवल्या, कुठं घडला धक्कादायक प्रकार?.
मी तिथे गेलो नसतो तर...शिवीगाळचा व्हिडीओनंतर दत्ता भरणेंची प्रतिक्रिया
मी तिथे गेलो नसतो तर...शिवीगाळचा व्हिडीओनंतर दत्ता भरणेंची प्रतिक्रिया.
नॉट रिचेबल असणाऱ्या किरण सामंत यांच्याबद्दल उदय सामंत म्हणाले...
नॉट रिचेबल असणाऱ्या किरण सामंत यांच्याबद्दल उदय सामंत म्हणाले....
चाललय काय? दत्ता भरणेंनी शिवीगाळ केलेल्या कार्यकर्त्याच्या भेटीला सुळे
चाललय काय? दत्ता भरणेंनी शिवीगाळ केलेल्या कार्यकर्त्याच्या भेटीला सुळे.
मतदान करायला गेले पण ईव्हीएममध्ये कमळाचं चिन्ह नसल्यानं आजोबा संतप्त
मतदान करायला गेले पण ईव्हीएममध्ये कमळाचं चिन्ह नसल्यानं आजोबा संतप्त.
दत्तात्रय भरणे यांचा शिवीगाळ करतानाचा व्हिडीओ व्हायरल, पाहा व्हिडीओ
दत्तात्रय भरणे यांचा शिवीगाळ करतानाचा व्हिडीओ व्हायरल, पाहा व्हिडीओ.
'सुनेत्रा पवार यांची दया येते, अजित पवारांनी त्यांचा बळीचा बकरा केला'
'सुनेत्रा पवार यांची दया येते, अजित पवारांनी त्यांचा बळीचा बकरा केला'.
मतदान केलं अन् सुप्रिया सुळे तडकाफडकी अजित पवारांच्या घरी, कारण काय?
मतदान केलं अन् सुप्रिया सुळे तडकाफडकी अजित पवारांच्या घरी, कारण काय?.
उमेदवारी न दिल्याने नाराजी? उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत नॉटरिचेबल
उमेदवारी न दिल्याने नाराजी? उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत नॉटरिचेबल.