AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Patanjali Coronil | ‘कोरोनिल’ची कोरोनाग्रस्तांवर चाचणी, आरोग्य विभागाची रुग्णालयाला नोटीस

आयुष मंत्रालयाने 'कोरोनिल'ची 'कोरोना व्हायरसवर उपचार करण्यासाठी औषध' अशी जाहिरात करण्यास 'पतंजली'ला बंदी घातली. (Jaipur hospital NIMS gets Notice for conducting trials of Patanjali drug Coronil on Covid-19 patients)

Patanjali Coronil | 'कोरोनिल'ची कोरोनाग्रस्तांवर चाचणी, आरोग्य विभागाची रुग्णालयाला नोटीस
Anish Bendre
Anish Bendre | Updated on: Jun 26, 2020 | 5:32 PM
Share

जयपूर : ‘पतंजली’च्या आयुर्वेदिक ‘कोरोनिल’ औषधाची कोरोनाग्रस्त रुग्णांवर चाचणी केल्याप्रकरणी राजस्थानच्या आरोग्य विभागाने ‘राष्ट्रीय वैद्यकीय विज्ञान संस्था’ अर्थात ‘एनआयएमएस’ (NIMS) रुग्णालयाला नोटीस बजावली आहे. रुग्णालय प्रशासनाला स्पष्टीकरण देण्याचे आदेश दिल्याचं वैद्यकीय अधिकाऱ्याने सांगितलं. (Jaipur hospital NIMS gets Notice for conducting trials of Patanjali drug Coronil on Covid-19 patients)

“तीन दिवसांत स्पष्टीकरण देण्यासाठी आम्ही बुधवारी सायंकाळी रुग्णालयाला नोटीस बजावली होती. रुग्णालयाने राज्य सरकारला कळवले नाही किंवा परवानगी मागितली नाही,” असे जयपूरचे मुख्य वैद्यकीय आणि आरोग्य अधिकारी डॉ. नरोत्तम शर्मा यांनी सांगितले. प्रशासनाला जयपूरच्या राष्ट्रीय वैद्यकीय विज्ञान संस्थेकडून उत्तर मिळण्याची प्रतीक्षा आहे.

योगगुरु रामदेव बाबा यांनी मंगळवारी औषध लाँच केल्यानंतर वादाला तोंड फुटले होते. त्यानंतर आयुष मंत्रालयाने त्याच्या चाचणीची सर्व माहिती मागितली आणि ‘कोरोनिल’ची ‘कोरोना व्हायरसवर उपचार करण्यासाठी औषध’ अशी जाहिरात करण्यास ‘पतंजली’ला बंदी घातली.

आयुष मंत्रालयाचा आक्षेप

“पतंजली आयुर्वेद कंपनीने कोरोनावर औषध शोधल्याचं जाहीर केलं आहे. याबाबत आयुष मंत्रालयाला प्रसार माध्यमांद्वारे माहिती मिळाली. या औषधाशी संबंधित वैज्ञानिक दावांचा कोणताही तपशील आयुष मंत्रालयाकडे नाही”, असं आयुष मंत्रालयाने स्पष्ट केलं आहे.

आयुष मंत्रालयाच्या परवानगीशिवाय राज्यात हे औषध म्हणून वापरले जाऊ शकत नाही, असे राजस्थान सरकारने स्पष्ट केले आहे. राज्याचे आरोग्यमंत्री रघु शर्मा यांनी बुधवारी सांगितले होते की कोरोना व्हायरस संसर्गावर उपचार करण्यासाठी औषध म्हणून कोणत्याही औषधाची विक्री केल्यास नियमांनुसार विक्रेत्यावर कठोर कारवाई केली जाईल.

हेही वाचा : महाराष्ट्रात नकली औषधांच्या विक्रीला परवानगी नाही, गृहमंत्र्यांचा रामदेव बाबांना थेट इशारा

दरम्यान, आयुष मंत्रालयाने जाहिराती थांबवल्यानंतर आधी राजस्थान, मग आता महाराष्ट्र सरकारने या औषधावर बंदी घातली आहे. कोरोनिल या औषधाच्या वैद्यकीय चाचणीबाबत ठोस माहिती समोर आलेली नाही, त्यामुळे महाराष्ट्रात कोरोनिल औषधाच्या विक्रीला परवानगी दिली जाणार नाही, असं महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनीही सांगितलं होतं.

The National Institute of Medical Sciences, Jaipur will find out whether clinical trials of @PypAyurved‘s ‘Coronil’ were done at all. An abundant warning to @yogrishiramdev that Maharashtra won’t allow sale of spurious medicines. #MaharashtraGovtCares#NoPlayingWithLives

— ANIL DESHMUKH (@AnilDeshmukhNCP) June 24, 2020

उत्तराखंड सरकारचा सवाल

उत्तराखंड सरकारनेही पतंजलीला नोटीस पाठवण्याची तयारी केली आहे. उत्तराखंड आयुर्वेद विभागाने नोटीस जारी करत पतंजलीलाला औषध लॉन्च करण्याची परवानगी कोणी दिली, असा सवाल उपस्थित केला आहे.

पतंजलीच्या आवेदनावर आम्ही परवाना जारी केला. या आवेदनात कुठेही कोरोना विषाणूचा उल्लेख नव्हता. यामध्ये रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी, कफ आणि तापाचं औषध बनवण्यासाठी परवाना घेत असल्याचं म्हटलं आहे”, अशी माहिती उत्तराखंड आयुर्वेद विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.

7 दिवसात कोरोना रुग्ण बरा होण्याचा दावा

योगगुरु रामदेव बाबा यांनी कोरोना विषाणूच्या संसर्गावर पहिलं आयुर्वेदिक औषध शोधल्याचा दावा करत, 23 जून रोजी कोरोनिल हे औषध लाँच केलं होतं. या औषधामुळे 100 टक्के रुग्ण बरे होतात आणि 0 टक्के मृत्यूदर असल्याचाही दावा रामदेव बाबा यांनी केला आहे. त्यांनी हरिद्वार येथे या औषधाचं उद्धाटन केलं. श्वासारी वटी कोरोनील असं या औषधाचं नाव आहे.

संबंधित बातम्या 

‘पतंजली’ कोरोनील औषधाच्या जाहिरातीवर आयुष मंत्रालयाची बंदी  

पतंजलीने आमच्याकडे तर फक्त ताप-खोकल्यावरील औषधाचा परवाना मागितला : उत्तराखंड आयुर्वेद विभाग   

पतंजलीकडून कोरोनावरील Coronil औषध लाँच, 7 दिवसात रुग्ण बरा होण्याचा दावा

(Jaipur hospital NIMS gets Notice for conducting trials of Patanjali drug Coronil on Covid-19 patients)

Follow Us
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...
गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी वेगळं...
Gautami Patil On Dahi Handi | गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी खास...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय गोविंदा दगावला
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना..
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना भाई है म्हणत...
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती;
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती; पहा खास व्हिडीओ
12 तारखेनंतर गंभीर परिणाम होतील; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, थेट...
12 तारखेनंतर गंभीर परिणाम होतील; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, थेट...