कार झाडावर आदळून चक्काचूर, प्रसिद्ध यूट्यूबरच्या पुतण्याचा जागीच मृत्यू

कार झाडावर आदळून चक्काचूर, प्रसिद्ध यूट्यूबरच्या पुतण्याचा जागीच मृत्यू

अपघातात मृत्युमुखी पडलेला योगेश हा 'फुगे घ्या फुगे' या यूट्यूबवरील प्रसिद्ध गाण्याचे गायक सचिन कुमावत यांचा पुतण्या होता.

अनिश बेंद्रे

|

Dec 20, 2019 | 9:08 AM

जळगाव : अर्टिगा कारचे ब्रेक फेल होऊन गाडी झाडावर आदळल्यामुळे तरुणाचा जागीच मृत्यू झाला, तर एक तरुण गंभीर जखमी आहे. जळगाव जिल्ह्यातील शेंदुर्णीमध्ये काल (गुरुवारी) सकाळी हा भीषण अपघात (Jalgaon Car Accident) झाला.

अपघातात 19 वर्षीय योगेश राजेंद्र कुमावत याला प्राण गमवावे लागले. योगेश हा ‘फुगे घ्या फुगे’ या यूट्यूबवरील प्रसिद्ध गाण्याचे गायक सचिन कुमावत यांचा पुतण्या होता.

योगेश आणि त्याचा 20 वर्षीय मित्र अक्षय वसंत गुजर सकाळी सहा ते सात वाजण्याच्या सुमारास अर्टिगा गाडीने बाहेर निघाले होते. अंबे वडगावकडून शेंदुर्णीला जात असताना गाडीचे ब्रेक फेल झाले. त्यामुळे गाडी वडाच्या झाडावर आदळली गेली.

मनसे आमदार राजू पाटील यांच्या कारला विचित्र अपघात, 75 लाखांची कार चक्काचूर

ही धडक इतकी जबरदस्त होती, की गाडीचा अक्षरशः चक्काचूर झाला. यामध्ये योगेश कुमावत याचा जागीच मृत्यू झाला, तर मित्र अक्षय जबर जखमी झाला. अक्षयला उपचारासाठी पाचोऱ्याला पाठवलं.

गाडीचा पुढील भाग तोडून गाडीतून योगेश कुमावत याला बाहेर काढण्यात आलं, मात्र त्याचं निधन झालं होतं. या अपघातामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात (Jalgaon Car Accident) आहे.

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें